Skip to main content

इतिहास

आणि यांनी घडविली अमेरिका! .. ३) अँड्र्यू कार्नेगी

लेखक अमित खोजे यांनी बुधवार, 05/11/2014 03:03 या दिवशी प्रकाशित केले.
जॉन डी रॉकफेलर आता अमेरिकेतील सर्वात श्रीमंत माणूस झाला होता. त्याची एकूण संपत्ती १५० मिलिअन डॉलर्स (२२५ बिलिअन डॉलर्स आज) होती. स्टँडर्ड ऑईल ९८% रॉकेल ची एकटी मालक होती. परंतु जगातील सर्व मोठ्या भांडवलदारांना स्पर्धक हे असतातच. आणि भविष्यातील सर्वात मोठ्या स्पर्धकाला रॉकफेलरने स्वतःच जन्माला घातले होते. अँड्र्यू कार्नेगी! ज्याचा हात धरून अँड्र्यूने धंद्यातील धडे गिरवले त्या टॉम स्कॉटची वाताहत केल्याबद्दल अँड्र्यू जॉनला बिलकुल क्षमा करणार नव्हता. पुढे चालू ..

अंधार क्षण भाग २ - अलेक्सेई ब्रिस (लेख ७)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 03/11/2014 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - अलेक्सेई ब्रिस इतिहास समजून घेण्यातली एक मोठी अडचण म्हणजे ऐतिहासिक घटना या एकेकट्या, स्वतंत्र आणि काळ्या दगडावरची रेघ अशा रीतीने पाहण्याची आपली सवय! रेड आर्मीने स्टॅलिनग्राडची लढाई जिंकली, चर्चिलने ब्रिटनला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढलं, हिटलर आणि नाझी दुस-या महायुद्धात पराभूत झाले - ह्या गोष्टी आज सूर्यप्रकाशाइतक्या सत्य वाटतात आणि आहेतही, पण त्या अनुभवलेल्या लोकांच्या मनातले विचार जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर या सत्य म्हणून आपण गृहीत धरत असलेल्या गोष्टी जेव्हा तेवढ्या स्पष्ट नव्हत्या, त्या वेळचा विचार आपल्याला करावा लागेल.

अंधार क्षण भाग २ - अलाॅयस फाॅलर (लेख ६)

लेखक बोका-ए-आझम यांनी गुरुवार, 30/10/2014 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - अलाॅयस फाॅलर १९३३ मध्ये नाझींच्या हातात जर्मनीची सत्ता आल्यावर पहिली गोष्ट जर त्यांनी केली असेल तर ती म्हणजे सर्व विरोधी आवाज बंद करणं. हिटलरचा उजवा हात हर्मन गोअरिंग प्रशियाचा म्हणजे जर्मनीतल्या सर्वात मोठ्या राज्याचा गृहमंत्री होता. त्याने नाझी निमलष्करी संघटना आणि प्रशियन पोलिस यांचं एकीकरण घडवून आणलं. त्यामुळे नाझींच्या हातात पोलिसांचे अधिकार आले आणि ते त्यांनी विरोधकांच्या दडपशाहीसाठी सर्रास वापरले.   त्यांना विरोध करणं म्हणजे स्वत:चा मृत्यू ओढवून घेणं होतं.

अंधार क्षण भाग २ - प्रतिकार (लेख ५)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 27/10/2014 07:40 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण भाग २ - प्रतिकार या भागातल्या कथा ह्या आक्रमकांच्या  अत्याचारांविरुद्ध उभ्या राहाणा-या आणि त्यांचा प्रतिकार करणा-यांच्या कथा आहेत. दुस-या महायुद्धातल्या प्रतिकार चळवळींचा इतिहास पाहिला तर आपल्याला दोन प्रकारचे लोक भेटतील - एक म्हणजे आपल्या तत्वांवर ठाम असलेले आणि परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी कुठलीही तडजोड न करणारे; आणि दुसरे कुंपणावर बसलेले आणि थोड्याफार स्वार्थी किंवा व्यक्तिगत हेतूंपायी प्रतिकार चळवळीत आलेले. माझा असा विश्वास आहे की पहिल्या प्रकारचे लोक दुर्मिळ होते. अशा चळवळी  मुख्यत्वेकरून दुस-या प्रकारच्या लोकांनीच भरलेल्या होत्या. फ्रान्सचंच उदाहरण घ्या.

बेडूक आणि सर्प

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 18/10/2014 07:50 या दिवशी प्रकाशित केले.
फार जुनी कथा आहे, आटपाट नगरीत एका विहिरीत शेंकडो बेडूक राहत होते. त्यांच्यात आपसांत भांडण झाले. एका बेडकाने तावातावाने विहीर सोडली. रागाच्या भरात जात असताना, एका सर्पाने त्यास पकडले. बेडकाने सर्पास त्याला सोडून देण्याची विनंती केली. सर्प म्हणाला, बेडूक हे माझे भोजन आहे, त्या मुळे तुला मी खाणारच. त्याही परिस्थितीत बेडूकाला एक भन्नाट कल्पना सुचली, तो सर्पास म्हणाला, तू मला खाईल, तर आज तुझे पोट भरेल, उद्या तुला पुन्हा भूक लागेल. मला सोडेल तर महिन्या भराच्या तुझ्या जेवणाची व्यवस्था करू शकतो. सर्पाने विचारले, ते कसें शक्य आहे?

