अनेक सर्व शक्तिमान देशांच्या अहंकाराची थडग चिमुकल्या आणि लौकिकर्थाने कमजोर देशांमध्ये सापडतात. औरंगझेब आणि त्याच्या उद्दाम सरदारांची ज्याप्रमाणे महाराष्ट्रात सापडतात तशी.. सर्व शक्तिमान अमेरिकेला तर या नियमाने अनेक वेळा तडाखा दिला आहे. मग ते विएतनाम युद्ध असो किंवा इराक युद्ध असो. रशिया सारख्या प्रचंड लष्करी बळ असणार्या देशाचे पण अफगाणिस्तान मध्ये वस्त्र हरण झाले आणि त्याना तिथून माघार घ्यावी लागली. कीबहुना या अफगाण युद्धाने रशियन कमजोर अर्थव्यवस्थेवर इतका ताण पडला की तत्कालीन सोविएत यूनियन चे विघटन होण्याला जी अनेक कारण कारणीभूत ठरली त्यात या अफगाण युद्धाचा क्रम बराच वरचा आहे. १९६२ मध्ये भारताचा दारुण पराभव करणार्या चिनी लाल सैन्याला १९७९ मध्ये विएतनाम मध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागला.
या नियमाला सिद्ध करणारा अपवाद सापडणे तसे कठीण. अगदी आपला भारत देश पण. कालच शूजीत सरकार या अफलातून दिग्दर्शकाचा 'मद्रास कॅफे' हा १९८७ मधील भारतीय लष्कराच 'विएतनाम' प्रभावी पणे चित्रित करणारा चित्रपट पाहिला आणि लष्करी बळावर आजूबाजूच्या चिमुकल्या देशाना चिरडून टाकु हा गंड बाळगण्याचे भीषण परिणाम दोन्ही देशाना कसे भोगावे लागतात याची अजुन एकदा आठवण zआलि.
आंतरराष्ट्रीय घटनांच्या पार्श्वभूमीवर चित्रपट बनण्याची वेळ भारतीय चित्रपट सृष्टीत जवळ जवळ नाहीच. ( माझया मते निव्वळ युद्ध पट या श्रेणीत मोडत नाहीत. त्यामुळे बॉर्डर आणि हकिकत हे बाद). कबीर खान चा 'काबुल एक्सप्रेस' हा नियम सिद्ध करणारा अपवाद. 'मद्रास कॅफे' हा शूजीत सरकार या दिग्दर्शकाचा दीर्घ कारकिर्दीतला हा केवळ तिसरा चित्रपट. त्याच्या पहिल्या 'यहाँ' चित्रपटात धागधगत्या काश्मीर च्या पार्श्वभूमीवर एक भारतीय मेजर आणि एक काश्मीरी मुलगी यांच्यातली प्रेम कहाणी तरल पणे मांडली होती. विकी डोनर हा स्पर्म डोनेशन वर खुष्खुशीत भाष्य करणारा त्याचा दुसरा चित्रपट बॉक्स ऑफीस वर पण चांगलाच चालला होता. विकी डोनर नंतर मोठे स्टार घेऊन सर्व सामन्यांची मनोरंजनाची मागणी पूर्ण करणारा चित्रपट बनवण्याची सेफ बेट घेण्याची संधी सोडून त्याने भारताने श्रीलंका प्रश्नात केलेला हस्तक्षेप व त्या पार्श्वभूमीवर राजीव गांधींची झालेली हत्या हा चाकोरीबाहेरचा विषय निवडून त्याने आपले वेगळेपण सिद्ध केले.
