Skip to main content

इतिहास

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग २)

लेखक Anand More यांनी सोमवार, 22/02/2016 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ ------------------------ आजचा आपला भारत देश म्हणजे ब्रिटीशांच्या अखत्यारीतला संपूर्ण भूभाग नाही. ब्रिटीशांच्या अमलाखालील भारताची एकदा रद्द केलेली आणि तीनदा सर्वमान्य झालेली विभागणी / फाळणी झाली. १९०५ सालची बंगालची फाळणी ही पहिली फाळणी. ती लोकक्षोभामुळे ब्रिटीशांनी मागे घेतली. मग १९१९ साली दुसरी फाळणी झाली, ती जुन्या भारतीय संस्कृतीचा भाग असलेला सुदूर उत्तर-पश्चिमेच्या एक मोठ्या भागाने स्वतःला ब्रिटीश साम्राज्यापासून स्वतंत्र घोषित केल्याने. हा भाग होता प्राचीन भारतातला, ‘गांधार’. रामायणकालीन भरताने जिंकलेला गांधार. (भरताच्या तक्ष या पुत्रावरून तक्षशीला आणि पुष्कल या पुत्रावरून पुष्कलावती या शहरांची नावे पडली असे मानतात. प्रसिद्ध इतिहासतज्ञ दामोदर कोसंबींनी, तक्षक या नागाचे शहर म्हणून तक्षशीला अशीही व्युत्पत्ती सांगितली आहे.) बामियानच्या बुद्धमूर्तींची भूमी असलेला गांधार, मगधाधीपती धनानंदाकडून अपमानीत होऊन मगध सोडून विद्यार्जन आणि विद्यादान ही दोनही कामे आयुष्याच्या मोठ्या कालावधीसाठी आचार्य चाणक्यांनी जिथल्या विद्यापीठात पूर्ण केली त्या तक्षशिलेचा गांधार. म्हणजेच आजचा अफगाणिस्तान.

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग १)

लेखक Anand More यांनी रविवार, 21/02/2016 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
"विष्णू पुराण" म्हणते की, उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् । वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र संततिः ।। म्हणजे राजा भरताचे साम्राज्य आसेतुहिमाचल होते. पण या सम्राट भरताच्या पुढच्या पिढ्या जगात येईपर्यंत ते खंड खंड झालेले होते. महाभारत काळाततर कुठे जरासंधाच्या मगधासारखी साम्राज्यवादी राजेशाही नांदत होती, तर कुठे मथुरेसारखी छोटी छोटी गणराज्ये. म्हणजे भरताच्या वंशजांना "आम्ही चालवू हा पुढे वारसा" काही जमले नसावे.

बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग -१

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 18/02/2016 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, कबूल केल्याप्रमाणे या विषयावरचा शेवटचा लेख लिहायला घेतला आहे. विषय मोठा व थोडासा कंटाळवाणा होण्याची शक्यता आहे पण दुसर्‍या महायुद्धातील वाचावेच असे हे एकंदरीत प्रकरण आहे. तेव्हा थोडा धीर धरुन वाचावे ही विनंती. किती भाग होतील हे सांगता येत नाही पण मधेच गायब होऊ नका.... :-) भाग -१ १९४१ साली, जून महिन्यात जर्मनीचे १४६ डिव्हिजन सैन्य रशियाच्या आघाडीवर आक्रमणास तयार होते. त्यात जे सैन्य होते त्याची खालील यादी नजरेखालून घातल्यास त्यांच्या तयारीची कल्पना येते. मला स्वत:ला हे सैन्य त्या आघाडीवर कसे हलवले असेल याचा नेहमीच अचंबा वाटतो.

मोसाद - भाग ७

लेखक बोका-ए-आझम यांनी गुरुवार, 11/02/2016 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
. मोसाद - भाग ६ मोसाद - भाग ७ २ जानेवारी १९६५, लाताकिया बंदर, सीरिया. सोविएत रशियामधून आलेलं एक जहाज किनाऱ्याला लागलं. या जहाजात के.जी.बी. ने विकसित केलेली नवीन यंत्रसामग्री होती. प्रामुख्याने रेडिओ संदेश ऐकणे आणि ते कुठून पाठवले जात आहेत, ते ट्रान्समीटर्स शोधून काढणे यासाठी या यंत्रणेचा उपयोग होणार होता.

