Skip to main content

इतिहास

'श्रीमानयोगी'

लेखक अक्षया यांनी बुधवार, 09/12/2015 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
एक अगदी तुमच्या आमच्या सारखी सर्वसाधारण व्यक्ती, जी आयुष्यभर नोकरी करून आपला संसार चालवते, नोकरीमधून निवृत्तीचे वेध लागताच मनामध्ये कुठेतरी प्रचंड मोठा स्वप्नांचा पहाड उभा असतो...पोटा-पाण्याच्या व्यवसाया मुळे फार पूर्वी पाहिलेली काही स्वप्नं प्रत्यक्षात कशी उतारवयाची याचा सतत ध्यास घेतलेली एक व्यक्ती... ते स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत धडपड करणारी व्यक्ती... स्वप्नं होतं आयुष्यात काहीतरी भव्यदिव्य करायचं, मनात विचारांचं काहूर माजलेलं, प्रत्येकजणाचा वेगळा सल्ला, प्रत्येकाची वेगळी मतं. आणि एके दिवशी सहज 'श्रीमानयोगी' कादंबरी हातात पडली.

पालखेडची लढाई - पहिले बाजीराव पेशवे

लेखक हेमंत लाटकर यांनी मंगळवार, 08/12/2015 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर एखाद्या पराक्रमी अाणी बुद्धिवान सेनापतीचे नाव घ्यावे लागले तर ते पहिल्या बाजीरावांचे घ्यावे लागेल. ’पालखेडची लढाई' ही पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यातली एक महत्त्वाची लढाई. ही लढाई 28 फेब्रुवारी 1728 रोजी पहिले बाजीराव पेशवे व हैदराबादचा निझाम यांच्यात महाराष्ट्रातील नाशिक शहराजवळील पालखेड येथे झाली. या लढाईत मराठ्यांचा विजय झाला. पालखेडची लढाई बाजीरावांच्या युद्धतंत्राचे तसेच गनिमी काव्याचे उत्तम उदाहरण आहे.

आयपीओ काही अलिबाबा काही चोर

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी रविवार, 06/12/2015 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणास्थान- इंग्रजाळलेल्या भाषेसाठी आगाऊ माफी. फार पूर्वी पासून आयपीओना खात्रीशीर पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून पाहिलं जातं. पण आधी घडलेल्या गोष्टींचा विदा काय सांगतो? या मागे काही डार्क सिक्रेट्स असू शकतात/आहेत? कोणत्याही व्यवसायाला कच्चामाला इतकीच किंबहुना त्याहून अधिक गरज पैशाची असते. पैशासाठी एक तर कर्ज घेता येऊ शकतं, किंवा व्यवस्थापन स्वतःकडचा काही हिस्सा तुमच्या आमच्यासारख्या काही गुंतवणूकदारांना विकून थोडा पैसा उभा करू शकतं.

बुद्धिमान व पराक्रमी पेशवे

लेखक हेमंत लाटकर यांनी सोमवार, 30/11/2015 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
पेशव्यांनी मराठेशाही बुडविली हे काही तितके खरे नाही. बाळाजी विश्वनाथ पेशवे, पहिले बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे, नाना फडणवीस यांनी (1707 - 1800) 94 वर्ष मराठेशाही राखली. नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर (1800) दुसरे बाजीराव पेशवे अपराक्रमी, कारस्थानी, विषयलंपट असल्यामुळे 1817 मध्ये मराठेशाही बुडाली. पहिले बाजीराव पेशवे व माधवराव पेशवे या दोघानां मिळून 50 वर्षाचे आयुष्य लाभले असते तर मराठेशाही आणखी 50 वर्ष जास्त राहिली असती. बाळाजी विश्वनाथ पेशवे :- औरंगजेबाचा 1707 मध्ये मृत्यू झाल्यावर त्याचा पुत्र आजम बादशहा झाला.

पुणेरी कथालेखक - २

लेखक DEADPOOL यांनी शुक्रवार, 27/11/2015 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
पुनश्च गजाननाच्या आशीर्वादाने व शनिवारवाड्याच्या साक्षीने! १.तुळशीबागेत 'भेटेल' तुला मी. यातील भेटेल शब्दात अत्यंत मोठा गर्भितार्थ आहे. त्यामुळे या शब्दांवर आक्षेप घेणाऱ्यास घाणघापुरचा मेसेज पाठविण्यात येईल! २.आम्ही पुण्यातील असण्यावर आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीने शनिवारवाड्याचा प्रथम मालक कोण याचा शोध घ्यावा. (ती वास्तू आम्ही पेशव्यांना भेट दिली होती) ३."कथा ५१ भागातच का?" हा लाडिक प्रश्न विचारणार्या लोकांस 'एकीवरील आकड्यांचे महत्व' हे चा.द.रसोड यांचे पुस्तक पाठविण्यात येईल.

