मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इतिहास

‘विक्रांत’

पराग१२२६३ ·
लेखनप्रकार
आज नौदल दिन. 50 वर्षांपूर्वी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात म्हणजेच बांगलादेश मुक्तिसंग्रामात 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदलाने गाजवलेल्या पराक्रमाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी 4 डिसेंबरला भारतात नौदल दिन साजरा केला जातो. त्या युद्धात पराक्रम गाजवलेल्या आणि सेवानिवृत्तीनंतर संग्रहालय म्हणून नावारुपाला आलेल्या, अल्पावधीतच मुंबईतील एक आकर्षण ठरलेल्या, पण आता इतिहासजमा झालेल्या ‘विक्रांत’वरील त्याच संग्रहालयाविषयी... ‘विक्रांत’ने गाजवलेल्या पराक्रमाची भावी पिढीला ओळख व्हावी या हेतूने त्यावर नौदलाने एक तात्पुरते पण आकर्षक संग्रहालय उभारले होते.

आठवण एका साथीदाराची...

पराग१२२६३ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
27 नोव्हेंबर 2001 ला पहिल्यांदा Voice of Russia ची हिंदी सेवा ऐकण्यासाठी संध्याकाळी साडेसहाच्या काही मिनिटं आधीच कार्यक्रमपत्रिकेवर लिहिल्याप्रमाणे त्या लघुलहरींवर नभोवाणी संचाची (रेडिओ) सुई नेऊन ठेवली होती. ठीक साडेसहा वाजता या नभोवाणी केंद्राची signature tune वाजू लागली आणि पाठोपाठ उद्घोषणाही ऐकू आली - ‘ये रेडिओ रुस है, हम मॉस्को से बोल रहें हैं।’ हे ऐकून खूपच प्रफुल्लित झालो.

इतिहासाचे डिटेक्टिव

केदार भिडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपण इतिहासात जसजसे मागे जाऊ तसे त्या त्या काळाची कहाणी सांगणारी साधने बदलत जातात. अधिक मागे गेले की एक काळ असा येतो की लिहिलेले असले तरी नेमके काय लिहिले आहे हे वाचता येत नाही किंवा त्यातही काळाच्या ओघात शिल्लक राहिलेले अपुरे असते. अजूनही मागे जावे तर लिखित साधने अगदीच सापडेनाशी होतात. अशावेळी इतिहास जाणून घेताना आपल्याला डिटेक्टिवच्या भूमिकेत शिरावे लागते. अनेक घटना या लिखितपूर्व काळात घडलेल्या असतात आणि एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे आपला ठसा मागे ठेऊन जातात. गुन्हेगार कधी हाताचे ठसे मागे ठेवतो, बुटाचा ठसा सोडतो, एखादा केस किंवा पार्किंगमध्ये गाडीच्या चाकाचे ठसे मागे ठेऊन जातो.

इजिप्तमधील "डिस्कव्हरी"

निमिष सोनार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माहितीच्या खजिन्यासाठी मी नेहमी डिस्कव्हरी चॅनेल बघत असतो. अशातच इजिप्तच्या अनेक प्राचीन गूढ गोष्टींबद्दल काहीतरी बघावे असे वाटले म्हणून काही महिन्यापूर्वी एका रविवारी ओटीटी प्लॅटफॉर्मवर डिस्कव्हरी प्लस मध्ये इजिप्तवर कार्यक्रम शोधले तेव्हा "एक्सपेडिशन अननोन: इजिप्त स्पेशल" हा कार्यक्रम बघण्यात आला. (अज्ञात मोहीम: इजिप्त विशेष) याची रूपरेषा थोडक्यात अशी आहे की, कार्यक्रमाचा अँकर जोश गेट्स हा इजिप्तमधील एका साईटवर क्रिसला भेटतो. तिथे डॉ. झाही हवास हे पुरातत्व संशोधक असतात. त्यांच्या देखरेखीखाली उत्खनन सुरू असते.

कंबोडियाविषयी दोन लेखांची नोंद

गामा पैलवान ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लोकहो, कांभोज देश अर्थात कंबोडिया याबद्दल संदीप कुलकर्णी यांनी दैनिक सकाळ मधल्या पैलतीर सदरात दोन लेख लिहिले होते. सकाळ वर्तमानपत्राचे सदर दुवे कालबाह्य झाले आहेत. म्हणून ते दोन लेख इथे डकवतो आहे. अशी डकवणी मिपाच्या नियमाविरुद्ध आहे. परंतु नोंद ठेवण्यासाठी या लेखाचा व चर्चेचा उपयोग होईल. तसंच सदर घटनेचा भारताच्या सुरक्षेशी व दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय धोरणांशी अप्रत्यक्ष संबंध आहे. त्यामुळे सदर डकवणीचा अपवाद करावा ही संपादकमंडळास विनंती.

