इंटरनेट.. गेल्या काही वर्षांत बहुधा सर्वात जास्त वापरलं गेलेलं आणि बोललं गेलेलं प्रकरण. इंटरनेटशी जोडला न गेलेला माणूस आणि डोंबिवली ते सीएसटी रेल्वे प्रवासात शेजारी बसलेल्या अनोळखी स्त्रीसोबत एक अक्षरही न बोलणारी स्त्री सापडणं निव्वळ अशक्य. इंटरनेट ने जग जवळ आणलं म्हणतात ते खोटं नाही. पूर्वी घरातला कोणी परदेशी गेला, की त्याच्या फ़ोनची वाट पाहत रात्री उशीरा पर्यंत जागं राहणं, आंतरराष्ट्रीय पोस्टकार्डाची वाट पाहणं इ इ. प्रकार या पठ्ठ्याने बघता बघता नाहीसे केले. आजकाल तर स्मार्टफ़ोन नामक प्रकाराचा कितका गाजावाजा झालाय, की फ़ेसबुक, ट्विटर, मायस्पेस, जिमेल, व्हॉट्सऍप ही नावं चिल्ल्या पिल्ल्या पोरांच्या तोंडी अगदी सहज बागडतात.
इंटरनेट इतकं वापरलं जातं खरं, पण त्याचा प्रारंभ, त्याचे निर्माते या गोष्टींकडे आपलं कधी फ़ारसं लक्ष जात नाही. द सोशल नेटवर्किंग डॉक्युमेंट्रीमुळे फ़ेसबुकचा जनक मार्क झुकरबर्ग वगळला, तर बाकी साईटकर्त्यांबद्दल आपल्याला माहितच नाही. इंटरनेटच्या जनकांबद्दल तर आपण अगदीच शून्य. कोण होती ही माणसं? काय विचार केला त्यांनी साईट तयार करताना? याचा आपण कधी विचारच करत नाही.
म्हणून या धाग्यात थोडंसं त्याच्या निर्मात्यांबद्दल..
इंटरनेटचा उदय
१९५० च्या दशकात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात आमुलाग्र बदल होऊ लागले होते. ब-याच नव्या साधनांचा आणि उपकरणांचा शोध लावला जात होता. त्यातच एक होता संगणक. संगणकाच्या शोधासोबतच त्याच्याशी निगडित अनेक बाबींवर संशोधन सुरू झालं होतं.
इंटरनेटची पायाभरणी केली ती प्रोफ़ेसर लिओनार्ड क्लाईनरॉक यांनी. प्रो.क्लाईनरॉक हे Henry Samueli School of Engineering and Applied Sciences मध्ये संगणकशास्त्राचे शिक्षक होते. कॉम्प्युटर नेटवर्किंग मध्ये त्यांनी बरीच वर्षं संशोधन केलं होतं. इंटरनेटचा आधीचा अवतार, ARPANET च्या निर्मितीत त्यांचा मोठा वाटा होता. जगातील पहिला इ-संदेश पाठवला गेला तो याच ARPANET वरून २९ ऑक्टोबर, १९६९ रोजी. "login" हा शब्द संदेश म्हणून पाठवायचा होता. परंतु lo पाठवले गेल्यानंतर अचानक system मध्ये बिघाड झाला आणि ती बंद पडली. त्यामुळे "lo" हा जगातला पहिला इंटरनेट संदेश ठरला.
यानंतर जगभर विविध लहान लहान नेटवर्क्स उभारले गेले. या नेटवर्क्सना एकमेकांशी जोडणी शक्य करणारं RAND नेटवर्क बनवलं पॉल बॅरन यांनी. त्याची सुधारीत आवृत्ती होती इंग्लंडच्या डोनाल्ड डेव्हियस यांनी बनवलेली Packet Switching पद्धती. ARPANET नंतर इंटरनेट जोडणीसाठी अनेक प्रोटोकॉल्स विकसित झाले, ज्यातला एक सध्याच्या इंटरनेट व्यवस्थेचा पाया ठरला, तो म्हणजे TCP/IP. TCP/IP वर संशोधन करून तो विकसित केला रॉबर्ट काह्न आणि व्हिंटन सर्फ़ या संगणक अभियंत्यांनी.
इंटरनेटच्या विकासातले महत्त्वाचे टप्पे -
१९६१ - पहिला Packet Switching चा थेअरी पेपर प्रकाशित.
१९६६ - ARPANET संशोधनाची सुरूवात.
