अनुभव आणि पुढच्यास ठेच मागचा शहाणा
"नाही नाही ही कुठलीही प्रश्न मंजुषा नाही की सैराट बद्दल महाचर्चासाठी काढ्लेला धागा नाही. सांगतो अगदी शिस्तीने सांगतो,आधी दुसरी गोष्ट शिरस्तयाप्रमाणे सांगतो नंतर पहिली आणि शीर्षकातली गोष्ट सांगतो.
त्याचे असे झाले काल कंपनीतून घरी जाताना,मुलाला त्याचे १०वी च्या क्लासवरून घरी घेऊन जात होतो,मार्ग वल्लींचा परिसर ते मोरे नाट्यगृह मार्गे चिंचवड.मुलगा गाडीवर मागे होताच (नाही आम्ही आलटून पालटून चालवित नव्हतो माझी स्कूटी) नेमका मोरे नाट्यगृहापाशी आल्यावर मुलानेच सांगीतले."बाबा आम्बा महोस्तव दिसतोय इथे लागलेला अत्ताच बोर्ड वाचला, जाऊयात ना."
अश्या प्रसंगी आम्हाला सावध ऐक पुढलया हाका (कधी कधी सुनिल शेट्टीला हेराफेरीमध्ये धोक्याचे वेळी ऐकू येणारे अंतर्नाद) असे होऊ लागते.४-५ वर्षांपुर्वीचा महोत्सवातला कटु अनुभव आणि त्यापुर्वी २ वर्षामागे घेतलेला सुखद अनुभव यांच्या जोरावर शिल्लक शून्य ठेऊन गाडी बाजूला व्यवस्थीत (अधिकृत पार्कींगमध्ये) लावली.आणि महोत्सवाला भेट दिली.
अता आत गेल्यावर लक्ष्यात आले की हा महोत्स्व मनपाने भरविला नसून भावी-की माजी नगरसेवकाने बचत गटाचे माध्यमातून भरविला आहे , मिपावरील धाग्यांचे परंपरेनुसार फलक ही लक्ष्यवेधी होता "कोकणचा हापुस पायरी टकाटक , कशाला हवा कर्नाटक" कोकणातील आंबा उत्पादकांनी स्वतः शेतातील आंबा तुमच्यासाठी आणलाय असा. प्रत्येक विक्रीकेंद्रावर नाव फोन न आणि ठिअकाण देवगड्,रत्नागीरी ई होतेच.
मुलाने आनि मी सगळ्या विक्रीकेंद्रावर चक्कर मारली (खच्चून १०-१२) आणि इतर कुल्फीचा एक, एक मांडेबनविणार्याचा,एक कोकणातील पापड ई उत्पादनाचा,आणि इतर एक कसल्या तरी कोकम ई उत्पादनाचा,असावा.
तर काय सांगत होतो "आप्ल्याला थेट शेतकर्याकडून आंबा मिळणार चार पैसे त्याला रास्त मिळणार चार पैसे आपले वाचणार अश्या विचाराने भारावलो होतो.(बच्चमजी मारे नेहमी सांगतोस शेतकर्यांनी थेट विकला पाहिजे शहरात आणून्,मधली दलाली तरी बसणार नाही ग्राहकांच्या बोकांडी, अता कुठे गेला तुझा धर्म राधासुता तेच आमचे हलक्ट अंतर्मन)
शेवटी मजल दरमजल करीत "नानीवडेकर" नामक विक्रीकेंन्द्रावर मोर्चा वळविला.मी स्वतः अक्षयतृतीया झालयाखेराज आंबा खात नसल्याने, चवीसाठी दिलेला आंबा टवका मुलाला दिला मला वासावरून लक्ष्यात आले की हा हापुस आहे.
रुजवात करून दोन डझन आंबे घेतले.घेताना मी निवडत असताना विक्री केंद्र मालकीण बाईंनी तुम्ही फक्त सांगा मी भरते मोजतानाच पिशवीत. ते सांगून अगदी भराभर त्या बाइसाहेब स्वतःच आंबे निवडून टाकू लागल्या.त्या वेळीच एक्दोन खराब आंबे (एक अक्षरशः पुर्ण छिद्र पडलेला० त्यात घेऊ नका म्हणून मी बाजूला ठेवायला लावला.तरीही त्या बाईसाहेबांनी काहीतरी हातच्लाखी केलीच (जी मला घरी आल्यावर पिशवीतून सगळे आंबे काढून ठेवताना कळाली)
आप्ल्याकडून थेट शेती उत्पादकाला (खरेदी करून) कृतकृत्य झाल्याचा भ्रमाचा भोपळा फुटला. घरी आंबे काढताना जे मी खराब आहेत म्हणून आवर्जून बाजुला काढले होते तेच आंबे किमान २ आणि विक्रेतीनी स्वतः निवडलेले ३ असे पाच अतिषय खराब आंबे दिले होते.
