Skip to main content

इतिहास

एक पुस्तक वाचताना...

लेखक श्रावण मोडक यांनी रविवार, 20/09/2009 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. आंतरजालावरच एका नव्या संवादाला सुरवात झाली होती. मैत्रीच्या वाटेवरची ती पहिली पावलं. अडखळती. स्वाभाविकच चर्चेचा विषय वाचन, श्रवण, दर्शन या गोष्टींचाच. एका प्रश्नाच्या उत्तरात या मित्रानं त्याच्या वाचनाची यादी सहज समोर ठेवली. मोठी. माझं वाचन खूपच कमी. मग आवडलेल्या पुस्तकांचा विषय निघाला. त्या चर्चेतच उल्लेख झाला 'व्यासपर्व'चा. दुर्गाबाईंचं हे पुस्तक आपल्याकडं होतं हे आठवून गेलं. आपल्या संग्रहातील काही, बर्‍याच किंवा अनेक पुस्तकांचं जे होतं तेच या पुस्तकाचंही झालं होतं. ते कपाटातून गायब होतं. ते गायब झाल्याचं आधीही ठाऊक होतंच.

बतावणी!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 11/09/2009 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
स्थ्ळ - वैकुंठ शीन - हातात 'मादक आणी जहाल'चा मग सहजच घेऊन महालात श्री विष्णू पहुडले आहेत ६० इंची एल्सीडीवर प्रोग्रॅम सुरु आहे जोरजोरात हसण्याचे आवाज येताहेत! (महालात प्रवेश करत) नारद : "नारायण, नारायण!" विष्णूंचं लक्ष नाही असं पाहून पुन्हा एकदा मोठ्याने "नाऽऽरायण! नाऽऽरायण!!" टीवीवरची नजर ढळू न देता विष्णू एका हातानेच थांबायची खूण करतात! एवढ्यात कार्यक्रमाचे प्रायोजक 'मिपाकर स्वयंभोचक संघाची' अ‍ॅड सुरु होते आणी विष्णू टीवी म्यूट करतात. "हा हा हा! मेलो मेलो!! कॉकटेल उडाली ..ठ्यॉ!! बसा बसा मुनिवर!!" "काय हे देवा?

राजजींच्या 'रोखठोकनाम्या'ची 'ब्ल्यू प्रिंट'

लेखक भोचक यांनी गुरुवार, 03/09/2009 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा वसा घेऊन पुढे निघालेले तेजतर्रार नेते, मराठी माणसाची बुलंद तोफ, उत्तर भारतीयांचे निर्दालक, हिंदीनिर्मूलक श्रीमान राजजी ठाकरे यांच्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' नामक संघटनेने गत काही दिवसांत तमाम मराठीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुराणकाली राक्षस ही संज्ञा वापरली जायची, तद्वतच हल्ली महाराष्ट्र देशी 'भय्या' ही संज्ञा जवळपास त्याच अर्थी वापरली जात आहे. तर सांगायचे असे की या भय्या मंडळींचे महाराष्ट्र देशीची राजधानी मुंबई व इतर नगरांत वर्चस्व वाढू लागल्याचे राज यांच्या चाणाक्ष चष्म्याने टिपले आणि नवनिर्माण बाजूला ठेवोन त्यांनी 'झाडाझडती' हाती घेतली.

तुळापुर

लेखक हर्षद आनंदी यांनी शुक्रवार, 28/08/2009 04:48 या दिवशी प्रकाशित केले.
या मंगळवारी अचानक तुळापुरास जाण्याचा योग आला. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज व छंदोगामात्य कवी कलश यांच्या धर्म-बलिदानाच्या आठवाने ऊर भरुन येत होता. ईतिहासकारांनी दुर्लक्षलिले, काही अगम्य चुका (की थोरल्या छत्रपतींच्या राजकारणातील अतर्क्य खेळ्या व जबाबदार्‍या वयाच्या ८व्या वर्षापासुन शंभर टक्के यशस्वी करणारे), आप्तांच्या रोशाला फशी पडलेले आणि पराक्रमासोबत कवित्वाचे बहुमोल लेणे घेऊन जन्माला आलेल्या त्या महान योध्याचा जीवनपट डोळ्यापुढे सरकत होता.

सभासदाची बखरं

लेखक शैलेन्द्र यांनी शुक्रवार, 14/08/2009 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली बखर हे मराठ्यांच्या इतिहासाचे अतिशय महत्वाचे असे अस्सल साधन आहे. मृणाल भिडे या विदुशीने ही बखर पी डी एफ मधे तयार केली आहे. हा अमुल्य ठेवा नक्कि वाचावा असा आहे. आपणांस तो हवा असल्यास आपला टेस्ट मेल shailendrakawade@gmail.com इथे पाठवावा.

आणि कॉमन मॅन बोलला!

