Skip to main content

इतिहास

बलबन का मकबरा

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शुक्रवार, 21/11/2014 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
क़ुतुब मीनारपासून थोड्याच अंतरावर महरौली Archeological Park आहे. तिथे आडवाटेला , काटेरी झुडपांत अनेक भग्नावशेष विखुरलेले दिसतात. आपण त्यातून मार्ग काढत पुढे जावे.एका मकबर्‍याचे भग्नावशेष दिसतील. खचलेल्या भिंती दिसतील. भिंती कसल्या! दगडमातीचा निव्वळ रचलेला थर ! त्यावर दिलेला मुलामा पार उडालाय. कधीकाळी भिंतींना मुलामा दिलेला होता, त्यावर नक्षीकाम होते ह्याची साक्ष देणारा एक छोटासा तुकडा तेवढा एका भिंतीवर दिसेल. छत कधीचेच उडालेय. या चार भिंतींच्या आत, आकाशाच्या छताखाली , लाल वालुकाश्मात बांधलेली एक कबर दिसेल. कबरीचे काही दगड गायब झाले आहेत, काही मोडकळीस आलेले आहेत.

अंधार क्षण भाग ३ - वुल्फगांग हाॅर्न (लेख १२)

लेखक बोका-ए-आझम यांनी गुरुवार, 20/11/2014 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - वुल्फगांग हाॅर्न २२ जून १९४१. पहाटे ४.३० वाजता जर्मन तोफखान्याचा पहिला गोळा सोविएत हद्दीत आदळला आणि जगातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात संहारक आक्रमणाला प्रारंभ झाला. या तोफखाना दलाचं नाव होतं पँझर. तोपर्यंत जर्मनीने दुस-या महायुद्धात मिळवलेले सगळे नेत्रदीपक विजय हे पँझरचंच कर्तृत्व होतं. एकामागोमाग एक तोफगोळे सोविएत सैनिकांवर आणि तटबंदीवर आदळत होते. ते दृश्य बघून २२ वर्षांचा वुल्फगांग हाॅर्न प्रचंड भारावून गेला होता. " आमच्या सैन्याची ताकद बघून जी भावना मनात आली तिचं शब्दांत वर्णन करता येणार नाही.

अंधार क्षण भाग ३ - हाजिमे कोंडो (लेख ११)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 17/11/2014 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - हाजिमे कोंडो " मी माणूस होतो पण मग मी सैतान बनलो. परिस्थितीने मला सैतान बनवलं." हाजिमे कोंडो मला म्हणाला. टोकियोमधल्या एका हाॅटेलमध्ये मी त्याची मुलाखत घेत होतो. सैतान म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर जी प्रतिमा येते तिच्याशी हा ८० वर्षांचा वृद्ध माणूस पूर्णपणे विसंगत होता. पण नंतर त्याची सगळी हकीगत ऐकल्यावर मला त्याचं म्हणणं पटलं. हाजिमेने ज्या संघर्षात भाग घेतला त्याविषयी दुर्दैवाने लोकांना फार माहीत नाही. सर्वसामान्यांना दुसरं महायुद्ध म्हटलं की जर्मनीने १९३९ मध्ये पोलंडवर केलेलं आक्रमण हीच त्याची सुरूवात वाटते.

वॉरेन अँडरसनचा मृत्यू आणि आमेरीकेची रासायनीक गोपनीयता

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 13/11/2014 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
भोपाळ गॅस दुर्घटनेची (कदाचित) जबाबदारी असू शकणार्‍या वॉरेन अँडरसनला भारतीय आणि आमेरिकी राजकीय वरदहस्तामुळे न्यायालयापुढे उभे टाकावे लागले नाही. अखेर २९ सप्टे २०१४ ला त्याला काळानेच वर नेले. त्याच्या मृत्यूची बातमीही काही आठवडे लपवून मग दिली गेली. आम्ही आजकालचे पांढरपेशे भौतीक प्रगतीच्या मीठाला एवढे जागतो की कशाचेच काही वाटत नाही. न्यायालयापुढे त्या माणसाने उभ टाकण्याची गरज नाही हे आमेरीकन लोकांपेक्षा भारतीय लोकांनाच अधीक पटलेल असतं. अर्थात अमेरीकन लोक फक्त परकीयांशीच असे वागतो समजून वागतात पण इतरांसाठी खोदलेले स्वतःसाठीच कामाला येते असे काहीसे आमेरीकेचे झाले.

