Skip to main content

इतिहास

स्टालिनग्राड भाग -२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 19/04/2016 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== स्टालिनग्राड : भाग - १... ================================================================== ..........२३ ऑगस्टला व्होल्गा नदीवर पोहोचल्यावर जर्मन सेनेनी पहिल्यांदा शहरातील तेलाच्या टाक्यांवर तुफानी बाँबवर्षाव केला. त्या टाक्यांना आग लागल्यावर जे दृश्य दिसत होते त्याचे वर्णन ‘क्राज्न्या झिवेझदा’ वर्तमानपत्राच्या एका व्हॅसिली ग्रॉसमन नावाच्या रशियन पत्रकाराने असे केले आहे, ‘आगीच्या ज्वाळा हजारो फूट आकाशाच्या दिशेने झेप घेत होत्या.

मोसाद - भाग ११

लेखक बोका-ए-आझम यांनी मंगळवार, 19/04/2016 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
. मोसाद - भाग १० मोसाद - भाग ११ १ एप्रिल १९७३, बैरुट, लेबेनॉन. सँड्स हे बैरुटमधल्या प्रसिद्ध हॉटेल्सपैकी एक. त्या दिवशी सकाळी तिथे नेहमीची लगबग चालू होती, त्यामुळे बेल्जियन पासपोर्ट घेऊन आलेल्या गिल्बर्ट रीम्बो नावाच्या पर्यटकाकडे कुणाचंही जरुरीपेक्षा जास्त लक्ष गेलं नाही. त्याच दिवशी दुपारी डीटर ऑल्टन्यूडर नावाचा जर्मन पर्यटक तिथे आला.

मारीचझंपीचे (बंगाली) कम्युनीस्ट ( )मृग ( )

लेखक माहितगार यांनी सोमवार, 18/04/2016 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजाल न्याहाळताना कोणतीशी दडपशाहींची यादी नजरे समोर उगवली, सहसा दडपशाहीच्या कथांमध्ये केवळ पात्रे बदललेली मनुष्य सर्वत्र सारखा असतो असा विचार करत फारसे डिटेल्स न वाचता वेगाने पुढे गेलो पण एक वेगळच नाव दिसलं मारीचझंपी, स्थळनामांची गमंत असते काय असेल या स्थळनामा मागे या उत्सुकतेने डिटेल्स उघडले. मारीचझंपी हे एक बेट आहे, पश्चिम बंगालच्या सुंदरबनातील एक संरक्षीत वन्यक्षेत्र हे लक्षात आलं.

स्टालिनग्राड भाग-१

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 14/04/2016 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
कबूल केल्याप्रमाणे मॉस्कोवर लिहिलेल्या लेखानंतर स्टालिनग्राडच्या युद्धावर हा लेख टाकत आहे. मातृभूमीसाठी रशियन सैनिकांनी काय काय पणाला लावले होते हे वाचल्यावर आपली बोटे तोंडात जातात. ( रशियात त्याच्या देशाला ते मातृभूमीच म्हणतात म्हणून असे लिहिले आहे) ज्यांना युद्धातील छायाचित्रे पहावत नाही त्यांनी हा लेख वाचू नये किंवा वाचलाच तर स्वतःच्या जबाबदारीवर वाचावा.

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

लेखक DEADPOOL यांनी शनिवार, 09/04/2016 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.

मोसाद - भाग १०

लेखक बोका-ए-आझम यांनी शुक्रवार, 08/04/2016 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
. मोसाद - भाग ९ मोसाद - भाग १० एप्रिल १९७५. बैरुट, लेबेनॉन. जगातल्या सर्वात सुंदर स्त्रीचं तिथल्या एका पार्टीमध्ये आगमन झालं होतं. पहिली लेबनीज मिस युनिव्हर्स जॉर्जिना रिझ्क. १९७१ मध्ये अमेरिकेमध्ये मायामी येथे झालेल्या स्पर्धेत तिने हा किताब जिंकला होता. आता चार वर्षांनी लेबेनॉनमध्ये ती अत्यंत यशस्वी मॉडेल बनली होती.

कोलाज...

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 05/04/2016 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
तर त्या दिवशी संध्याकाळी, जिथे आहेत उंच डोंगर, हिरवी झाडी, अन एक नदी. तिथे मी शोधत गेलो, एक गाव ओळखीचं, दुध दुभत्या गाईचं, पाणी भरलेल्या माठाचं, अन एक झाड बाभळीचं. फुलाफुलांच्या ताटव्यात, निसरड्या ओलेत्या गवतात, रिमझिमत्या पावसात मी शोधत गेलो एक चेहरा उदास. ज्याच्या कपाळी होते वैभवाचे विशाल तुरुंग, हरवलेल्या पायवाटा अन एक पराभव उत्तुंग. मी शोधत गेलो त्या डोळ्यांतले युगायुगांचे दु:ख.

(छटाक) नंतर

लेखक नाखु यांनी रविवार, 03/04/2016 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वार्ध आधीच्या भागात आपण वाचले की मिपा वाचक (मिवा) हा मिपा साहित्यीकाचे (मिसा) भेटीला जातो आनि त्यांचा काय संवाद होतो ते.अता त्याच मिपा वाच्काला साहेत्यकाने दिलेले आव्हान स्वीकारायचे अस्ते.
काय म्हणतोस तुला मिसा माहीतेयत, त्यांना ओळखतोस ??? वेडा रे वेडा अरे मिसांना ओऴखत असणं आणि "ओळखून" असण फार फरक आहे रे !!
या भागत तोच मिवा नेमका मिपा सामार्ज्याची रंगपचमी निमित्त सफर करायचा मनसुबा जाहीर करतो आणि मग तो मिसा बरोबर साम्राज्यात दाखल होतो.

दानव

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 03/04/2016 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री अचानक जाग आली. दिवा चालूच होता. तशी मला दिवा बंद करुनच झोपायची सवय आहे. पण आता तो कोणीतरी चालू केला होता. कधी माहीत नाही पण मघाचपासून नुसताच चडफडत पडलेलो. धड झोपही नाही जागही नाही. पण आता टक्क जागा झालो. वैतागच आला. साला हा सुश्या उशीरा खोलीवर येतो अन दिवा चालू ठेऊन बसतो. नुसताच बसत नाही तर कधी कधी झोपतोही तसाच. दिवा चालू ठेवूनच. मग मात्र संताप होतो. गाढ लागलेल्या झोपेचं मग खोबरं होतं. थोडा वेळ चुळबुळ करून मग पांघरुन काढून उठूनच बसलो. तर सुश्याच्या ऐवजी जगदिशच दिसला पुढे. साला एवढ्या रात्रीचं काहीतरी खात बसला होता.

महाभारताच्या राजकारणातली २ प्यादी

लेखक मृत्युन्जय यांनी शुक्रवार, 01/04/2016 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच साहना यांचा अर्जुन आणि कर्ण हा धागा वाचला. या धाग्यात वर्णलेली कथा मूळ मानल्या गेलेल्या महाभारतात सापडत नाही. पण त्यानिमित्ताने महाभारतातल्या या २ पात्रांच्या आडुन झालेले राजकारण तुमच्यासमोर आणण्याची एक संधी नक्कीच मिळाली. साधारण महाभारताच्या कथेतल्या या २ नायकांच्या सूडाच्या प्रवासातील मुख्य टप्पे सगळ्यांनाच ज्ञात आहेत. कर्ण आणी अर्जुन एकाच आईची दोन मुले दैवगतीने वेगवेगळ्या ठिकाणी वाढले.