Skip to main content

इतिहास

ऐका इंटरनेट देवा तुमची कहाणी - २ (निर्मात्याबद्दल थोडेसे)

लेखक नानबा यांनी गुरुवार, 03/10/2013 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
भाग- १ इंटरनेटचे जनक - प्रो. लिओनार्ड क्लाईनरॉक s मॉडर्न इंटरनेटचे जनक म्हणून ज्यांचा सगळ्यात आधी उल्लेख करता येईल अशी व्यक्ति म्हणजे प्रोफ़ेसर लिओनार्ड क्लाईनरॉक. जगाला ही अद्वितीय देणगी देणा-या क्लाईनरॉक यांचा जन्म १३ जून, १९३४ रोजी न्यूयॉर्क शहरात एका ज्यू कुटूंबात झाला.

ऐका इंटरनेट देवा तुमची कहाणी - १ (इंटरनेटचा उदय)

लेखक नानबा यांनी मंगळवार, 01/10/2013 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
इंटरनेट.. गेल्या काही वर्षांत बहुधा सर्वात जास्त वापरलं गेलेलं आणि बोललं गेलेलं प्रकरण. इंटरनेटशी जोडला न गेलेला माणूस आणि डोंबिवली ते सीएसटी रेल्वे प्रवासात शेजारी बसलेल्या अनोळखी स्त्रीसोबत एक अक्षरही न बोलणारी स्त्री सापडणं निव्वळ अशक्य. इंटरनेट ने जग जवळ आणलं म्हणतात ते खोटं नाही. पूर्वी घरातला कोणी परदेशी गेला, की त्याच्या फ़ोनची वाट पाहत रात्री उशीरा पर्यंत जागं राहणं, आंतरराष्ट्रीय पोस्टकार्डाची वाट पाहणं इ इ. प्रकार या पठ्ठ्याने बघता बघता नाहीसे केले.

'लोकायत' विचारचर्चा

लेखक प्रास यांनी गुरुवार, 19/09/2013 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
माधव : असे आश्रय ज्ञानाचा। निःश्रेयसरूपी पुरूषार्थाचा । धनी माझ्या नमस्काराचा । शिव सृष्टीकर्ता।। १ पावले जे दर्शनसागरापार। करवली जनयोग्य ईप्सितार्थप्राप्ती अपार। असे सर्वज्ञ विष्णु गुरूवर । मम आश्रयदाता।। विचित्रपुष्पांसम शास्त्रांचा हा सर । गहन, दुस्तर तरी आनंद देई फार। अवलोकावा दूर ठेऊनि मत्सर । होई आल्हाददाता। पुरूष क्र. १ : नमस्कार माधवराव! माधव : नमस्कार बुवा! काय म्हणता? पुरूष क्र.

डोंबिवली कट्टा...अचानक.....

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 12/09/2013 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाची संकल्पना मिपावरील एका लेखावरून...पण शेवट थोडसा बदलून शनिवार दि. ७ सप्टेंबर २०१३ वेळ दुपारची. मी आपला मस्त पैकी भरतेट जेवून झोपलो होतो.आमची वामकुक्षीचीच वेळ ती.

जोवरी हे जग, जोवरी भाषण - २ : पार्श्वभूमी

लेखक तिरकीट यांनी रविवार, 25/08/2013 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
गीतरामायणाची मूळ संकल्पना सीताकांत लाड यांची. १९५५ साली पुणे आकाशवाणीमध्ये सहनिर्देषक म्हणून काम करत असलेल्या लाड यांनी ही कल्पना गदिमांना बोलून दाखवली. गीतकार म्हणून ग. दि. माडगुळकर आणी संगीतकार म्हणून सुधीर फडके या द्वयीची निवड करण्यात आली. तिघांच्या चर्चेतून 'गीतरामायण' हे शीर्षक ठरले. गुढीपाडव्याला सुरुवात करून आठवड्याला १ याप्रमाणे ५२ गीते पुणे आकाशवाणी वरून सादर करण्याचे ठरले.

