Skip to main content

इतिहास

सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १)

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 28/07/2013 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रोय' (भाग १) अर्जुनाने केलेल्या ‘सुभद्राहरणा’तून सरतेशेवटी अर्जुनाचा दारूण पराभव आणि यादवांचा सर्वनाश कसा घडून आला, याची ही कथा: ------------------------------------------------------------------------ १. अभिरमन्यु उवाच: सुभद्रेला त्या नराधमापासून झालेल्या बाळाचे नाव ‘अभिमन्यु’ ठेवल्याचे कळले, तेंव्हा मी थोडासा सुखावलो खरा, पण ते क्षणभरच. त्या नराधमाविषयीचा माझा संताप लगेचच उफाळून आला, आणि माझी प्रतिज्ञा आणखीनच बळकट झाली. … माझी प्रिय सुभद्रा. माझी बालसखी.

रेषा आणि लढाया

लेखक प्रसाद साळवी यांनी शुक्रवार, 26/07/2013 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
त्वेषाने त्या भांडत होत्या रेघोट्यांच्या मधल्या जागा एकसंध धरतीला तोडीत जशा उन्हाळी सलत्या भेगा पुन्हा एक त्यांना होण्याला दोनच रस्ते आता उरती पाऊस पडून चिखल होणे किंवा उन्हाने होणे रेती

थरारक पण धमाल गंमतीशीर, दुसर्‍या महायुद्धातील एक पान --अंक २

लेखक मन यांनी सोमवार, 22/07/2013 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 1: http://misalpav.com/node/25241 पुजालोच्या खाजगी आयुष्याबद्दलः- त्याने शाळा अर्धवट सोडली होती. अनेक लहानमोठी कामे तो शिकला होता. कधी हार्डवेअरच्या दुकानात काम कर तर कधी पोल्ट्री फार्म शिक असे त्याचे सुरु होते. वडलांनी मागे थोडिफार संपत्ती सोडली होती. पण स्पॅनिश युद्धादरम्यानच्या काळात तिथल्या कामगारांनी ताब्यात घेतली. स्पॅनिश यादवी युद्धात एका बाजूला इटाली- नाझी समर्थित फॅसिस्ट गट होता, तर दुसरीकडे रशिया समर्थित कम्युनिस्ट होते.

थरारक पण धमाल गंमतीशीर, दुसर्‍या महायुद्धातील एक पान --अंक १

लेखक मन यांनी सोमवार, 22/07/2013 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
सत्य कल्पना करु शकाल त्याहून थरारक, विचित्र असतं असा एक वन लायनर फार पूर्वीपासून ऐकत आलोय. त्या फक्त म्हणायच्या गोष्टी आहेत असे पूर्वी वाटे. पण एक सत्यकथा हाताला लागली आणि काहीही तिखट मीठ न लावता जे जसं आहे ते तसं मांडलं तरी ते किती थरारक, रोमांचकारक, विचित्र आणि धम्माल गंमतीशीरही असू शकतं हे अनुभवलं. एक बरचसं अनवट, अल्पपरिचित किंवा अपरिचित असलेलं भूतकाळातलं पान जे जसं आहे ते जवळपास जशाला तसं भाषांतरीत करतोय विकिपिडियातून. . कल्पना करा. दुसरे महायुद्ध सुरु आहे आणि तुम्ही जर्मन सैन्याच्या pay roll वर आहात. ब्रिटनवगलता इतर युरोपमेनलँडवर नाझींचा ताबा आलेला आहे.

काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग ३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 20/07/2013 18:20 या दिवशी प्रकाशित केले.

काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग २

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 16/07/2013 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग १ काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग २ अ‍ॅबिसिनिया.......

आनंदाचे डोही आनंद तरंग (तीन)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 14/07/2013 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
उनक जे समोर आहे ते बिनशर्त खाणे हा बायकोच्या जाचातुन सुटायचा सर्वोत्तम मार्ग आहे. तीने जे बनवले ते बिनशर्त खाल्ले की मग तक्रारीला जागाच रहात नाही. पण मुकाट खायला तुमचे मन धजवत नाही. आणि "तुम्हाला माझे कौतुकच नाही" असे म्हणत बायको हॉटेल मधुन पार्सल आणु देत नाही. आपले लगाम बायको कडे आहेत हे आपण उघडपणे नाकारतो (किंवा चारचौघात तसे कबुल करायला लाजतो). पण त्या मुळे सत्य लपुन रहात नाही आणि मग चारचौघात बायकोच्या इशार्‍यावर नाचत नाही हे दाखवणार कस?

काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग १

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 12/07/2013 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग १ होजाने अल्लाचा प्राण वाचविला त्याची गोष्ट - बायझिडच्या मशिदीजवळ एका मदरसेत म्हातारा ‘होजा’ लहान मुलांना मोठ्या तन्मयतेने शिकवीत असे. सर्व पुस्तकांचा राजा ‘कुराण’ त्या लहानग्यांना शिकवताना त्याचा ऊर आभिमानाने भरुन येत असे तर कधी कधी त्याच्या डोळ्यात पाणी तरळल्याचाही भास होई.