कहाणी सुरू होते ती रॉ ही भारतीय गुप्तहेर संघटना मेजर विक्रम सिंग या आपल्या अधिकार्याला तमिळ प्रश्नात वाढणारे अण्णा (प्रभाकारन या तमिळ दहशतवाद्यावर बेतलेल पात्र ) चे वर्चस्व कमी करून त्याला जाफना या तामिळ बहूल भागात एक दुसरा राजकीय पर्याय उभा करण्याच्या कामगिरीवर पाठवते. विक्रम सिंग जेंव्हा श्रीलंकेत प्रवेश करतो तेंव्हा सलामिलाच त्याला अनेक भारतीय शांती सेनेतील सैनिकांचे मृतदेह दिसतात. आपल्या पुढयात काय वाढून ठेवल आहे याची चुणूक विक्रम सिंग ला मिळते. अण्णा ला राजकीय पर्याय उभा करताना त्याला हे ही जाणवते की फितुरी आणि दगाबाजी यानी भारतीय राजकीय आणि लष्करी उद्दिष्टांचा कणाच मोडून काढला आहे.
तरीही विक्रम सिंग आपले सर्वस्व पणाला लावून देशासाठी लढतो. पण त्याला त्याची किंमत आपल्या वैयक्तिक आयुष्यात मोजावी लागते. तरीही विक्रम सिंग तमिळ दहशतवादी संघटनेची पाळमुल खणुन काढण्याच आपल काम चालूच ठेवतो. ही तमिळ संघटना श्रीलंके मध्ये शांती सैन्य पाठवणार्या आपल्या माजी पंतप्रधान ला मरणार आहे अशी त्याला खात्री पटत चालली आहे. दरम्यान अंतर्गत फितूरि, श्रीलंका सरकारचे असहकाराचे धोरण, तामिलांचा कडवा प्रतिकार आणि झालेली बेसुमार हानी यामुळे भारत आपली फौज माघारी घेते.विक्रम सिंग आपल्या नेत्याची हत्या टाळण्यात यशस्वी होतो? अण्णा ला राजकीय पर्याय उभा राहतो? विक्रम सिंग चे पुढे काय होते? या प्रश्नांची उत्तर सत्य घटनेवर आधारित असलेला चित्रपट ( संबंधित निर्माते आणि दिग्दर्शक याचा इनकार करत असले तरी)देतो. आणि ही उत्तर नक्कीच आपला राष्ट्रीय गर्व वाढवणारी नाहीत.
चित्रपट सर्वच आघाडीवर सरस आहे. कुठलेही पात्र विनाकारण घुसडलेले वाटत नाही. ना मनोरंजक गाणी, ना कॉमिक रिलीफ ना अंगप्रदर्शन त्यामुळे मनोरंजन हा शुद्ध हेतू बाळगून जाणार्या पब्लिक ने इकडे न गेलेलेच बरे. विक्रम सिंग ला त्याच्या कामात मदत देणारी पत्रकार नर्गिस फाखरी ने चांगली केली आहे. ' Criticizing my national policies doesn't make me anti national" हा तिचा संवाद बरेच काही सांगून जातो. व्यवसायिक गुप्तहेर अधिकार्याच्या भूमिकेत जॉन अब्राहम चक्क शोभून दिसतो. माठ अभिनेता म्हणून ओळखल्या जाणार्या या अभिनेत्याने प्रोड्यूसर म्हणून वेगवेगळे विषय निवडून चांगलीच चमक दाखवली आहे. शंतनू मोइत्रचे क्रेडिट्स च्या वेळी येणारे मौला हे गाणे अप्रतिम. युद्दगरस्त श्रीलंकेला कॅमेरया मध्ये अप्रतिम पणे बद्ध करणार्या कॅमरा मन ला सलाम.
पण चित्रपटाचे खरे नायक आहेत ते प्रचंड रिसर्च करून पटकथा लिहिणारी सोमनाथ डे आणि शुभेन्दु भट्टाचार्य ही जोडगोळी व दिग्दर्शक शूजीत सिर्कार. जर विकी डोनर ची पुण्याई नसती तर कदाचित हा चित्रपट पडद्यावर आला असता की नाही याबद्दल शंका घ्यायला वाव आहे.
चित्रपट हे मॅक्रो पातळीवर नसले तरी माइक्रो लेवल ला खूप मोठे बदल घडवून आणू शकतात हे माझे मत. एसी कॅबिन मध्ये बसून भरल्या पोटी भारताने पाकिस्तान वर त्वरित हल्ला चढवून पाकिस्तान नष्ट करावा अशी स्टेटस फेस्बूक वर अपडेट करणार्यांपैकी काही लोका ना तरी युद्ध हे किती वाईट असते आणि आपले काहीच स्टेक वर नसताना प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणार्याला किती तरी गमवावे लागते याची जाणीव होऊन त्यानी युद्धखोरीची वांझ भावना बदलली तरी मद्रास कॅफे हा १०० कोटी कमावणार्या इतर चित्रपट पेक्षा यशस्वी होईल.
