Skip to main content

इतिहास

वसाहत ते महाबलाढ्य राष्ट्र - ४

लेखक श्रीरंग_जोशी यांनी सोमवार, 09/03/2015 01:38 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचे भाग - , , व्यवसायाने पूर्णवेळ सैनिक नसणाऱ्या बंडखोरांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध युद्ध सुरू तर केले होते पण ते जिंकणे फारच अवघड होते कारण त्या काळात ब्रिटिश सैन्य जगात सर्वोच्च स्थानावर होते. तरी पण काही घटकांमुळे ब्रिटिश सैन्याला तोंड देता येईल असे सामर्थ्य निर्माण झाले होते, हिंमत, नेतृत्व, लढताना आजवर न वापरल्या गेलेल्या रणनीती अन नव्याने बनलेली अमेरिकन अस्मिता.

क्षमा परमो धर्म: - राजा कुशनाभच्या मुलींची कथा

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 07/03/2015 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
क्षमा दानं क्षमा सत्यं क्षमा यज्ञाश्च पुत्रिकाः I क्षमा यशः क्षमा धर्मः क्षमया विष्ठितं जगत्II (वाल्मीकि रामायण बाल कांड ३३/८) क्षमा दान आहे, क्षमा सत्य आहे, क्षमा यज्ञ आहे, क्षमा यश आहे, क्षमा धर्म आहे. क्षमेवरच हे सर्व जगत् टिकून आहे." ॥ ८ रामधारी सिंह यांनी आपल्या कवितेत लिहिले आहे: क्षमा शोभती उस भुजंग को जिसके पास गरल हो उसको क्या जो दंतहीन विषरहित, विनीत, सरल हो। क्षमा हे माणसाचे भूषण आहे. दुर्बल माणूस अन्याय सहन करतो, तो क्षमा करू शकत नाही. किंवा त्यांनी केलेल्या क्षमेला कोणी महत्व ही देत नाही.

छत्रपती शिवाजी महाराज आणि कविराज भूषण

लेखक सव्यसाची यांनी गुरुवार, 19/02/2015 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा! साधारण ५-६ वर्षापूर्वी रायगडला आमच्या ग्रुप ने भेट दिली होती. त्या भेटीमध्ये कविराज भूषण यांचे छंद आणि त्यातील लय यांच्या प्रेमात पडलो. परत आल्यावर भारत इतिहास संशोधक मंडळातील ग्रंथालयात 'शिवाबावणी' आणि 'शिवराज भूषण' चा शोध घेतला आणि बरेचसे छंद लिहून काढले. आज शिवजयंती निमित्त त्यातील काही इथे देण्याचा प्रयत्न करेन. या कवितेतील बऱ्याच शब्दांचा अर्थ मला माहिती नाही कारण त्या भाषेशी माझी इतकी जवळीक नाही. परंतु, कवितांचा साधारण अर्थ या निमित्ताने सांगण्याचा जरूर प्रयत्न करेन. १. ही कविता सगळ्यांनाच माहिती असेल.

हर्षयुक्त उमापती

लेखक देवदत्त परुळेकर यांनी मंगळवार, 17/02/2015 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज महाशिवरात्री शिवाचे वर्णन करणारा संत नरहरी सोनार महाराजांचा हा लोकप्रिय अभंग आहे - भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥ गज चर्म व्याघ्रांबर । कंठीं शोभे वासुकी हार ॥ २ ॥ भूतें वेताळ नाचती । हर्षयुक्त उमापती ॥ ३ ॥ सर्व सुखाचें आगर । म्हणे नरहरी सोनार ॥ ४ ॥ या अभंगात महाराज शिवाच्या रुपाचे तसेच स्वरुपाचेही वर्णन करतात. कसा आहे तो महादेव ? नरहरी सोनार महाराज वर्णन करतात - भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥ शिवाने भस्माची उटी अंगाला फासली आहे.

वैभवशाली वाडा जुना

लेखक प्रमोद देर्देकर यांनी बुधवार, 11/02/2015 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
वैभवशाली अस्तित्वाच्या उध्वस्त खुणा, पदोपदी सांगत असतो तो वाडा जुना, ढासळलेल्या भिंती अन ओसाड जोतं, गवताच्या पातीशी आता जडलंय नातं, दरवाजांच्या बिजागरांचे ते भयाण किरकिरणं, अन वाळवीच्या रांगांनी ते वासे पोखरणं, कोळयांची जळमटं अन धुळिचे साम्राज्य, असाह्य कुरकरणं, जिन्यातल्या पायर्‍यांचं कित्येक आप्तांची वंशावळ अंगावर खेळवली यानं, डावपेच, शिकार, फितुरी सगळं पाहिलंय यानं, आत्मक्लेषाच्या खुणा झेलत जगतोय जिणं, मातीशी संग होताच, शेष ते ना राहील भग्न, कोणा एके काळी झडत असतील नौबती, अन कोस कोस असेल त्याच्या श्रिमंतीची महती, आज खंगला असेल, मोडकळीस आला असेल, तरीही, वैभवशाली अस्तित्वाच्या उध्व

