Skip to main content

इतिहास

  एक चुकलेली बस - रेडबस डॉट इन २

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी गुरुवार, 18/12/2014 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
  एक चुकलेली बस - रेडबस डॉट इन २ पहीला भाग इथे पाहता येईल h एक चुकलेली बस, ते पकडलेली पहिली बस. बस आत्ताशी सुरु होत होती, अजून पुढे बराच प्रवास बाकी होता. रेडबसचे बिझनेस मॉडेल अगदी नवीन नव्हते. ऑनलाइन तिकीट एजंट सिस्टीम जगभर सर्वत्र विमानांच्या तिकीटांसाठी वापरली जाते. बहुतांश इंटरनेट सुशिक्षित वर्गाला या कार्यपद्धतीची कल्पना असते.

अंधार क्षण भाग ४ - मारिया प्लेटोनाउ (लेख २०)

लेखक बोका-ए-आझम यांनी गुरुवार, 18/12/2014 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - मारिया प्लेटोनाउ जानेवारी १९९१ मध्ये ' अ ब्रिटिश बिट्रेयल ' (ब्रिटिशांनी केलेला विश्वासघात) हे वृत्तचित्र बीबीसीवरुन प्रसारित झालं. या वृत्तचित्राचा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता मी होतो आणि मला त्याच्यामुळे बराच त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागला. ब्रिटनमधल्या काँझर्व्हेटिव्ह पक्षाचे ज्येष्ठ नेते लाॅर्ड आल्डिंग्टन यांनी या वृत्तचित्राच्या प्रसारणालाच आक्षेप घेतला. एवढंच नाही तर त्यांनी बीबीसीच्या अध्यक्षांकडे याबाबत रीतसर लेखी तक्रार दाखल केली.

“पडणे” एक कला

लेखक दशानन यांनी सोमवार, 15/12/2014 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
दुसरा कोणी पडला तर त्याच्याकडे पाहून फिदीफिदी हसण्याची आपल्याकडे वाईट सवय आहे. पण त्यांना पाडणाऱ्या व्यक्तीने घेतलेले कष्ट दिसत नसतात असे माझे स्पष्ट मत आहे म्हणून मी “पडणे” एक कला हा लेख लिहितो आहे. सतत पडण्याची माझी दीर्घकालीन वाटचाल आहे, मी रस्तावर पडलो आहे, पाण्यात पडलो आहे, डोंगरावर पडलो, स्कूटर, बाईक, कार मधून देखील पडलो आहे, तसेच अनेक वेळा खड्यात देखील पडलो आहे, तसेच एकदा हवेतून देखील पडलो आहे.

अंधार क्षण भाग ४ - एस्टेरा फ्रँकेल (लेख १९)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 15/12/2014 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - एस्टेरा फ्रँकेल आपल्या आयुष्यात जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतो, पण त्यांच्या दरम्यान जे आयुष्य आपण जगतो, ते बहुतांशी आपण काळाच्या ओघात घेतलेल्या निर्णयांचा परिणाम आणि परिपाक असतं. हे निर्णय कधी सोपे तर कधी कठोर आणि कधी तर अशक्यप्राय असू शकतात. दुस-या महायुद्धाच्या धुमश्चक्रीत लोकांसमोर अनेक वेळा असे निर्णय घेण्याची परिस्थिती आली. मी जेव्हा एस्टेरा फ्रँकेलची मुलाखत घेतली तेव्हा मला जाणवलं की तिच्यासमोर निर्णय घेण्यासाठी जे पर्याय होते आणि त्यामुळे तिला ज्या पेचप्रसंगाला सामोरं जावं लागलं, तशी परिस्थिती फार थोड्या लोकांवर त्यांच्या पूर्ण आयुष्यात आली असेल.

अंधार क्षण भाग ४ - तात्याना नानियेव्हा (लेख १८)

लेखक बोका-ए-आझम यांनी गुरुवार, 11/12/2014 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - तात्याना नानियेव्हा एका क्षणात तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं, होत्याचं नव्हतं होऊ शकतं. तात्याना नानियेव्हाच्या आयुष्यात तो क्षण २६ आॅक्टोबर १९४२ या दिवशी आला. सोविएत रशिया आणि नाझी जर्मनी यांचं युद्ध सुरू होऊन एव्हाना एक वर्षाहून जास्त काळ होऊन गेला होता. ती युक्रेनमध्ये सोविएत सैन्याच्या इस्पितळात नर्स म्हणून काम करत होती. त्या दिवशीही ती कामात होती. अचानक तिने एक थरकाप उडवणारा खडखडाट ऐकला. हळूहळू तो आवाज वाढत गेला आणि जेव्हा तिने हिंमत करुन खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा समोरचं पूर्ण क्षितिज रणगाड्यांनी व्यापलं आहे हे तिच्या लक्षात आलं.

