कोलाज...
तर त्या दिवशी संध्याकाळी, जिथे आहेत उंच डोंगर, हिरवी झाडी, अन एक नदी.
तिथे मी शोधत गेलो, एक गाव ओळखीचं, दुध दुभत्या गाईचं, पाणी भरलेल्या माठाचं, अन एक झाड बाभळीचं.
फुलाफुलांच्या ताटव्यात, निसरड्या ओलेत्या गवतात, रिमझिमत्या पावसात मी शोधत गेलो एक चेहरा उदास.
ज्याच्या कपाळी होते वैभवाचे विशाल तुरुंग, हरवलेल्या पायवाटा अन एक पराभव उत्तुंग.
मी शोधत गेलो त्या डोळ्यांतले युगायुगांचे दु:ख. त्यात दडलेला बंडखोर अन एक शून्य.
त्या डोळ्यांत मला दिसल्या भिजून गेलेल्या अश्रूंच्या कडा, भिजून गेलेली एक संध्याकाळ अन भिजून गेलेला एक सवाल रोकडा.
आभाळभर उसळल्या आनंदाच्या लाटा, त्यांच्या दु:खाच्या छटा मी मोजतच गेलो. मग ठोकत गेलो आरोळ्या अज्ञात भविष्याच्या.
तो चेहरा मला भेटला नाही.
मात्र एक बंडखोर भटकतोय काटेरी वनात, दु:खाच्या सावलीच्या शोधात... अजूनही...
याद्या
6184
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
ओॲसीस...
एक अतिशय भयाण अमूर्त विश्व
असा मी असामी मधली एक
=))
In reply to असा मी असामी मधली एक by यशोधरा
ऑस्स लग्गेच सांगायचं नै.
In reply to =)) by अर्धवटराव
णाणु सरणजामे!!
In reply to ऑस्स लग्गेच सांगायचं नै. by यशोधरा
तुमचं लेखन आज थोडं ग्रेससारखं
अगदी अगदी ग्रेस + जीए
In reply to तुमचं लेखन आज थोडं ग्रेससारखं by विजय पुरोहित
पाप धुतले! ;)
कायीयेक्क कळल नाय
मस्त!!
छान!
मस्तच!!
अश्वत्थामा ?
थँक्स टू ऑल!
आमचं लक्ष असतंय हो :)
नै हो, सगळी वाक्ये नवीन आहेत!
In reply to आमचं लक्ष असतंय हो :) by नीलमोहर
हे पण नाही ?
In reply to नै हो, सगळी वाक्ये नवीन आहेत! by जव्हेरगंज
मला बरीचशी वाक्यं रिपीट वाटली
In reply to हे पण नाही ? by नीलमोहर
विधवेच दुःख ?
निःशब्द....
मनाला काहीतरी टच झाले.. पण
In reply to निःशब्द.... by अमृता_जोशी
हे हे...
ज्याच्या कपाळी होते वैभवाचे विशाल तुरुंग, हरवलेल्या पायवाटा अन एक पराभव उत्तुंग. आयला, मला तर राहुल गांधीच आठवला..हो, तिथे पण म्याच होते खरे..
In reply to हे हे... by ब़जरबट्टू
अश्वत्थामा दिस्ताय जनु..
आयुष्याच्या अखेरीस..