वैदिक काळातील वीरांगना

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 09/02/2015 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
ऋग्वेद वाचीत असताना, एका अनाम वीरांगनेने गाजवलेल्या पराक्रमाची गाथा सापडली. या अनाम वीरांगनाचे नाव कुणाला ही ठाऊक नाही. तिची ओळख तिच्या पतीच्या नावानेच. वैदिक काळात गायी हेच धन. गौ धन पळविण्या साठी शत्रू किंवा दस्यू नेहमीच आक्रमण करायचे. आर्य आणि अनार्य दस्युनीं मिळून गौ धन चोरण्यासाठी आक्रमण केले. गौ धन पुन्हा मिळविण्यासाठी सेनापती मुद्‌गल याने शत्रूवर आक्रमण कण्याचा निश्चय केला. त्याची पत्नी मुद्गलानी ही त्याच्या सोबत शत्रूचा सामना करण्यासाठी रणांगणावर अवतरली. तिने एका पुष्ट बैलाला रथाच्या जुव्याला बांधले. जोरदार आरोळी ठोकत तिने तुफान वेगाने रथ हाकला.

नरहरी सोनार हरीचा दास

लेखक देवदत्त परुळेकर यांनी शनिवार, 07/02/2015 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज संत नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी (माघ वद्य तृतिया). त्यांना भावपूर्ण आदरांजली. वारकरी संत मंडळात विविध जातीजमातीचे संत आहेत. विविध व्यवसाय करणारेही संत आहेत. बहुतेक संत प्रपंच करीत परमार्थ साधनाही करीत होते. गोरा कुंभार, सावता माळी, सेना न्हावी यांच्या नावातच त्यांचा व्यवसायही दडला आहे. नरहरी महाराज हे सुवर्णकार जातीतले होते. वाड्‌.मयेतिहासात त्यांचा ’नरहरी सोनार’ असा उल्लेख केला जातो. यादवकालात शिवाचे उपासक ’शैव’ आणि विष्णूचे उपासक ’वैष्णव’ या दोन्ही संप्रदायांचा विशेष प्रभाव होता.

कलर्स वाहिनी वरची मालिका: चक्रवर्तीन अशोक सम्राट!

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 06/02/2015 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
स्टार प्लस वरील महाभारताची आपली चर्चा चांगली रंगली होती. महाभारत चा शेवटचा एपिसोड संपेपर्यंत चर्चा सुरु राहिली होती. आता नुकतीच कलर्स या वाहिनीवर "चक्रवर्तीन अशोक सम्राट" ही मालिका सुरु झाली आहे आणि सोम-शुक्र रात्री ९ वाजता. चक्क ५० मिनिटे हि मालिका दाखवली जात आहे. सुरुवातीची ३५ मिनिटे एकही ब्रेक नसतो. सुरुवातीचे तीन एपिसोड झकास जमून आले आहेत. पहिल्याच तीन भागात मराठीतले कसलेले कलाकार आपला सुंदर अभिनय सादर करत आहेत. मनोज जोशी चाणक्य बनलाय. समीर धर्माधिकारी बिंदुसार झालाय, पल्लवी सुभाष धर्मा/शुभ्रदंगी झालीय.

वै. विष्णुबुवा जोग महाराज

लेखक देवदत्त परुळेकर यांनी बुधवार, 04/02/2015 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
विष्णुबुवा जोग महाराज यांची आज पुण्यतिथी (गुरुप्रतिपदा) त्यांना भावपूर्ण आदरांजली. ते नाशिकला रामकुंडावर स्नानासाठी गोदावरीमध्ये उभे राहिले. तीरावरील तीर्थोपाध्याय संकल्प सांगू लागला - " पापोहं पापकर्माहं पापात्मा पापसंभव: ॥ बुवा एकदम त्याच्यावर खेकसले. "मी पापीही नाही, पापकर्मीही नाही ! दुसरे काय म्हणायचे असेल ते म्हणा, एवढा हा संकल्प उच्चाराल, तर खबरदार !" कोण होते हे बुवा ? या दुर्लभ संत पुरुषाला विष्णुबुवा जोग या नावाने ओळखतात.