Skip to main content

जीवनमान

खरे सुपरमॅन - आमचे आप्पा

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी गुरुवार, 02/06/2016 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतंच माझ्या सासर्‍यांनी (श्री. गजाननराव गोडबोले - आमचे आप्पा) पंचाण्णव्या वर्षात पदार्पण केलं. असं म्हणतात की आपल्याच माणसाचं चारचौघांसमोर कौतुक करू नये. पण त्यांच्यामध्ये इतकी सकारात्मकता आहे की ज्येष्ठच काय, तरुणांनीदेखील कित्ता गिरवावा अशी त्यांची विचारशैली. त्याबद्दल न लिहिणं हाच गुन्हा होईल. त्यांच्याबद्दल लिहिताना त्यांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या तारखा आणि तत्सम इतर पायर्‍या मी गाळूनच टाकते. मात्र ते आम्हाला सुपरमॅन का वाटतात तेच फक्त लिहिते. ते एकटे स्वतंत्रपणे राहातात. पण डबा मागवणे वगैरे शॉर्टकट अजिबात नाही. स्वयंपाक करायला आणि झाडलोटीला बाई आहे.

बोट - व्यसनं

लेखक स्वीट टॉकर यांनी गुरुवार, 02/06/2016 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
फार पूर्वी, जेव्हां बोटी फक्त शिडाच्या होत्या तेव्हांचा काळ. इंग्लंडच्या बोटी (Her Majesty’s Ships) जगभर फिरायच्या खर्‍या, पण त्यांच्यावर काम करायला खलाशी सहजासहजी मिळत नव्हते. खलाशांचं आयुष्य फारच खडतर असे. गोडं पाणी अतिशय मर्यादित. शीतकरण नसल्यामुळे आहारात थोडेच पदार्थ. रोज रोज तेच तेच. वार्‍यावर अवलंबून असल्यामुळे पुढच्या बंदराला पोहोचायला किती काळ लागेल काही सांगता येत नसे. काम अंगमेहनतीचं आणि जोखमीचं. वादळांचा धोका कायमच डोक्यावर. बोटी बुडण्याचं आणि खडकांवर आपटून फुटण्याचं प्रमाण बर्यापैकी. वर कित्येक सफरींमध्ये तर सत्तर टक्के खलाशी स्कर्वी (scurvy) ने मेल्याची नोंद आहे.

मी बाई होते म्हणुनी .. भाग - ०७

लेखक ५० फक्त यांनी बुधवार, 01/06/2016 07:21 या दिवशी प्रकाशित केले.
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४ http://misalpav.com/node/24073 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०५ http://misalpav.com/node/35964 मी बाई होते म्हणुनी ..

राणीचा वाढदिवस

लेखक प्रणवजोशी यांनी मंगळवार, 31/05/2016 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या आपल्या लाडया राणीचा वाढादिवस. गेली ८०+वर्षे सेवा देणारी ही राणी अपवादात्मक परिस्थिती वगळता नेहमीच धावली आहे. मधे रेल्वेने हिचा डायनर कार डबा काढल्यावर लोक संतापली पण आता पुन्हा जोडलाय डबा. बाकी राणीची शान हल्ली जरा झाकोळलेली वाटते आता राणीला नव्हे तिच्या मालकांना राणीवर जाहिराती लावुन पैसे कमवायची दुर्बुद्धी झाल्ये. असो.तर महत्वाच हे की ऊद्या पुणे येथे सकाळी ७ वाजता राणीचा वाढदिवस साजरा होणार आहे.तसाच सोहळा छशिट येथेही आसतो का हे विचारणे हा आहे.जाणकारांच्या मताच्या प्रतिक्षेत. टिप- हा लेख केवळ जिलबी टाकावी म्हणुन लिहलेला नाही.

जगाचं असंच असतं!!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 30/05/2016 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
(हा लेख सोशल मेडीया वरून घेतलेला आहे पण, त्यात थोडी आवश्यक भर घालून आणि एडीट करून मी हा तयार केलेला हा लेख आहे. हा लेख सोशल मेडीया वर ज्याने कुणी सर्वप्रथम किहून टाकला त्याला मनापासून धन्यवाद!) जगात वागावं कसं याची सध्या मला चिंता सतावतेय. मला सर्वांचंच म्हणणं पटतं. आणि त्यामुळेच मी अडचणीत सापडलोय. तरी लोकांचे टोमणे काही थांबले नाहीत. जगाचं असंच असतं!! आता हेच बघा ना! * मनुष्य गरीब असला की लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही. * श्रीमंत असला की म्हणतात, दोन नंबरचा धंदा करत असणार! त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं? प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत.