मद्रास कॅफे: भारताच्या विएतनामची अस्वस्थ करणारी कहाणी

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 25/08/2013 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक सर्व शक्तिमान देशांच्या अहंकाराची थडग चिमुकल्या आणि लौकिकर्थाने कमजोर देशांमध्ये सापडतात. औरंगझेब आणि त्याच्या उद्दाम सरदारांची ज्याप्रमाणे महाराष्ट्रात सापडतात तशी.. सर्व शक्तिमान अमेरिकेला तर या नियमाने अनेक वेळा तडाखा दिला आहे. मग ते विएतनाम युद्ध असो किंवा इराक युद्ध असो. रशिया सारख्या प्रचंड लष्करी बळ असणार्‍या देशाचे पण अफगाणिस्तान मध्ये वस्त्र हरण झाले आणि त्याना तिथून माघार घ्यावी लागली. कीबहुना या अफगाण युद्धाने रशियन कमजोर अर्थव्यवस्थेवर इतका ताण पडला की तत्कालीन सोविएत यूनियन चे विघटन होण्याला जी अनेक कारण कारणीभूत ठरली त्यात या अफगाण युद्धाचा क्रम बराच वरचा आहे.

क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ११

लेखक किलमाऊस्की यांनी गुरुवार, 22/08/2013 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखमालिकेतील हा शेवटचा भाग. त्यानिमित्ताने थॊडंसं मनातलं.... क्लोंडायक गोल्ड रशची गोष्ट मी जेव्हा ऐकली त्यानंतर कित्येक दिवस या गोष्टीने मला वेड लावलं होतं. मिसळपाववर ही गोष्ट लिहायला घेतल्यावर तर मीच या प्रवासाचा भाग बनत गेले. कित्येकदा स्टँपेडर बनून मी कल्पनेतच गर्दीच्या जहाजात घुसण्याचा प्रयत्न केला, तर कधी व्हाईट पास, गोल्डन स्टेअर्स पार केल्यात. सोनं न मिळाल्यावर स्टँपेडर्स इतकीच निराशा मी अनुभवली. मीही अनेकदा या सफरीवर सोनं मिळण्याची स्वप्न पाहीली. सध्या सिअ‍ॅट्लमधेच असल्याने अनेकदा गोल्डरशच्या खाणाखुणा शोधण्याचा वेड्यासारखा प्रयत्न केला.

पुर्वसुचना

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 20/08/2013 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
आज पहाटे नरेंद्र दाभोळकर ह्यांची हत्या करण्यात आली . अत्यंत निषेधार्ह घटना . समाजाच्या सर्वच स्तरातुन ह्या घटनेचा जोरदार निषेध होत आहे . पण
ज्या विचारांनी महात्मा गांधींची हत्या केली, त्याच विचारांनी आज डॉ.

सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग ३: अंतिम)

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 07/08/2013 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १) सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग २) ७. अर्जुन उवाच : कृष्णाला शोधायला मी रथ हाकारून नगराकडे निघालो. जिकडे तिकडे शोकमग्न स्त्रियांचे जथे हिंडत होते. त्या सर्व स्त्रियांना एकत्र व्हायला मी सांगत गेलो. एके ठिकाणी बर्‍याचश्या बैलगाड्या दिसल्या. माझा रथ तिथे पोचताच तिथून काही स्त्रियांनी पोबारा केला. "अभीर स्त्रिया आहेत त्या" कुणीतरी म्हणाले. जवळ जाऊन बघतो, तो गाड्यांमधे मूल्यवान वस्त्राभूषणे, सोन्या-चांदीची भांडी वगैरे भरलेले होते.

सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग २)

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 03/08/2013 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १) http://www.misalpav.com/node/25292 ------------------------------------------------------------------------------- ४. अभीराणी उवाच : अभीरमन्युशी माझं लग्न झाल्यावर त्यानं माझं आधीचं 'शतगोणी' हे नाव बदलून 'अभीराणी ' ठेवलं.