१९६९ - ARPANET वरून पहिला संदेश.
१९७१ - Tymet या पहिल्या संपूर्णपणे Packet Switching वर आधारित नेटवर्कची सुरूवात.
१९७३ - CYCLADES नेटवर्कची स्थापना.
१९७४ - Telenet नेटवर्कची स्थापना.
१९७६ - X.25 प्रोटोकॉलचा प्रारंभ.
१९८० - Ethernet standards चे आगमन.
१९८१ - BITNET प्रस्थापित.
नेटवर्क्सची जोडणी आणि इंटरनेटच्या निर्मितीमधले मुख्य टप्पे -
१९८१ - Computer Science Network ची सुरूवात.
१९८२ - TCP/IP प्रोटोकॉल सूटचा वापर.
१९८२ - Simple Mail Transfer Protocol (SMTP) विकसित.
१९८३ - Domain Name System (DNS) विकसित.
१९८५ - पहिलं .com डोमेन स्थापन.
१९८६ - ५६ kb/s च्या NSFNET ची सुरूवात.
१९८८ - NSFNET ची १.५ mb/s ची सुधारित आवृत्ती.
१९८९ - Border Gateway Protocol (BGP)
१९९० - ARPANET बंद.
१९९१ - World wide web (www) ची सुरूवात.
१९९२ - Internet Society (ISOC) ची स्थापना.
१९९२ - NSFNET चा वेग वाढून ४५ mb/s झाला.
१९९३ - mosaic या पहिल्या वेब ब्राऊझरची निर्मिती.
१९९४ - Full text web search engines ची सुरूवात.
१९९५ - IPv6 ची कल्पना.
१९९९ - IEEE 802.11b वायरलेस नेटवर्किंगचा प्रारंभ.
२००० - डॉट कॉम बबल चा अनपेक्षित अस्त.
२००१ - नव्या डोमेन्सची सुरूवात.
इंटरनेटची पायाभरणी करणारे प्रोफेसर लिओनार्ड क्लाईनरॉक.
क्लाईनरॉक आणि त्यांचं संदेश प्रक्षेपण यंत्र.
RAND नेटवर्क जे जनक पॉल बॅरन.
Packet Switching चे जनक डोनाल्ड डेव्हियस
TCP/IP चे निर्माते - रॉबर्ट काह्न
TCP/IP चे निर्माते - व्हिंटन सर्फ़
(चित्रे आंतरजालावरून साभार.)
- क्रमशः
क्लाईनरॉक आणि त्यांचं संदेश प्रक्षेपण यंत्र.
RAND नेटवर्क जे जनक पॉल बॅरन.
Packet Switching चे जनक डोनाल्ड डेव्हियस
TCP/IP चे निर्माते - रॉबर्ट काह्न
TCP/IP चे निर्माते - व्हिंटन सर्फ़
(चित्रे आंतरजालावरून साभार.)
- क्रमशः
वाचने
11792
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
lo!
अगदि अगदि !
In reply to lo! by पैसा
अगदि अगदि !
In reply to lo! by पैसा
अगदि अगदि !
In reply to अगदि अगदि ! by जेनी...
अगदी अगदी!
In reply to अगदि अगदि ! by जेनी...
आवो सासुबै पोस्टच पडेना ...
In reply to अगदी अगदी! by पैसा
मेरा पती ' पती ' Smile ...
In reply to आवो सासुबै पोस्टच पडेना ... by जेनी...
उत्तम
जगातली व्यवस्था उलटीपालटी
+१११११
In reply to जगातली व्यवस्था उलटीपालटी by डॉ सुहास म्हात्रे
इंटरनेट.
पुढल्या भागाची आतुरतेने वाट बघत आहे...
सगळया प्रकारच्या अॅडिक्शस्न
मस्त सुरुवात रे.
छान आहे लेख
या एकूण प्रकाराबद्दल अगदीच
पुभाप्र!!
भाग्यवान कोणाला म्हणतात
त्याने वायरलेस मायक्रोफोन
नान्या, मस्तच रे..
पाव्हने ह्ये इंटारनेट कुठं
सुरवात अतिशय मस्त झाली आहे.
अजुन एक... या लेखामुळे कधी
+१
In reply to अजुन एक... या लेखामुळे कधी by मदनबाण
माहितीपूर्ण लेख. पुढील
जबरदस्त माहिती
+११११११११ ... लय भारी
हम्म्म.
विषयाशी संबंधित बाह्य दुवे (मराठी)