मिसळपाव
चित्रपट नक्कीच बघितला जाईल.
चांगले परिक्षण
In reply to चांगले परिक्षण by अमोल खरे
सहमत.
छान परिक्षण.
परीक्षण आवडले
In reply to परीक्षण आवडले by पैसा
अनेकदा आपला देश हा बळी आहे
In reply to अनेकदा आपला देश हा बळी आहे by पिंपातला उंदीर
अछ्छा म्हणजे (CC0Q9QEwAA&dur
In reply to अछ्छा म्हणजे (CC0Q9QEwAA&dur by टवाळ कार्टा
लिंक गंडली
In reply to लिंक गंडली by टवाळ कार्टा
POK आणि COK चा नकाशा पहावा
In reply to अनेकदा आपला देश हा बळी आहे by पिंपातला उंदीर
गंड?
In reply to गंड? by प्रभाकर पेठकर
पाकिस्तानने लचका तोडला? की
In reply to पाकिस्तानने लचका तोडला? की by उद्दाम
मला ज्ञात इतिहास....
In reply to मला ज्ञात इतिहास.... by प्रभाकर पेठकर
-१
In reply to -१ by सुनील
बर्र बुवा!
In reply to -१ by सुनील
+११११. लांब जायची गरज नाही.
In reply to +११११. लांब जायची गरज नाही. by पिंपातला उंदीर
नक्की कुठे ?
In reply to मला ज्ञात इतिहास.... by प्रभाकर पेठकर
तुमच्या वयाचा आणि कर्तुत्वाचा
In reply to तुमच्या वयाचा आणि कर्तुत्वाचा by पिंपातला उंदीर
काश्मिर..
In reply to अनेकदा आपला देश हा बळी आहे by पिंपातला उंदीर
पुन्हा काही अर्धसत्ये...
...पण १९७१ मध्ये आपण पाकिस्तान चे २ तुकडे केले होते....भारताच्या कारवाईने बांगलादेश स्वतंत्र राष्ट्र म्हणून आस्तित्वात आला. पण त्या अगोदर पाकिस्तानने तेथे काय केले आणि त्याचे भारतावर काय परिणाम झाले याबद्दलची सत्य परिस्थिती जगजाहीर असतानासुद्धा असले अतीटोकाचे आणि एकतर्फी विधान ???जेंव्हा आपले ५ जवान मारले गेले त्या आधी भारतीय सेना ने पाक व्याप्त काश्मीर मध्ये घुसून ४ आतँकवाड्यांची गाठडि वळली होति.म्हणजे आतंकवादी आणि एखाद्या सार्वभौम राष्ट्राचे सैनीक एकाच तराजूत मोजायचे काय? शिवाय एका राष्ट्राला आतंकवादी पोसण्याची आणि त्यांना दुसर्या राष्ट्रात घुसवण्याची परवानगी आहे पण दुसर्याने त्याबाबत काही कारवाई केली तर नाराज व्हायची तरतूद पण आहे. या प्रकाराला मराठीत कांगावा आणि इंग्लीश्मध्ये हायपोक्रसी म्हणतात. भारताचे दुर्दैव असे की (१) भारताला अश्या हायपोक्रसीत पीएच् डी केलेले शेजारी आहेत, (२) त्यांचा तात्विक मुकाबला करण्यात भारत सतत कमी पडतो आहे आणि (३) शिवाय वर तथाकथीत भारतिय "विचार्वंत" आपले शेजारी आणि त्यांचे भाडोत्री आतंकवादी यांची तळी उचलून धरण्यासाठी चढाओढ करत असतात ! हे केवळ माझे स्वतःचेच मत नाही तर याबाबत चर्चा करत असताना पुढारलेल्या आणि पुरोगामी मानल्या गेलेल्या देशाच्या सुशिक्षीत नागरिकांनी ह्या वस्तुस्थितीबद्दल अनेकदा आश्चर्य व्यक्त केले आहे आणि काहीवेळेस तेथे हजर असलेल्या शेजारी राष्ट्राच्या नागरिकाने खुशीने डोळ्यांची सूचक हालचाल करत गप्प राहणे पसंत केलेले आहे. केवळ थक्क झालो आहे !In reply to पुन्हा काही अर्धसत्ये... by डॉ सुहास म्हात्रे
जर तुम्हाला असे वाटत असेल की
In reply to जर तुम्हाला असे वाटत असेल की by पिंपातला उंदीर
???
