Skip to main content

इतिहास

देश कसा बुडवावा

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी सोमवार, 02/02/2015 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
देश कसा बुडवावा, तुला ऐकायचं होतं ना ऐक, फार काही करावं लागत नाही मित्रा देशनिंदा अतिशय सोपी गोष्ट आहे देशभक्ती आचरटपणा आ़णि द्रोह करणं फ्याशन आहे तत्परतेने शत्रूची बोट उडवली रे उडवली की सैन्यदलांना नावे ठेव जाब विचार, साधे स्मगलर हो ते दहशतवादी नाहीच्चेत मुळी, अशी कशी उडवली? बघ, देश बुडतो की नाही आपल्याच देशात आपल्याच घरातून हाकललेल्या मारलेल्या, बलात्कारलेल्या, विस्थापित काश्मीरी पंडितांची व्यथा दाबून टाक, दुर्लक्ष कर, मग जोरात कांगावा करुन विचार, काय घंट्याचा त्रास होतो आहे त्यांना? बघ, देश बुडतो की नाही एकदा कुणीतरी सिनेमा काढेल देवळात जाणार्यांना मूर्खात काढेल पण तू मात्र त्याचा उदो

इराकची खातून

लेखक विशाखा पाटील यांनी गुरुवार, 29/01/2015 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेने इराकवर हल्ला केला आणि इराकची वाताहत सुरू झाली. २००३ मध्ये अमेरिकेने हा हल्ला केला तेव्हा अमेरिकेच्या सैन्याने सर्वात आधी तेलमंत्रालयावर कब्जा केला. जवळच बगदादच समृद्ध वस्तुसंग्रहालय होतं. तिथे फक्त दोन सैनिक एका रणगाड्यावर उभे होते. त्यांना न जुमानता लोकांनी हजारो वर्षांचा ठेवा लुटून नेला. सुमेरिअन, बेबिलोनिअन, अकडीअन, ऑटोमन संस्कृतीचा वारसा सांगणारा हा अनमोल खजिना लोकांनी दिवसाढवळ्या लुटला. हा ऐवज जगभर विकला गेला. या वास्तूसंग्रहालयाची संस्थापक होती गरट्रुड बेल ही ब्रिटीश स्त्री. खरं तर, ही इराक या देशाची शिल्पकार. या देशाचा नकाशा घडवणारी एक चतुर स्त्री.

अंधार क्षण भाग ५ - सुरेन मिर्झोयान (लेख २६)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 19/01/2015 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - सुरेन मिर्झोयान ज्यांना दुस-या महायुद्धामध्ये अजिबात रस नाही त्यांनीसुद्धा स्टॅलिनग्राडच्या लढाईबद्दल ऐकलेलं असतं. या लढाईपासून जर्मनीच्या पराभवाची सुरूवात झाली. त्यानंतर कर्स्कच्या लढाईने जर्मनी युद्ध जिंकू शकत नाही हे सिद्ध झालं, त्यामुळे त्याचा फायदा उचलण्यासाठी रशियन सैन्याने ' आॅपरेशन बाग्रेत्सिओन ' ही प्रतिचढाई सुरु केली आणि शेवटी बर्लिनमध्ये जर्मनीने शरणागती पत्करली. हा सगळा घटनाक्रम सुरु करणा-या या लढाईला इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतकी संहारक, दाहक आणि हातघाईची लढाई याआधी आणि यानंतरही क्वचितच लढली गेली असेल.

अंधार क्षण भाग ५ - व्लादिमीर ओग्रिझ्को (लेख २५)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 12/01/2015 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - व्लादिमीर ओग्रिझ्को जर मला आज कोणी विचारलं की १९३९ ते १९४५ हा जो दुस-या महायुद्धाचा संपूर्ण कालखंड आहे त्यातला सर्वात महत्वाचा आणि निर्णायक असा दिवस निवड, तर मी सर्वांना माहीत असलेले दिवस - उदाहरणार्थ ३ सप्टेंबर १९३९, जेव्हा ब्रिटन आणि फ्रान्स यांनी पोलंडवर जर्मनीने केलेल्या आक्रमणाच्या विरोधात जर्मनीविरूद्ध युद्ध पुकारलं; किंवा ७ डिसेंबर १९४१, जेव्हा जपानने पर्ल हार्बरवर आकस्मिक रीत्या बाँबहल्ला करुन युद्धाला ख-या अर्थाने जागतिक बनवलं; किंवा २२ जून १९४१, जेव्हा जर्मनीने सोविएत रशियावर जगातला सर्वात मोठा आक्रमक हल्ला चढवला - निवडणार नाही.

अंधार क्षण भाग ५ - निष्ठा (लेख २४)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 05/01/2015 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण भाग ५ - निष्ठा मध्ययुगीन युद्धांमध्ये आणि दुस-या महायुद्धामध्ये असलेला एक अत्यंत महत्वाचा फरक म्हणजे धर्म हा मुद्दा दुस-या महायुद्धात अजिबात महत्वाचा नव्हता. नाझींच्या ज्यू द्वेषाचं कारण धार्मिक नसून वांशिक होतं. हिटलरला तर कुठल्याही धर्माबद्दल आस्था नव्हती. पण धार्मिक मुद्दे जरी महत्त्वाचे नसले तरी एखाद्या विचारसरणीवर पराकोटीची निष्ठा हे दुस-या महायुद्धाचं वैशिष्ट्य होतं. एस्. एस्. प्रमुख हेनरिख हिमलरसारख्या कट्टर नाझींसाठी सोविएत रशियाविरूद्ध पुकारलेलं युद्ध म्हणजे कम्युनिझम किंवा साम्यवाद आणि राष्ट्रीय समाजवाद या दोन विचारसरणींमधला टोकाचा संघर्ष होता.