मदत? (शतशब्द कथा)

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 16/10/2014 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
रत्नांकीरीच्या जंगलात महाराज सिंहनासिकेतू येरझा-या घालीत होते. इथे ते सुरक्षीत होते. पण क्रूरकर्मा चकलासूर राजधानीत निरपराध लोकांना मारून टाकीत असतांना आपल्याला एकटे लपून रहावे लागत आहे! कोणाची मदत मिळेल? महाराजांनी अमात्य सौव्रतांना विचारले- “ आपणाला कोण मदत देईल? “ अमात्य उत्तरले- “महाराज, जनता म्हणतेय, पश्चिमेच्या सामकोकेंद्र राजांकडे मदत मागावी. त्यांच्याकडे सामर्थ्यवान वायुयाने आहेत. ते चकलासुराला सहज पराजित करू शकतील.” “जनता मूर्ख आहे अमात्य! चकलासूर निदान जनतेला मृत्यू तरी देत आहे. सामकोकेंद्र वायुयानातून रासायनीक गोळाफ़ेक करून निरपराधांना मरणापेक्षाही भयानक यातना देईल.

अंधार क्षण भाग १ - अाॅस्कर ग्रोएनिंग (लेख ४)

लेखक बोका-ए-आझम यांनी गुरुवार, 16/10/2014 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - आॅस्कर ग्रोएनिंग (लेख ४) माझ्या कामामुळे मी अनेक प्रकारच्या लोकांना भेटलो, अजूनही भेटतो. एक गोष्ट मी अगदी खात्रीलायक रीत्या सांगू शकतो की लोकांविषयी तुमच्या मनात असलेले विचार आणि प्रत्यक्ष तुम्हाला भेटणारा माणूस यांच्यात फार क्वचित काही साधर्म्य असतं. उदाहरणार्थ समजा मी तुम्हाला अशी पार्श्वभूमी दिली की - ह्या माणसाने नाझींची कुप्रसिद्ध मृत्युछावणी आॅशविट्झमध्ये काम केलेलं आहे, लहानपणापासून तो नाझींचा समर्थक होता, युद्ध चालू झाल्यावर तो एस्.एस्.

अंधार क्षण भाग १ - पेट्रास झोलिओंका (लेख ३)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 13/10/2014 06:27 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - पेट्रास झोलिओंका २२ जून, १९४१ या दिवशी नाझी जर्मनीने सोविएत रशियाविरुद्ध आपल्या महत्वाकांक्षी 'आॅपरेशन बार्बारोसा ' ची सुरूवात केली आणि जगातली आजवरची सर्वात मोठी युद्ध आघाडी - पूर्व आघाडी उघडली गेली. जगातल्या सर्वात भीषण लढाईला सुरुवात झाली.  त्यावेळी जवळजवळ सगळा पश्चिम युरोप हिटलरच्या पायाशी लोळण घेत होता. दोनच शत्रू जिंकायचे राहिले होते - ब्रिटन आणि रशिया. सुरूवातीला  हिटलरने हवाई सामर्थ्याच्या जोरावर ब्रिटन जिंकायचा प्रयत्न केला पण ते जमत नाही हे कळल्यावर त्याने आपलं लक्ष पूर्वेकडच्या सोविएत रशियाकडे वळवलं.

अश्वत्थामा -3

लेखक निलरंजन यांनी रविवार, 12/10/2014 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
मागील लेख इथे वाचा * अश्वत्थामा * अश्वत्थामा भाग-2 अश्वत्थामाच्या राज्यकारभाराबद्दल आणि त्याच्या विवाहाबद्दल महाभारतात कुठल्याही प्रकारचे भाष्य केलेले माझ्या वाचनात नाही द्रोणाचार्यांनी पांचाल राज्याचे तुकडे केल्याने द्रुपदाचा तिळपापड झाला आणि त्यातच त्यांनी द्रोणवधाचा प्रण केला आणि त्यासाठी केलेल्या यज्ञातून जन्म झाला पांचाली द्रौपदीचा आणि दृष्टिध्रुम्नचा... पांडव आणि कौरवांच्या शक्ती प्रदर्शनात मध्येच आलेल्या कर्णाला अर्जुनाशी युद्ध करण्याची इच्छा होती पण भीष्मांनी त्याला तुझ्यासारख्या सु

अंधार क्षण भाग १ - सामूहिक हत्या (लेख २)

लेखक बोका-ए-आझम यांनी गुरुवार, 09/10/2014 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण भाग १ - सामूहिक हत्या दुस-या महायुद्धात सहा कोटींहून जास्त लोक मारले गेले - आजवरच्या सर्व संघर्षांमध्ये सर्वात जास्त. हे शक्य होण्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा माणसांना मारण्यासाठी झालेला वापर. या भागात एकूण तीन मुलाखती आहेत. त्यावरुन तुमच्या हे लक्षात येईलच की विसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात माणसं मारणं हे  अगदीच सहजसुलभ झालं होतं - तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने आणि मानसशास्त्रीय दृष्टीनेही.