In reply to ??? by मालोजीराव
मालोजि राव आपण ते युद्ध
In reply to मालोजि राव आपण ते युद्ध by पिंपातला उंदीर
डेव्हिन हेगर्टी
In reply to डेव्हिन हेगर्टी by मालोजीराव
http://www.rediff.com/news
In reply to http://www.rediff.com/news by पिंपातला उंदीर
डेव्हिन हेगर्टी आंतरराष्ट्रीय
In reply to डेव्हिन हेगर्टी आंतरराष्ट्रीय by मालोजीराव
Perceptions. सत्य आपल्याला
In reply to Perceptions. सत्य आपल्याला by पिंपातला उंदीर
वर म्हणालात विकिपेक्षा
In reply to जर तुम्हाला असे वाटत असेल की by पिंपातला उंदीर
मिपावरील नवीन साथ
In reply to मिपावरील नवीन साथ by पुण्याचे वटवाघूळ
खरच तस नाही. त्यांच्या
In reply to जर तुम्हाला असे वाटत असेल की by पिंपातला उंदीर
कारगिल मधली काही शिखरे
In reply to कारगिल मधली काही शिखरे by श्रीरंग_जोशी
मान्य. पण कारगिल मध्ये
In reply to मान्य. पण कारगिल मध्ये by पिंपातला उंदीर
गमावलेला पूर्ण भू भाग?
In reply to गमावलेला पूर्ण भू भाग? by श्रीरंग_जोशी
१९९९ नंतर पाकिस्तानी
In reply to १९९९ नंतर पाकिस्तानी by पिंपातला उंदीर
१९९९ नंतर पाक लष्कराविरुद्ध कारवाई?
In reply to १९९९ नंतर पाक लष्कराविरुद्ध कारवाई? by श्रीरंग_जोशी
भारतीय संसदेवर झालेला हलला,
In reply to भारतीय संसदेवर झालेला हलला, by पिंपातला उंदीर
खूप मोठा फरक आहे
In reply to जर तुम्हाला असे वाटत असेल की by पिंपातला उंदीर
...जर तुम्हाला असे वाटत असेल
...जर तुम्हाला असे वाटत असेल की ती कारवाई दहशतवाद्यानी केली तर तुम्हाला सलाम. ती कारवाई पाकिस्तानी सैनिक दलानी केली. BAT या पाथकानी.साहेब, या अमुल्य शिक्षणाबद्दल अनेकानेक धन्यवाद ! अशी विषय भरकटवणारी कॉमेंट (अशा गोष्टिबद्दल की जी वर्तमानपत्रातसुद्धा चावून चोथा झाली आहे) आली की समोरच्याला प्रतिवाद न सापडल्याने आता विवाद न करता वितंडवाद करायचा आहे हे आम्ही फार पूर्वीच शिकलोय... आणि माझा हा अंदाज खरेच चुकीचा असला तर तुम्ही प्रथम तुमचा प्रतिसाद (ज्यावर मी प्रतिसाद लिहिला) वाचावा आणि मग तुमचा स्वतःचा वरचा प्रतिसाद वाचावा अशी विनंती करतो. तोपर्यंत विनयाने एवढेच सांगतो की मी जे काही लिहिले आहे त्याच्या मागे आंधळी / भडक देशभक्ती नसून काही तपे अनेक संबद्धीत लोकांबरोबरच्या प्रत्यक्ष संबद्धातून अनुभवलेले व ऐकलेले सत्य आहे. किमान दिवाणखान्यात बसून अथवा जालावरचा काही विदा वाचून बनवलेले मत तर आजिबात नाही याची खात्री असू द्यावी. जमल्यास वर सांगितल्याप्रमाणे करावे, मग बोलू. अन्यथा आमचा रामराम घ्यावा ही विनंती.In reply to अनेकदा आपला देश हा बळी आहे by पिंपातला उंदीर
सहमत..
