Skip to main content

इतिहास

|| बिर्याणीस्तोत्रम् ||

लेखक बॅटमॅन यांनी रविवार, 28/02/2016 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोकहो, मराठी दिन आणि बोलीभाषा सप्ताहादि सुंदर उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर हे संस्कृतचे शेपूट जरा विचित्र वाटण्याची शक्यता आहे. पण पुच्छवक्रतान्यायास मिपाकर समजून घेतीलशी आशा आहे.

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ६)

लेखक Anand More यांनी शनिवार, 27/02/2016 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ -------------------------------------- पर्शियन ऐवजी इंग्रजीचा राजभाषा म्हणून वापर व्हावा या मागणीचे खंदे समर्थक, इंग्रजी भाषेच्या शिक्षणाचा आणि इंग्रजी भाषेतून शिक्षणाचा पाया घातल्याने भारतात कुप्रसिद्ध झालेल्या मेकॉले साहेबांनी Indian Penal Code म्हणजे भारतीय दंड संहितेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद भूषवले होते.

बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - ३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 26/02/2016 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - १ बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - २ Simple, Free Image and File Hosting at MediaFire .......स्टॅलिन कधीच त्याच्या भाषणासाठी प्रसिद्ध नव्हता पण प्रसंगच असा होता की रशियन त्या साध्यासुध्या शब्दांनी पेटून उठली.

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ५)

लेखक Anand More यांनी शुक्रवार, 26/02/2016 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ |भाग ४ ----------------------------- कोणी देश अखंड रहावा म्हणून झटत होते. तर कोणी आपले संस्थान टिकावे म्हणून. कोणी स्वार्थाने अंध झाले होते तर कोणी परमार्थाने धुंद झाले होते. कोणी हक्क टिकवून ठेवण्याची पराकाष्ठा करत होते तर कोणी कर्तव्यपूर्तीसाठी झटत होते.

मिसळपावचे मारेकरी - ... ... ...

लेखक नीलमोहर यांनी गुरुवार, 25/02/2016 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
अधूनमधून 'मिसळपाव.कॉम' वरती काही लोकांचा धाग्यांचा तुफानी मारा पहायला मिळत असतो. असे लिहीणार्‍यांना 'वायझेड माझा' ने मिसळपावचे शिलेदार म्हणून वाखाणले होते. थोडेसे त्याविषयी आणि त्यासारख्याच लेखकांविषयी लिहावे म्हटले. तर आज सगळ्या भारतात आणि विश्वात जिथे जिथे मराठी लोक राहतात, मिसळपाव वाचतात त्यांना ... ... .. ही नावे (प्रत्येकाने आपापल्या अनुभव आणि माहितीनुसार नावे घालून गाळलेल्या जागा भरून घ्याव्यात) बरीच कुप्रसिध्द असल्यामुळे परिचयाची असतील. मागे वाचलेल्या एका लेखानुसार या सगळ्यांनी लिहिलेले सगळेच्या सगळे धागे हे इंटरनेशनल ट्यारपी-गेनर आहेत, ... ची १७०६०+ वाचने, ... ची १८८८१+ वाचने, ...

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ४)

लेखक Anand More यांनी गुरुवार, 25/02/2016 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ ------------- काश्मीर प्रश्नाचे वेगळे[पण समजून घेण्यासाठी मी प्रथम त्याची जुनागढ आणि हैद्राबाद बरोबर तुलना करतो आणि मग तेंव्हाचा घटनाक्रम सांगतो. जुनागढ भारतीय भूभागाला लागून होते. हैद्राबाद भारतीय भूभागाने वेढलेले होते. या दोन्ही संस्थानांची पाकिस्तानशी भौगोलिक जवळीक किंवा सलगता नव्हती. तर काश्मीर भारत आणि पाकिस्तान या दोनही देशांबरोबर मोठी सीमा असलेले संस्थान होते.

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ३)

लेखक Anand More यांनी मंगळवार, 23/02/2016 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ ------------- जुनागढ हे आजच्या गुजरात मधील एक संस्थान. इथल्या नवाबाने १५ ऑगस्ट १९४७ ला माउंटबॅटनच्या भौगोलिक जवळिकीचा सिद्धांत धुडकावून लावत पाकिस्तानात सामील व्हायचा निर्णय घेतला. युक्तिवाद होता, समुद्रमार्गे पाकिस्तान जवळ आहे. मंगरूळ आणि बाबरीवाडा हे जुनागढचे दोन अंकित प्रदेश होते. त्यांनी जुनागढच्या नवाबाच्या इच्छेप्रमाणे पाकिस्तानात सामील होण्यास नकार दिला. म्हणून नवाबाने या दोन प्रदेशात आपले सैन्य पाठवले. त्यामुळे आजूबाजूची इतर संस्थाने खवळली आणि त्यानी आपापले सैन्य जुनागढच्या सीमेवर नेवून भारतीय सरकारला साकडे घातले. आणि जुनागढ मध्ये एक अस्थायी सरकार देखील स्थापण्यात आले.

अ‍ॅना फ्रँक!

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 23/02/2016 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
. . 'डायरी ऑफ अ‍ॅना फ्रँक 'ची पारायणं केल्यापासून म्हणजे शालेय वयापासूनच तिच्याविषयी एक सुप्त उत्सुकता होती.त्यामुळे अ‍ॅमस्टरडॅमला गेलं की 'अ‍ॅना फ्रँक हाऊस'ला भेट द्यायची हे मी युरोपमध्ये राहण्याची सुतराम शक्यता नव्हती तेव्हाच ठरवून टाकलं होतं‍.

बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - २

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 23/02/2016 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - १ .....या सर्व कारणाने जर्मनीने ऑपरेशन बार्बारोसा आखले आणि अमलात आणले.... Simple, Free Image and File Hosting at MediaFire जाता जाता या मोहिमेचे नाव हिटलरने बार्बारोसा का ठेवले हे पाहणे मनोरंजक ठरेल. बार्बारोसा या जर्मन शब्दाचा अर्थ होतो लाल दाढीचा किंवा लाल केसांचा (रानटी ?) माणूस.