(जिलेबी कथा - लिहायचे नियम)

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 27/11/2015 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
'पेरणी'साठी बियाणे! मिसळपावच्या आशीर्वादाने व मिपाकरांच्या साक्षीने आम्ही "धाग्यांच्याबागेत भेटेन तुला मी" या कथामालेची सुरूवातीच्या आधीच सांगता करत आहोत! प्रस्तुत लेख हा आजच प्रकाशित होणार आहे. तरीही हा लेख वाचून इथून पुढे आपला जिलेबीलेख/कविता/काथ्याकूट/पाकृ लिहायची काही पथ्ये! १. कथा शक्यतो १च भागात द्यावी किंवा जास्त स्क्रोल करायला लावून कुणाकडूनही 'भाग थोडे मोठे टाका' किंवा 'हात दुखला स्क्रोल करून' अशी प्रतिक्रिया मिळवून आपल्या अतिशहाणपणाचा प्रत्यय देऊ नये.

पुणेरी कथा - पाळावयाचे नियम

लेखक DEADPOOL यांनी गुरुवार, 26/11/2015 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
गजाननच्या आशीर्वादाने व शनिवारवाड्याच्या साक्षीने आम्ही 'तुळशीबागेत भेटेल तुला मी' या कथामालेचा शुभारंभ करत आहोत! प्रस्तुत कथा ही ५१ भागात प्रकाशित होणार आहे.तरीही ही कथा वाचताना पाळावयाची काही पथ्ये! १. ही कथा ५१ भागात असल्याने कोणीही 'लवकर भाग टाका' अशी प्रतिक्रिया देऊन आपल्या अधाशिपणाचा प्रत्यय देऊ नये. (त्यांना १ ते४ या वेळेत 'चितळे' नामक वाट कशी पहावी या शाळेत पाठवले जाईल.) २. 'पुभाप्र' नामक पळवाट वापरल्यास त्याला पुण्यात लुंगी घेण्यासाठी पाठवण्यात येईल. ३. १ ते ४ या वेळेत कथेवर प्रतिसाद टाकल्यावर आपण रिकामटेकडे आहात असा अर्थ काढण्यात येईल. ४. व्यनि करून ओळखी काढण्याचा प्रयत्न करु नये.

दोन वेडे - उपसंहार

लेखक DEADPOOL यांनी मंगळवार, 24/11/2015 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
मार्कवर देशद्रोहाचा खटला भरला गेला! त्याचा काहीही उपयोग नव्हता, कारण 'पूल ऑफ़ डेड' मधे त्याचा अंत झाला! डेड्पूल अमेरिकी सरकारच्या मानवताविरोधी कारवायांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देत होता! शेवटच्या लॉझगन्स कुठे वापरल्या जाणार हेही ठरलं होत! भारत अमेरिका युद्ध! जनरल सोन्याबापू ह्याच चिंतेत होते. कारण लॉझ्गन्स विरोधात त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते! "सर आपल्यासाठी पत्र आले आहे" बापूंनी चिंतेत पत्र हातात घेतले! "लॉझ्गन्स वर उत्तर!"पत्रात लिहिले होते! त्या पत्राबरोबर एक केमिकलची बाटली देखील होती!!!!

आला आला जिलबीवाला

लेखक स्वामी संकेतानंद यांनी सोमवार, 23/11/2015 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
आला आला जिलबीवाला आला आला जिलब्यांचा धगधगता घाणा अन् पेटविला साधी जिलबी मावा जिलबी पण आहे पंजाबी की राजस्थानी देऊ बोला चांदनि चौकाची फेमस जिलबी सांगू पण भेसळमालाची देऊ खाण्याला आम्ही पाडू ती जिलबी गुपचुप खावी नाहीतर करता तुम्ही झिंगालाला जिलबीला माझ्या नावे ठेविति कोणी स्वादच नाही 'स्वामी' त्यांच्या जीभेला - स्वामी संकेतानंद जलेबीवाले
काव्यरस

ऑपरेशन थंडरबोल्ट - एंटबे नंतर...

लेखक मोदक यांनी सोमवार, 16/11/2015 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
ऑपरेशन थंडरबोल्ट - एंटबे नंतर.. आठवडाभर सुरू असलेले ओलीसनाट्य संपुष्टात आले. इस्रायलने एका यशस्वी कमांडो ऑपरेशनची इतिहासात नोंद केली. ...यानंतरही बरेच काही घडले आहे. बर्‍याच गोष्टी मूळ लेखामध्ये घेतल्या होत्या मात्र एकंदर लेखाचा आकृतीबंध पाहता त्या गोष्टी / घटना वगळाव्या लागल्या.