अंधार क्षण भाग ४ - पीटर ली (लेख १७)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 08/12/2014 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - पीटर ली ऐतिहासिक घटना समजून घेण्यातलं एक आव्हान म्हणजे भूतकाळ आणि आपण स्वतः यांची सांगड घालणं किंवा स्वतःची भूतकाळात कल्पना करणं. आपल्याला अशा जगाचा विचार करायला लागेल जिथे आज आपण ज्या गोष्टी गृहीत धरतो - इंटरनेट, विमानप्रवास, मोबाइल फोन - त्या तर नव्हत्याच पण लोकांची मूल्यव्यवस्थादेखील पूर्णपणे वेगळी होती. जर माझ्या आईवडिलांच्या पिढीचा विचार केला तर ही पिढी दुस-या महायुद्धाच्या वेळी तरूण होती आणि  सूर्य न मावळणारं  ब्रिटिश साम्राज्य अनुभवणारी शेवटची पिढी होती.

अंधार क्षण भाग ४ - सॅम्युएल विलेनबर्ग (लेख १६)

लेखक बोका-ए-आझम यांनी गुरुवार, 04/12/2014 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - सॅम्युएल विलेनबर्ग साल १९४२. मध्य युरोप.गोळीबार आणि बाँबस्फोट यांच्याशिवाय अजून एक आवाज त्यावेळी लोकांना ऐकू येत होता, तो म्हणजे आगगाड्यांचा.  असंख्य आगगाड्या लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात होत्या. पण या आगगाड्या नेहमीसारख्या नव्हत्या. त्यांमधून प्रवास करणारे लोक कधीच परत येणार नव्हते. या गाड्या लोकांना ऑशविट्झ, रॅव्हेन्सब्रुक, बेल्झेक, चेल्म्नो, सॉबिबॉर या आणि इतर मृत्युछावण्यांमध्ये घेऊन जात आणि अजून लोकांना तिथे घेऊन जाण्यासाठी  परत येत. १९४२ च्या वसंतऋतूमध्ये सॅम्युएल विलेनबर्ग नावाचा १९ वर्षांचा ज्यू तरुण अशाच एका आगगाडीतून चालला होता.

अंधार क्षण भाग ४ - अलेक्सांद्र मिखाइलोव्हस्की (लेख १५)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 01/12/2014 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - अलेक्सांद्र मिखाइलोव्हस्की इतिहासाच्या कोणत्याही अभ्यासकाला हे माहीत असतं की आपली भूतकाळाकडे बघण्याची दृष्टी ही सतत बदलत असते. घटनांचे नवीन अर्थ लावले जातात, त्यांच्या जुन्या अर्थांमध्ये सुधारणा केल्या जातात, आक्षेप घेतले जातात. अनेक आदराची स्थानं धुळीला मिळतात, नवीन आदरस्थानं शोधली जातात. कुठलाही इतिहासकार हा भूतकाळाचे दस्तऐवज आणि साक्षीदार यांच्या आधारानेच घटनाक्रमाची निश्चिती करत असतो. जर हे साक्षीदार किंवा दस्तऐवज उपलब्धच झाले नाहीत तर इतिहासलेखनावर साहजिकच मर्यादा येतात. याचं एक बोलकं उदाहरण म्हणजे सोविएत युनियन. १९९१ मध्ये सोविएत युनियन संपुष्टात आलं.

अंधार क्षण (लेख १४): भाग ४ - कैद

लेखक बोका-ए-आझम यांनी गुरुवार, 27/11/2014 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण भाग ४ - कैद मानवी समूहांनी जेव्हा एकमेकांशी लढायला सुरूवात केली तेव्हापासून युद्धकैदी ही संकल्पना आहे. दुस-या महायुद्धाआधी युद्धकैदी हे शत्रूचे सैनिक असायचे. शत्रूच्या नागरिकांना कैद  करणं हे दुस-या महायुद्धातच सुरू झालं. . याआधीच्या किंवा नंतरच्या दुसऱ्या कुठल्याही संघर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिकांना  कैद केलं गेलं नाही. एवढंच नाही तर या लोकांना ज्या प्रकारे कैद केलं गेलं त्यातही पराकोटीची विविधता आपल्याला दिसून येते. या भागात ज्या ९ कथा आहेत त्यांत हा मुद्दा आला आहेच.

अंधार क्षण भाग ३ - मसायो एनोमोटो (लेख १३)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 24/11/2014 06:18 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - मसायो एनोमोटो इतिहासातलं एक प्रबळ साम्राज्य स्थापन करणा-या रोमन लोकांना एक चिंता अशी वाटायची की आर्थिक प्रगतीमुळे त्यांच्यातली विजिगिषु वृत्ती कमी होईल. लोकांचा स्वभाव मृदू होईल. त्यांच्यातला कठोरपणा निघून जाईल. मला त्याच्या बरोबर उलट चिंता वाटत असते की  मानवी अध:पाताच्या कथा वारंवार ऐकून माझ्या संवेदना बोथट होतील की काय. पण २००० साली टोकियोमध्ये मी मसायो एनोमोटोची मुलाखत घेतली आणि माझ्या लक्षात आलं की असं काहीही झालेलं नाही, कारण या कथेतल्या तपशिलाने मला अजूनही पछाडलेलं आहे. मसायो एनोमोटो एका शेतक-याचा मुलगा होता आणि वयाच्या १७ व्या वर्षी तो सैन्यात भरती झाला.