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शुक्रवार, 14/08/2009 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
हं, कॉमन मॅन हे नाव थोडंसं आठवतंय ना (हल्ली कॉमनमॅनच्या जागी 'कॉनमेन' हाच शब्द एवढ्या वेळा आपण वाचतो की विचारावंसं वाटलं!) काल पद्मविभूषण आर. के. लक्ष्मण यांचा मानसपुत्र, 'कॉमन मॅन'वर आधारित एकपात्री कार्यक्रम पाहिला. लेखक: अनिल जोगळेकर, भाषांतरकारः गौतम जोगळेकर, संगीत: बंकिम आणि बाकी सर्व श्रेय प्रा. अजित केळकर यांचं; पण केळकर म्हणतात सर्व श्रेय आपल्या सगळ्यांमधे असणार्‍या असामान्य सामान्यांचं आणि हे असामान्यत्व चितारणार्‍या कार्टूनीस्ट आर. के. लक्ष्मण यांचं! एकविनोदाच्या अंगाने जाणारा तरीही अंतर्मुख करणारा कार्यक्रम असं याचं वर्णन एका वाक्यात करता येईल.

एक कर्मयोगी रामदास

लेखक भास्कर केन्डे यांनी गुरुवार, 06/08/2009 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
बालवयापासून कौटुंबिक जबाबदार्‍या, काबाडकष्ट करून घेतलेले शिक्षण आणि पुढे नोकरी व एकत्रित कुटुंबासाठी वाहून घेतलेले जीवन हा आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबप्रमुखाच्या जीवनाचा लेखाजोखा. यात कितीतरी मूक यातना, क्षणोक्षणी उराशी बाळगलेली परंतू कधीही पूर्ण न झालेली स्वप्ने, समाजाबरोबरच आप्तस्वकियांकडून झालेला मानसिक त्रास असा प्रचंड गाळ साचलेला असतो. या गाळात रुतून धीर खचलेल्या मनाने व क्षीण बनलेल्या शरीराने मग हा मध्यमवर्गी कुटूंब प्रमूख काळाशी तडजोडी करत उत्तर आयुष्याला खंगलेल्या अवस्थेत सामोरा जातो. त्यातही काही शारीरिक व्याधींचा ससेमिरा लागलेला असेल तर विचारायलाच नको.

फिलिपाईन्सच्या दिवंगत माजी राष्ट्राध्यक्षा श्रीमती कोरी अक्वीनो यांची हृद्य आठवण

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 03/08/2009 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
फिलिपाईन्सच्या दिवंगत माजी राष्ट्राध्यक्षा श्रीमती कोराझॉन ("कोरी") अक्वीनो यांच्या कांहीं हृद्य आठवणी
दोन दिवसापूर्वी, १ ऑगस्ट रोजी, फिलिपाईन्सच्या माजी राष्ट्राध्यक्षा श्रीमती कोराझॉन ("कोरी") अक्वीनो काळाच्या पडद्याआड गेल्या. २६ फेब्रुवारी १९८६ रोजी "लोकक्रांती"द्वारा (People Power) हुकुमशहा मार्कोस यांना चारी मुंड्या चित करून त्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. त्या आधी मार्कोस यांनी अनेक कॢप्त्या लढवून निवडणूक "चोरण्या"चा प्रयत्न केला, पण तो लोकांनी हाणून पाडला.

देशांच्या राजकारणांतील स्त्रीयांचे योगदान

लेखक प्रदीप यांनी रविवार, 02/08/2009 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
कोरी अ‍ॅक्विनो ह्या फिलिपिन्सच्या एकेकाळच्या राष्ट्राध्यक्ष असलेल्या स्त्रीचे काल निधन झाले. फर्दिनांद मार्कोस ह्या हुकुमशहाची राजवट उलथून टाकून लोकशाही सरकार प्रस्थापित करण्याचे श्रेय (१९८६) ह्या स्त्रीकडे जाते. मार्कोस ह्या जुलुमशहाने १९७२ सालापासून फिलिपीन्समधे अनिर्बंध सत्ता उपभोगली. 'निनो' अ‍ॅक्विनो ह्या तरूणाने त्याचा सामना करण्याचा प्रयत्न केला तो निष्फळ ठरला व अ‍ॅक्विनोस त्याच्या कुटुंबासह परागंदा व्हावे लागले. १९८३ साली निनो लष्कराच्या देखरेखीखाली देशात परतताच मनिला विमानतळावरच त्याची हत्या करण्यात आली. ह्यामुळे तेथे जनक्षोभ उसळला.

भाषा हरवली म्हणजे अस्तित्व हरवते ?

लेखक भोचक यांनी मंगळवार, 28/07/2009 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तर भारतीयांच्या आक्रमणापुढे माघार घेत चालेला मराठी माणूस आणि त्याची भाषा आणि संस्कृती हा विषय गेल्या अनेक दिवसांपासून अनेकांच्या चिंतेचा, चिंतनाचा बनला आहे. अनेकांचे ते राजकीय हत्यार बनले आहे आणि अनेकांची दुखरी नस. शिवाय व्यक्तिगतरित्या प्रत्येकाचा या विषयाकडे पाहण्याचा आपापला चष्माही आहे. भाषा हरवली म्हणजे अस्तित्वच हरवते, असाही मुद्दा उच्चरवात मांडला जातोय. याच अनुषंगाने इथे इंदूरमध्ये रहात असल्याने मला काही आढळलं हे मांडण्याचा हा प्रयत्न... प्रामुख्याने होळकर काळापासून मराठी वर्ग इथे आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण त्यानंतरही महाराष्ट्रातून या भागात होणारे स्थलांतर थांबलेले नाही.