फिल्ड मार्शल जनरल रोमेल - The Desert Fox.

kvponkshe ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज हिटलरचा शूर आणि तितकाच दुर्दैवी सेनानी डेझर्ट फॉक्स फिल्ड मार्शल जनरल रोमेल याचा मृत्युदिन . त्या निमित्ताने हा छोटासा लेख पुनर्प्रसारित करतोय. या लेखातील माहितीची गंगोत्री बव्हंशी संगणक आंतरजाल आहे आणि माहिती अचूक ठेवण्याचा प्रयत्न केलाय . सूचनांचे स्वागतच होईल . प्रारंभीचे जीवन :- एर्विनचा जन्म १५- नोव्हेंबर १८९१ रोजी स्टुटगार्ट जवळिल हाइडेनहाइम येथे झाला . प्रोफेसर एर्विन रोमेल ( सिनिअर ) आणि त्यांची पत्नी हेलीन व्हॉन लूज यांचे हे दुसरे अपत्य . एर्विन याचे प्राथमिक शिक्षण स्थनिक शाळेत झाले . लहानपणापासूनच त्याच्यात अभियान्त्रिकी कौशल्ये दिसून येत होती .

नीली वर्दीवालों का दल

पराग१२२६३ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
8 ऑक्टोबर, भारतीय हवाईदलाचा स्थापना दिवस. याच दिवशी 1932 मध्ये अवघ्या 4 वेस्टलँड विपिटी विमाने आणि 5 वैमानिकांसह भारतीय हवाईदलाने रॉयल एअर फोर्सचे सहाय्यक दल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतरच्या गेल्या 89 वर्षांमध्ये भारतीय हवाईदलाच्या क्षमतेत बरीच वाढ झालेली असून ते विविध प्रकारच्या आपत्तींच्या काळात महत्वाची भूमिका बजावत आलेले आहे आणि यापुढेही अशीच भूमिका बजावत राहील.

पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक समर्थ रामदास

Kadamahesh5 ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक समर्थ रामदास "वार्ता विघ्नाची" म्हणजे अफजल खान विजापूरहुन निघाला. सुखकर्ता दुःखहर्ता......ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हंटली जाते.हि आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे.गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. देवादिकांसह संतांनी देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे.भाद्रपद शु. ४ ते भाद्रपद शु.१४ हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे.प्रचलीत गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे. ह्या गणेशोत्वाला इ.स.२०२१ साली ३४५ वर्ष पूर्ण होतं आहेत. समर्थे सुंदरमठी गणपती केला !

भारतीयांचे अपमानास्पद पराभव:- प्रकरण -१ खडकीची लढाई :- भाग - ३ (परिसमाप्ती)

kvponkshe ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पेशव्याचे सेनानी विठ्ठल नरसिंह विंचूरकर (पानिपतावर झालेल्या लढाईतले ते विठ्ठल शिवदेव विंचूरकर वेगळे आणि हे वेगळे) हे ब्रिगेडियर स्मिथ च्या बरोबर काही दिवस होते. त्यांनी इंग्रजी फौजेतील शिस्त जवळून पहिली होती. त्यांनी पेशव्यास "इंग्रजांशी आता बिघाड न करण्याचा सल्ला दिला ". पण रावबाजीने तो ऐकला नाही. तरीहि विंचूरकर पेशव्याची आज्ञा मानून ससैन्य हजर झाले होते. गोविंदराव काळे या बारभाईतील तत्कालीन एकमेव हयात सेनानींचे म्हणणेही युद्धाच्या विरोधात होते. मराठ्यांच्या लढायांचा इतिहास या पुस्तकात त्यांचे म्हणणे दिले आहे. " तूर्त इंग्रजांशी लढाईचा प्रसंग आणू नये.

जरा याद करो कुर्बानी

सुनिल पाटकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जरा याद करो कुर्बानी... शेतात राबणारे हात जेव्हा हातात लाठी घेतात. रानोमाळ भटकणारा आदिवासी जेव्हा संघटित होऊन पेटतो, तेव्हा मोठी आंदोलने उभी राहतात. मग ही आंदोलने स्वातंत्र्यपूर्व काळातील असो कि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची !. ब्रिटिश सरकारला चले जाव असे ठणकावून सांगणारा महाडचा किसान मोर्चा हा त्यातील एक. ब्रिटीश साम्राज्याला हादरवून सोडणारे आणि ब्रिटिश सरकारला मोठा धक्का देणारा हे आंदोलन आजही प्रेरणादायी आहे. काय होते हे आंदोलन कशासाठी होते हे आंदोलन असे प्रश्न नव्या पिढीला सहाजिकच पडणारे आहेत.