राजबंदिनी (पुस्तक परिचय)

लेखक आतिवास यांनी बुधवार, 10/02/2016 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
हे पुस्तक बरेच महिने टेबलवर पडून होतं पण काही केल्या वाचायला मुहूर्त लागत नव्हता याचं माझं मलाच आश्चर्य वाटत होतं. कारण पुस्तकाच्या मुखपृष्ठावर चरित्रनायिकेचं नाव स्पष्ट लिहिलं आहे आणि तिचं प्रकाशचित्रही आहे. या राजबंदिनीच्या आयुष्याबद्दल फार सविस्तर माहिती मला नसली तरी एकंदर तिचं आयुष्य संघर्षाचं आहे हे माहिती होतं.

आयडीचे डू-आयडीस पत्र

लेखक नीलमोहर यांनी बुधवार, 10/02/2016 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
तू उडालास... बरं झालं. आणि लवकर उडालास ते आणखीन बरं झालं. नाही तरी जिलब्या टाकत सुटायचास.... काय उपयोग होता तुझा? समज दिल्यानंतर तुझं जिलब्या टाकणं कमी होईल या आशेनं संमंनी तुला डोसही दिला. पण आधी बरा लिहीणारा तू, सुमार जिलब्या प्रतिसादांचा रतीब लावायला लागलास, का तर म्हणे डोक्याला त्रास कमी होतो. मिपाकर तुझी खेचायचे, वारंवार तुझी संपादकांकडे तक्रार करुन, मालकांना पाचारण करायचे. त्यांनी तुला असा काही झोडला आणि म्हणाले, ' ....

..

लेखक प्रमोद देर्देकर यांनी गुरुवार, 04/02/2016 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
..मोकलाया दिशा दाही मठाधीपती.... तांब्या s मठ्ठा .... sपकॉर्न...पकॉर्न ... पाsपकॉर्न...पापकॉर्न....पॉपकॉर्न झाडाची फांदी ....संस्कृती ...विडंबन अमेरीकन स्त्रीवाद.... ... जिलेबी... जिलेबी...जिलेबी... नेलपॉलीश..टिंगलटवाळी ....व्यव व्यव व्यवच्छेद लक्षण...आरक्षण .. स्त्री पुरुष.. लाळ... गळत्येय... 'आनंदाचा प्रसंग आहे, दोन थेंब घे.... किलर खंडया.... अं हं खंडया किलर... रोहिथ वेमुला.... जात.... लदाख सायकलने बापरे!

स्वयंपाक चौथर्‍यावर नवर्‍यांना प्रवेश द्यावा काय ?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 31/01/2016 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
पे रणा अबाबा!!!: नवर्‍यांना महिलाअंतःपुर अर्थात स्वयंपाकचौथर्‍यावर प्रवेश द्यावा का नाही? हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. अखिल अंतर्जालात(आणि जगात!) या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची (आणि तितकीच खेदजन्य) बाब आहे. ( पुर्वीचं जग राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट ! यासंदर्भात "कचकून लाथा ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी कुठेच्च जास्त माहिती मिळाली नाही.

मोसाद - भाग ६

लेखक बोका-ए-आझम यांनी शुक्रवार, 29/01/2016 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
1 . मोसाद - भाग ५ मोसाद - भाग ६ माद्रिद, स्पेन. १९६३ च्या ऑगस्ट महिन्यात एका कंपनीच्या ऑफिसमध्ये तिच्या मालकाला भेटायला दोघेजण आले होते. हा मालक ऑस्ट्रियन होता. त्यांनी स्वतःची ओळख नाटो (North Atlantic Treaty Organization) देशांच्या गुप्तचर संस्थांचे अधिकारी अशी करून दिली. ते त्याच्या माजी पत्नीच्या शिफारशीवरून त्याला भेटायला आले होते.

हिटलरने खरंच आत्महत्या केली का?

लेखक ऋत्विका यांनी शनिवार, 23/01/2016 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
दुसरं महायुद्ध अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचलं होतं. जर्मनीचा पूर्ण पराभव झाल्याचं स्पष्टं झालं होतं. फॅसिस्ट इटलीने दोस्त राष्ट्रांसमोर शरणागती पत्करलीच होती. इटालियन कम्युनिस्टांनी बेनिटो मुसोलिनी आणि त्याची रखेली क्लारा पेटाक्सी यांना गोळ्या घालून त्यांच्या मृतदेहांची जाहीर विटंबना केल्याची बातमी नुकतीच बर्लिनमध्ये आली होती. ती बातमी येण्यापूर्वीच रशियाची रेड आर्मी बर्लिनमध्ये शिरलेली होती. बर्लिनच्या चौकाचौकांतून जर्मन सैनिकांचा प्रतिकार सुरु होता, परंतु पुढे झेपावणार्‍या रशियन आर्मीला थोपवण्यात जर्मन सैनिक अयशस्वी ठरत होते.