तुझी आठवण मनाला कुरताड़ते,
तुझं आणवाणी पायाणं
रानं धुंडाळनं
तापत्या उन्हात,
अड़मुठ्या पावसात अन् गारठ्यात
मिळलं ते काम करणं
आज ही जेव्हां ऑफिसला निघतो,
अरशात दिसतेस तु
तळपत्या ढेकाळात,
ललाटावरच्या कुंकवासगट घामाच्या धारांत लतफत उभी.
तुझ्या हातातलं खुरपं
माझं काळीज कापतं.
तु ढेकळं फोडायचीस
मला चारान्याची पेन्सिल देण्यासाठी.
दिवाळी ला ठिगळं लाउन नाटी नवी करायचीस
खाकी चड्डी मात्र कोरी शिवायाचीस.
लई भोगलस तू माझ्यासाठी
अता तुला गावांत ठिवनार नई
बस्ं झालं तुरःट्या म्होरं सारुण धुर फुंकनं
ती फुंकनि चुलीत घालून, येणार आहे मी
आज तुला हिकडं घेऊन.
वाचने
1891
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली कविता.
सुरेख!
....आवडली.
छान लिहिलंय! अप्रतिम!!!
धन्यवाद
लवकर घेवून या आईला .
खूप सुंदर भावस्पर्शी कविता.
खूप छान!