मराठी बाण्याला जागून मी कपडे न बदलताच (कंपणी गणवेषावर तसाच्,उगा खयाली पुलाव पकवू नये) महोत्स्वात डेरेदाखल झालो.तिथे रीत्सर तक्रार करताच हे आंबे खराब नाहीत इथ पासून ते मी हे निवडलेच नाहीत तुम्हीच दिले असतील इथपर्यंत दावा केला गेला. मग मीही जरा आवाज चढ्विताच (आणखी दोन संभाव्य गिर्हाईके साशंक होताच) ठीक आहे नजरचुकीने झाले असेल (त्याच वेळी तुम्ही खराब निघाला तर बदलून देईन असे म्हणाला होतात याचे खणखणीत नाणे वाजविले,खोटे कशाला बोला मनात पिरा तै कश्या तावातावात मुद्दा मांडतेत तोच विचार आला ) बाईनी महत नाईलाजाने ते आंबे बदलून दिले आणि आम्ही संमिश्र भावनेने घरी आलो.
अता याणंतर शीर्षक विषयः
१.आम्ही हा अनुभव लिहिल्यानंअतर "अच्च झालं तर " या कुजकट प्रश्नाच्या भीतीपोटी मिपावर टाकण्यात चूक केली काय?
२.आंबे देताना फसवणूक झाली (खराब फळे शिताफीने गळ्यात मारली० )म्हणून तिथे गुमान बसून, इथे मिपावर आपल्यावर झालेल्या अन्याय्याबाबत मिपाकराने जागरूक राहायला पाहिजे असे बाणेदार प्रतिसाद टंकन्धन्यता मानायला पाहिजे होती काय?
३.आंबे बदलण्याची क्रुती योग्य की अयोग्य (वरील संदर्भासकट)
४.मी अनुभव लिहिल्याने समस्त कोकणवासीयांच्या अस्मिता दुखाव्लया जाऊ शकतील काय?
५.मिपावरील कोकण वासीय त्याबद्दल माझ्यावर नाराज्/रुष्ठ होतील काय?
६.जे मिपाकर कोकणवासी नाहीत पण आंबा प्रेमी आहेत त्यांना नक्की काय वाटेल.
७.जे मिपाकर आंबा उत्पादकही आहेत आणि थेट विक्री करणारे आहेत त्याना याबाबत काय वाटेल.
८.तेही हा प्र्शन अनुत्तराने बाजूल टाकतील काय?
९.कोकणी मिपाकरांनी निषेढ मोर्चा काढला तर चिमण नक्की कुठल्या बाजूला असेल मोर्च्याच्या का माझ्या?
१०.हाच अनुभव जर मिपाकरांपैकी सर्व श्री रा रा पिरा तै,संक्षी,डांगे अण्णा,पुरोहित साहेब्,आणि संस्कृती रक्षक काका यांना आला असता तर काय झाले असते.
११. तुमच्या चार रुपड्यांसाठी इथे धागा का टाकला अश्या शेर्यांच्या भीतीपोटी मी या विषयाची भ्रूणहत्या करायची होती काय?
१२.वेगवेगळ्या आंबामहोत्स्वातील अनुभव निर्पेक्षपणे कुणी टंकेल काय?
तूर्त दोन आम्ब्यास एक प्रश्न या वेगाने प्र्श्न मधमाश्या डसतायत ,आणी या एक दोन दिवसात मनोबाला भेटणार आहेच तेव्हा प्र्शन्संख्येत वाढ होऊ शकते (अजून बारा शिल्लक आहेत्),ते वेळेप्र्संगी धागा प्रतिसादात टाकीन्च.धागा तेवत ठेवण्याचा हुकुमी उपाय कम बेगमी म्हणून त्याकडे पाहू नये असे नाही.
आप्लाच समयोपरान्त भीड बाळगणारा ग्राहक नाखु
बाकी सगळं सोडा... आंबे आहेत