ओळख

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 29/05/2016 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
ओळख तिला पिक्चर खुप आवडतात . विशेषकरुन जर प्रेमकथा असेल तर ती अगदी गुंग होउन जाते . हिरो हिरॉईनच्या सुखात हसते , त्यांच्यावर संकट आले तर तिच्या डोळ्यात पाणी येते . असे पिक्चर पार टायटलपासुन ते दि एंड पर्यंत बघायचेच असा तिचा नेम असतो . असे पिक्चर परत परत बघायलाही ती नेहमीच तयार असते . या रविवारचे प्लॅनिंग तिने आधीच मनाशी ठरवले होते . तो खास दिवस त्याच्याबरोबर पिक्चर पाहुन तिला सेलीब्रेट करायचा होता . त्यासाठी आमीरखानच्या "कयामतसे.."चे बुकिंग ती करणार होती . यामधली एकुण एक गाणी तिला पाठ होती . आमिरखान हा तिचा फेव्हरेट हिरो बनला होता . तो अगदी उलट आहे . तो पिक्चर फारसे बघत नाही .

बोर न्हाण

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी शनिवार, 28/05/2016 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
चार महिन्यांपूर्वी माझ्या नातवाचं बोर - न्हाण केलं. जरा वेगळ्या पद्धतीनी. आपल्या बाळांचे आपण निरनिराळे कार्यक्रम करतो त्यांबद्दल थोडंसं. त्यांना उत्सवमूर्ती म्हणायचं खरं, पण त्यांना त्यात अजिबात रस नसतो. कौतुक आपल्यालाच असतं आणि असावं देखील. आपण आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या उपस्थितीत ते साजरे करतो कारण आपल्याला आपला आनंद त्यांच्याबरोबर वाटण्याची इच्छा असते आणि ती सफलही होते.

सहावा वेतन आयोग - पगार झाले कमी

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 28/05/2016 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
सहावा वेतन आयोग लागू झाल्याचा काही महिन्यानंतरची गोष्ट. माझा एक दाक्षिणात्य मित्र नागराजन (टोपण नाव) माझ्या केबिन मध्ये आला. येताच म्हणाला पटाईतजी, आपको मालूम है, हमारे साथ धोका हुआ है. मी विचारले कसे काय. नागराजन हा हिशोबात हुशार. रोकड अनुभागात काम करण्याचा त्याचा दांडगा अनुभव. निश्चित बिना कुठल्या ठोस आधारा शिवाय तो असे म्हणणार नाही. त्याचे म्हणणे होते जिथे सर्व कर्मचाऱ्यांचा पगार वाढ १.८६% दिली तिथे उच्च श्रेणीच्या अधिकार्यांना २.६७% पगार वाढ दिली यातच सर्व गोम आहे. (अर्थात त्यांचा पगार १.८६ च्या हिशोबाने २६०४० च्या जागी २.६७च्या हिशोबाने ३७४०० वर निश्चित केला गेला).

पाणी अडवा पाणी जिरवा - एक सफल प्रयोग.

लेखक खटपट्या यांनी गुरुवार, 26/05/2016 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
मागे एकदा मी माझ्या कोकणातील गावाची काही चित्रे खफ वर डकवली होती. ही चित्रे गावातील पाणी टंचाई बाबत होती. पैसा ताइंनी मला याबद्द्ल लेख लीहीण्यास सुचवले म्हणून हा प्रपंच. आज काल आपण जलयुक्त शिवार आणि अशाच काही सरकारी योजनांबद्द्ल ऐकतो. नाद खूळा यांची तर लेख मालाच आली होती पाणी नियोजनाबद्दल. अशा योजनांमधे सरकार जीतकी शक्य होइल तेवढी मदत करतच असते. (निदान नवीन सरकार तरी सकारात्मक आहे) बर्याच वेळेला शासकीय यंत्रणा काही कारणास्तव प्रत्येक गावात पोहोचू शकत नाही. पण सरकार काही करत नाही म्हणून बसून रहाण्यापेक्षा आपण जर योजना फक्त समजावून जरी घेतली तरी बरेच फायदे होउ शकतात. आता ते कसे ते पहा.