अनेकदा आपला देश हा बळी आहे आणि समोरचा शत्रू हा आक्रमक हा गंड सर्वच देशात आढळतो.श्रीलंका प्रकरणात पण भारताने गरज नसताना शांति फौज पाठवून त्यांची मुस्काटदाआबी केली. खर तर तो श्रीलंकेचा अंतर्गत प्रश्न होता.ही वाक्ये फार विचारपुर्वक वाचली, आणि त्यात तथ्यांस जाणवला . आपण जे काही हलके पणाने वाचतो,जसे की आपण काश्मिर प्रश्न हा युनोत न्यायला नको होता...किंवा आपला देश हा दुसर्या देशामधे काहीही ढवळाढवळ करत नाही.... हे कदाचीत काहीसे खरे नसावे. पाकिस्तान हा आपला भारत देश सिंध वेगळे करण्यास फुस देतो हा आरोप कायम करतच असतो. सरबजीत सिंगा वरील आरोपा विषयी भारताने कधीही पक्का पावित्रा घेतला नाही. आपले गुप्तचर हे परदेशात काही प्रमाणात सक्रिय असतीलच. तसेच आपल्या आजच्या आतराष्ट्रीय सीमा ह्या ब्रिटीशा च्या साम्राज्यवादाचीच देण आहे. म्हणुन पुरवोत्तर राज्ये आज आपल्या भारतात आहेत.व त्यामुळेच चीनशी सीमावाद आहे.आनी जगात असा कोणताही देश नाही की त्याचा शेजारील देशाशी सीमावाद नाहि. खर्या गोष्टी जेव्हा अचुक सदंर्भ ग्रथं वाचायला मिळतील तेव्हाच त्या समजतात. नाहीतर एकीव माहीतीच्या आधारे फक्त रक्त उसळते. ( पण म्हणुन पाकिस्तान/चीन चे चुकत नाही असे नाही. त्यान त्याबद्दल किंमत चुकवाविच लागेल हा विश्वाचा नियमच आहे. आठवा १९५०-६० मधील अमेरीकेची आतर राष्ट्रीय ढवळाढवळ...व आजची त्या देशाची स्थिती.)उत्कंठा वाढवणारे परीक्षण
छान
कालच बघितला हा चित्रपट डोकं
चित्रपट सुंदर आहे
एक पॉलीटीकल थ्रिलर म्हणून
शान्ति सेना पाठवण्यामागची
In reply to शान्ति सेना पाठवण्यामागची by संपत
शांति सेना ने तामिळ
In reply to शांति सेना ने तामिळ by पिंपातला उंदीर
शांतिसेनेने लिट्टेला निश्चितच
छान परिक्षण
अजुन एक गोष्ट म्हणजे
In reply to अजुन एक गोष्ट म्हणजे by पिंपातला उंदीर
निर्वासित
In reply to अजुन एक गोष्ट म्हणजे by पिंपातला उंदीर
अमोल साहेब,
समर्थ राष्ट्र हे जेत्यांच असत्,पराभुतांच नाही.....
In reply to समर्थ राष्ट्र हे जेत्यांच असत्,पराभुतांच नाही..... by बाबा पाटील
++१
बघणार...!
