Skip to main content

इतिहास

तूने चुरया मेरे दिल का चैन - विवाहोत्सुकांसाठी एक नवा मंत्र आणि विवाहितांसाठी वरदान

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 13/12/2013 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
प्यारे गुरुजींना प्रज्ञा सांत कि असांत असा प्रश्र्ण पडला होता. या जगात काही प्रतिभा या सांत का असांत या वादाच्या पलिकडल्या असतात. या प्रतिभेतून निर्माण झालेल्या कलाकृतिंचा जमेल तेवढा अस्वाद घेणे इतकेच काय ते आपण सामान्य माणसे करु शकतो. अशाच एका अनंत गाण्याची मी आज तुम्हा रसिकंना ओळख करुन देणार आहे. ओळख अशा साठी की त्या गाण्याचे संपुर्ण रसग्रहण करणे या पृथ्वीवरच्या कोणत्याही मानवाच्या आवाक्या बाहेरचे काम आहे. ते गाणे सांतही आहे आणि असांतही. गाणे संपते म्हणुन सांत पण संपल्या नंतर ते अनंत काळ आपल्या मनाचा ताबा सोडत नाही म्हणुन अनंत. या गाण्याचे कवी, संगीतकार व गायिके बद्दल मला काही माहित नाही.

लाल निळ्या रंगाचा इंगा

लेखक योगविवेक यांनी बुधवार, 11/12/2013 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
लाल निळ्या रंगाचा इंगा  तंजावूरच्या तमिल विश्वविद्यालयाचा भव्य प्रांगण. ओकसर व मी तेथील मॅन्युस्क्रिप्ट डिपार्टमेंटच्या हेडना  भेटायला आम्ही जूनच्या घामफोडू गरमीत डॉ. अदियमन यांच्या ऑफिसचा शोध घेत दुसऱ्या मजल्यावर पोहोचतो; चौकटीच्या बुशकोटातील व्यक्ती म्हणते झाले, 'येस व्हाट डू यू वांट? ' कम टू मीट यू सार.. ' ओके. टेल... आम्ही काही लोक पुण्यातील इंडॉलॉजिकल विषयक अभ्यास करत आहे. काही हस्तलिखिते आम्ही मिळवली आहेत. त्याचे विश्लेषण करायला  आपल्या विश्वविद्यालयात सोय करता येईन का यावर चर्चा करायला आपण थोडा वेळ द्याल अशी आशा आहे.

'आणि मिळवा एक चित्र' चा निकाल

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 09/12/2013 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भः http://www.misalpav.com/node/26057 निकालास बराच उशीर होत असल्याबद्दल क्षमस्व. आमच्या विनंतीस मान देऊन मिपाकरांनी प्रेमाने उतमोत्तम, अभ्यासपूर्ण प्रतिदाद दिले, त्याबद्दल सर्वांचे आभार. सर्वच प्रतिसाद मननीय आहेत, त्यात डावे उजवे ठरवणे अवघड. तरी त्यातल्या त्यात निवड करणे क्रमप्राप्त असल्याने (एकाच्या ऐवजी) तीन विजेत्यांना मी चित्र देणार आहे: वल्ली, पैसा आणि प्रसाद गोडबोले. वल्ली यांनी तात्कालीन राजकारण, शत्रु-मित्र राज्ये, भूगोल इ.

टेरीचा बाश्शाखान : रोमांचकारी अनुभव !

लेखक सुधीर मुतालीक यांनी रविवार, 08/12/2013 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
असे माझे होते कधी कधी ! मित्राच्या आग्रहाखातर एखादी गोष्ट केली जाते किंवा बघितली जाते. माझ्या दृष्टीने ती गोष्ट फारशी दखलपात्र नसेल, माझी रुची नसेल. पण झाल्यावर वा बघितल्यावर असे वाटते की आपण हे केले नसते तर आयुष्यातल्या केवढ्या मोठ्या आनंदाला मुकलो असतो.…. गेल्या आठवड्यात असेच घडले. ज्येष्ठ पत्रकार, भास्कर समूहाच्या दिव्य मराठीचे मुख्य संपादक पद्मश्री कुमार केतकर माझे स्नेही आहेत. "खास एवढ्यासाठी यावे लागले तरी ये तुझी मुंबई वारी व्यर्थ जाणार नाही हे निश्चित." निमंत्रण होते एका माहितीपटाच्या सादरीकरणाचे.

युद्धकथा -१० फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर. भाग - ३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 05/12/2013 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
युद्धकथा १० - फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-१ युद्धकथा १० - फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-२ Simple, Free Image and File Hosting at MediaFire युद्धकथा -१० फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर. भाग - ३ हिमलरने त्याच्याकडे एकदा पाहिले व त्या कागदावरुन नजर फिरवली.

युद्धकथा १०- फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 04/12/2013 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
युद्धकथा १०- फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-१ युद्धकथा -१० फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर. भाग - २ Simple, Free Image and File Hosting at MediaFire .......ज्या इस्पितळात कर्स्टन त्याचे प्रशिक्षण घेत होता तेथे हेलसिंकीचा प्रसिद्ध डॉक्टर, डॉ. कोलँडर नियमीत येत असे.

खाद्यसंस्कृती पुणेकरांची

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 18/11/2013 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
"ऐ कंबख्त तुने पेयिच नै " असे वारंवार ऐकवणार्‍या एका मित्राच्या खास आग्रहास्तव एके दिवशी धीर करुन नगरातल्या जगप्रसिद्ध लस्सीच्या दुकानात जाउन पिउन आलो. लस्सी. लस्सी पिउन आलो. उगा भलते संशय नकोत. ऑस्कर वाइल्ड (हा गे होता) एकदा फ्रान्समधल्या एका प्रसिद्ध कुंटणखान्यातुन तोंडात मारल्यासारखा चेहरा करुन बाहेर पडला होता. बरोबर आहे गाढवाला गुळाची चव काय तशी "आदमी हु आदमी से प्यार करता हु" म्हटल्यावर मग बाई ती फ्रान्समधल्या जगप्रसिद्ध वेश्यागृहातली असली तरी काय फरक पडतो. आमचेही तसेच झाले. म्हणजे कुंटणखान्यातुन बाहेर पडुन नाही. लस्सीगृहातुन बाहेर पडुन. तोंड कडु झाले.