आणि यांनी घडविली अमेरिका! .. ४) जे पी मॉर्गन

लेखक अमित खोजे यांनी मंगळवार, 30/12/2014 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
आणि यांनी घडविली अमेरिका! .. ४) जे पी मॉर्गन मागील भाग १) भाग १ - आणि यांनी घडविली अमेरिका! .. १) कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट २) भाग २ - आणि यांनी घडविली अमेरिका! .. २) जॉन डी रॉकफेलर ३) भाग ३ - आणि यांनी घडविली अमेरिका! .. ३) अँड्र्यू कार्नेगी पूर्वार्ध : कार्नेगी स्टील आतून पोखरली गेली होती. आणि कार्नेगीला तिला परत पूर्वीची प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागणार होते. लोकांच्या मनातील आपली प्रतिमा त्याला परत चांगली बनवायची होती.

भीतीच्या भिंती:३ इस्लामिक रिपब्लिक

लेखक आतिवास यांनी सोमवार, 29/12/2014 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग (नोंद: स्थानिक लोकांशी झालेल्या चर्चा, विकिपीडिया आणि तत्कालीन वृत्तपत्रातील बातम्या आणि लेख यांच्या आधारे हा लेख लिहिला आहे.) मी काबूलमध्ये शनिवारी पोचले होते. रविवार निवांत असायला हवा आजवरच्या अनुभवानुसार. पण नाही! रविवार हा कामाचा दिवस. ‘साप्ताहिक सुट्टीचा दिवस शुक्रवार’ ही इस्लामिक राजवटीची प्रमुख खूण. ज्यांना आठवड्यात पाच दिवस काम असतं त्यांना गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस सुट्टीचे.

अंधार क्षण भाग ४ - ल्युसिल आयशेनग्रीन (लेख २३)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 29/12/2014 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - ल्युसिल आयशेनग्रीन पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन आणि त्यामुळे होणारा शारीरिक आणि मानसिक हिंसाचार हा फक्त नाझीच करत होते असं अजिबात नाही. त्याचप्रमाणे अडचणीत सापडलेल्या लोकांचा गैरफायदा घेणं यावरही फक्त नाझींची मक्तेदारी नव्हती. ल्युसिल आयशेनग्रीनला या दोन्ही गोष्टींचा जो अनुभव आला त्यावरून मी म्हणेन की जे तिला सहन करावं लागलं तशी वेळ फार कमी लोकांवर आली असेल आणि सर्वात भयावह म्हणजे जेव्हा तिला हे सगळं पहावं लागलं तेव्हा ती फारच लहान होती - ती ८ वर्षांची असताना या गोष्टींची सुरूवात झाली आणि जेव्हा त्यांचा अंत झाला तेव्हा ती फक्त २० वर्षांची होती.

अंधार क्षण भाग ४ - काॅनी सली (लेख २२)

लेखक बोका-ए-आझम यांनी गुरुवार, 25/12/2014 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - काॅनी सली काॅनी सलीला भेटण्याची मला खूप इच्छा होती, कारण तिच्यावर जपान्यांकडून झालेल्या अत्याचारांबद्दल ती बोलायला तयार झाली होती. १९४१ च्या डिसेंबरमध्ये जपानने पर्ल हार्बरवर बाँबफेक करुन अमेरिकेला युद्धात ओढलं. अमेरिकेपाठोपाठ ब्रिटन आणि नेदरलँडस् ह्या प्रशांत महासागरातल्या दोन सागरी सत्ता होत्या. त्यांना नेस्तशब्दकरणं ही जपानची पुढची खेळी होती. त्यामुळे जपानने डच ईस्ट इंडीज म्हणजे आजचा इंडोनेशिया आणि हाँगकाँग यावर एकाच वेळी हल्ला चढवला आणि १९४१ च्या शेवटापर्यंत हे भाग आपल्या टाचेखाली आणले. त्यावेळी हाँगकाँगमधल्या जनतेवर त्यांनी अनन्वित अत्याचार केले.

अंधार क्षण भाग ४ - टोइव्ही ब्लाट (लेख २१)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 22/12/2014 01:25 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - टोइव्ही ब्लाट नाझींच्या ताब्यातील पोलंडमध्ये राहणं हा एक घुसमटवून टाकणारा अनुभव होता. तुम्ही जर ज्यू असाल तर तुमच्या हालअपेष्टांना सीमाच नव्हती. पोलंड हा ज्यूबहुल असल्यामुळे नाझींना तिथल्या ज्यूंना सर्वात प्रथम संपवणं हे तर्कसंगत वाटत होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी नाझींनी ट्रेब्लिंका, चेल्मनो, आॅशविट्झ, मायदानेक अशा अनेक मृत्युछावण्या पोलंडमध्येच बनवल्या होत्या. यामधलंच एक नाव म्हणजे साॅबिबाॅर. जवळजवळ २,५०,००० ज्यूंचे बळी घेणा-या साॅबिबाॅरमधून वाचलेल्या थाॅमस ' टोइव्ही ' ब्लाट या माणसाला भेटणं हा एक संस्मरणीय अनुभव होता. टोइव्ही ब्लाटच्या या मुलाखतीतून मी बरंच काही शिकलो.