चित्रपट चांगला आहे
In reply to चित्रपट चांगला आहे by अनुप ढेरे
+१
युद्ध हा रणनीतीचा
In reply to युद्ध हा रणनीतीचा by अवतार
+१००%
In reply to +१००% by डॉ सुहास म्हात्रे
नुकसान
In reply to नुकसान by सुनील
बाकी त्यांचे अतिरेकी तूर्तास
बाकी त्यांचे अतिरेकी तूर्तास आपल्यापेक्षा त्यांचेच जास्त नुकसान करताहेत, हे त्याने सांगितले नसेलच तुम्हाला!बादवे, माझा मुद्दा आपलेच लोक आपल्या देशाचे कसे नुकसान करतात याबाबत होता. त्यांचे लोक त्यांचे काय करतात याबाबत नव्हता. त्यांच्या अतिरेक्यांनी त्यांच्या देशात अतिरेकी कारवाया केल्या तर त्यामुळे आपल्या देशातले लोक आपलेच नुकसान करतात ते योग्य ठरते असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? म्हणजे, ते नाही का स्वतःच्या पायावर गोळी मारून घेत, मग आपणही आपणही आपल्या पायावर कुर्हाड मारून घेतली तर काय बिघडले असे म्हटल्यासारखे वाटत नाही काय? आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे जे वाक्य मी उद्धृत केले होते ते "कोणी कोणावर विश्वास ठेवण्यापेक्षा" जास्त "जगजाहीर सत्य आहे"... मुद्दा हा की "ते तुमच्या तोंडावर सांगूनही मला काही फरक पडणार नाही, ते तसेच चालूच राहील", इतका ठाम विश्वास त्यातून दिसतोय हे जास्त महत्वाचे. अर्थात शहामृगासारखे तोंड जमिनीत खुपसून सगळे आलबेल आहे असे म्हणायचे असले, तर... चालू द्या.दुसर्याच्या बोलण्यावर लगेच इतका विश्वास ठेऊ नका हो राजेसाहेब!बादवे... मी कोणत्याही एका राजकीय पक्षाचा समर्थक नाही... माझ्या बुद्धीने दिसलेल्या सगळ्या चुकाना चुका म्हणतो, सगळ्या चांगल्या कामांना चांगले म्हणतो... मग ते कोणत्या व्यक्तीने / पक्षाने केले हा मुद्दा मला गौण असतो... या सगळ्यांपेक्षा देश कितीतरी पटींनी जास्त महत्वाचा असे समजतो. गैरसमज नसावा :)परिक्षण आवडले
जेंव्हा आपले ५ जवान मारले
धाग्याचा काश्मिर झाला
In reply to धाग्याचा काश्मिर झाला by कपिलमुनी
१००%
हा राष्ट्रीय गर्व काय प्रकार
In reply to हा राष्ट्रीय गर्व काय प्रकार by llपुण्याचे पेशवेll
गर्व आहे मला मराठी असल्याचा.
In reply to गर्व आहे मला मराठी असल्याचा. by आदूबाळ
मग तो गर्व नाही तो अभिमान
In reply to गर्व आहे मला मराठी असल्याचा. by आदूबाळ
गर्व आहे मला मराठी असल्याचा.
गर्व आहे मला मराठी असल्याचा.हे हिंदीयुक्त मराठी झाले ! मराठी "अभिमान" = हिंदी "गर्व" मराठी "गर्व" = हिंदी "घमण्ड"चित्रपट हे मॅक्रो पातळीवर
एसी ऑफिस मध्ये बसून युद्धाची
In reply to एसी ऑफिस मध्ये बसून युद्धाची by निनाद मुक्काम …
स्वतंत्र धागा
Yuri Bezmenov, a Russian born
In reply to Yuri Bezmenov, a Russian born by निनाद मुक्काम …
जस्ट शॉकींग !!
In reply to जस्ट शॉकींग !! by धर्मराजमुटके
धर्मराजमुटके
निनाद अप्रतिम प्रतिसाद !
In reply to निनाद अप्रतिम प्रतिसाद ! by अशोक पतिल
अशोक पाटील
In reply to अशोक पाटील by निनाद मुक्काम …
भारताच्या छोट्या पडद्यावर इतिहास ?
In reply to भारताच्या छोट्या पडद्यावर इतिहास ? by अग्निकोल्हा
अग्निकोल्हा पूर्णपणे सहमत !
छोट्या पडद्यावर इतिहास ह्या
एसी कॅबिन मध्ये बसून भरल्या