अंधार क्षण भाग ३ - जेम्स ईगल्टन (लेख १०)

लेखक बोका-ए-आझम यांनी गुरुवार, 13/11/2014 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - जेम्स ईगल्टन तलसा, ओक्लाहोमा. मी माझ्या मोटेलमध्ये आलो आणि त्याच वेळी रेल्वे एंजिनाचा आवाज ऐकला. अगदी अमेरिकन आवाज. असंख्य हाॅलिवूड चित्रपटांमध्ये ऐकलेला. लोकांच्या सवयीचा. पण मला मात्र त्या आवाजाने अस्वस्थ केलं. तलसाला येण्याआधी मी जपानच्या जवळ असलेल्या ओकिनावा बेटावर चित्रीकरण केलं होतं. ओक्लाहोमामधले अनेक तरूण ओकिनावाच्या लढाईत जपान्यांशी लढले होते. जेम्स ईगल्टन, ज्याची मी पुढच्या दिवशी मुलाखत घेणार होतो, त्यांच्यातलाच एक.

रहिमन धागा प्रेम का... ( प्रेमाचा धागा...)

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 10/11/2014 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
रहिमन धागा प्रेम का, मत तोड़ो चटकाय । टूटे से फिर ना जुड़े, जुड़े गाँठ परि जाय l अत्यंत नाजुक अश्या प्रेमाचा धाग्याला सदैव जपून ठेवावे लागते. एकदा हा धागा तुटला, तर कधी-कधी पुन्हा गाठ मारणे ही शक्य होत नाही. आपली मीरा पतंग उडवीत होती, अचानक पतंगाची दोर तुटली. पतंग हवेत उंच उडाला. थेट स्वर्गात पोहचला. तिथे सोमरसा सोबत अप्सरांचे नृत्य पाहत स्वर्ग सुख भोगू लागला. इथे मीरा जमिनी वर पतंगाच्या विरहात अंतर्बाह्य बुडलेली होती. तिच्या मनात एकाच विचार, पुन्हा पतंग कधी भेटणार. पण धरती आणि आकाशाचे मिलन जवळपास अशक्यच असते.

अंधार क्षण भाग ३ (लेख ९)- वंश

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 10/11/2014 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण भाग ३ - वंश वंश आणि त्याच्या अनुषंगाने येणारे इतर सांस्कृतिक मुद्दे दुस-या महायुद्धात फार महत्त्वाचे होते. या भागात ज्या ४ जणांच्या मुलाखती आहेत ते सर्वजण - २ जपानी, १ अमेरिकन आणि १ जर्मन - या युद्धात सैनिक म्हणून लढले आहेत. यांच्या मुलाखती जरी इथे एकाच भागात असल्या तरी मी त्या वेगवेगळ्या ठिकाणी (स्पष्टपणे सांगायचं तर तीन वेगवेगळ्या खंडांमध्ये) आणि वेगवेगळ्या काळात घेतलेल्या आहेत.

बर्लिन भिंतीच्या पतनाचा रौप्यमहोत्सव

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 09/11/2014 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
बर्लिन भिंतीच्या पतनाचा रौप्यमहोत्सव आजच्याच दिवशी २५ वर्षांपूर्वी , ९ नोव्हेंबर १९८९ या दिवशी पूर्व जर्मन सरकारने बर्लिन भिंतीचे दरवाजे उघडून पूर्व बर्लिनच्या नागरिकांना पश्चिम बर्लिनमध्ये जायची परवानगी दिली. पुढे एक वर्षाच्या आत दोन्हीही जर्मन राष्ट्रे एकत्र आली.

अंधार क्षण भाग २ - व्लादिमीर कँटोव्हस्की (लेख ८)

लेखक बोका-ए-आझम यांनी गुरुवार, 06/11/2014 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - व्लादिमीर कँटोव्हस्की साल १९४३. कडक रशियन हिवाळा. व्लादिमीर कँटोव्हस्की नावाचा २० वर्षांचा रेड आर्मीतला सैनिक सोविएत तटबंदीच्या मागे उभा होता आणि समोरच्या दाट झाडीकडे पाहात होता. झाडीत काही जर्मन सैनिक होते पण नक्की किती ते रशियनांना  माहित नव्हतं. कँटोव्हस्की ५४ व्या गुन्हेगार तुकडीत होता. त्याला माहीत होतं की आता कुठल्याही क्षणी आपल्याला त्या झाडीच्या दिशेने जायचा आदेश मिळेल आणि लढाईद्वारे टेहळणी करावी लागेल. तो आणि त्याचे सहकारी  जर्मन सैन्यरेषेच्या दिशेने जातील आणि जर्मन सैनिकांचं लक्ष वेधून घेतील.