Skip to main content

इतिहास

शिवरात्र-नरहर कुरुंदकर...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 21/02/2012 02:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज मनात आलं,मी तर तात्विक अर्थानं काही धार्मिक उरलेलो नाही.त्यामुळे आज मी काही कुठे स्वतःसाठी शिवरात्री निमित्तानं स्वतः शंकराची पूजा उपासना वगैरे करायला बसणार नाही.पण असं असलं तरी व्यावहारिक अर्थानं अश्या दिवशी काही चांगलं करावं,असं वाटण्या इथपर्यंत मी धार्मिक आहेच...मग काय करायचं..? झटकन लक्षात आलं,की आपण जर का शिवरात्र या दिवसाचा एक चांगला अनुषंग मनात ठेवत आहोत.तर नरहर कुरुंदकरांच्या शिवरात्र या पुस्तकाची आपल्याला जमेल तशी ओळख का करवुन देऊ नये...? अलिकडेच सागर यांनी कुरुंदकरांचं एक पुस्तक वाचकां समोर ठेवलच आहे. तसाच माझाही हा एक अल्पमती प्रयत्न....

राजा शिवछत्रपती - भवानी तलवार आणि जीवनपट !

लेखक मालोजीराव यांनी रविवार, 19/02/2012 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
आज शिवजयंती...छत्रपतींच्या जीवनातल्या अनेक गूढ अद्याप संशोधन चालत असलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे भवानी तलवार, शिवजयंतीच्या निमित्ताने आज हा लेख लिहावासा वाटला.खाली दिलेल्या माहितीमध्ये मिपाकर नक्कीच अभ्यासपूर्ण भर टाकतील ! पुरेसा वेळ न मिळाल्याने लेख थोडा घाईगडबडीत झाला कृपया सांभाळून घ्या ! भवानी तलवार (जगदंबा तलवार) उगम - इ.स.१५१० साली आल्फोन्सो आल्बुकर्क याने गोवा जिंकला .त्याचा सेनापती डियागो फर्नांडीस याने लगेचच सावंतवाडीवर हल्ला केला,पण हल्ला सपशेल फसला आणि पोर्तुगिजांचा दारूण पराभव खेमसावंत भोसल्यांनी केला.त्यावेळी हि पोर्तुगीज राजघराण्यातील (Imperial) तलवार खेमसावंत यांच्याकडे आली.

पोथ्यांचा अमूल्य खजिना

लेखक निनाद यांनी गुरुवार, 16/02/2012 06:09 या दिवशी प्रकाशित केले.
पोथ्यांचा अमूल्य खजिना एचपीटी कॉलेजमधील भाऊसाहेब वर्तक ग्रंथालयात असा जतन केले आहे हे वाचून अतिशय आनंद झाला. आंतरजालावर शोध घेतांना मला हा दुवा आढळला. ही माहिती इतरांनाही व्हावी म्हणून दुवा आणि लेख येथे देत आहे. अभ्यासकांना त्याची मदत होईल अशी आशा आहे. लेखाच्या शेवटी लेखिकेचा संपर्कही आहे. (श्री शरद यांनी मागे काजळाची शाई वापरून पाण्यातही अभंग सुरक्षित ठेवण्याचा प्रयोग केला होता. त्या प्रयोगाशी हे सुसंगत असल्याने यांना हा दुवा पाठवला होता. त्यांनी तो सर्वांनाच उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले म्हणून देत आहे.

जय जय रघुवीर समर्थ...!

लेखक प्यारे१ यांनी बुधवार, 15/02/2012 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच तरुण तडफदार उमेदवार मा. श्री. स्पा राजे डोंबिवलीकर (ठाकुर्लीकर--- > चो... बस्स) यांचा मी हापिसात काम करीत असताना (ल्ह्यायचं आस्तंय ;) ) फोन आला. डोक्यात ऑफिस नि कानात स्पाचा आवाज! काही कळेना म्हणून थांब मीच तुला फोन करतो म्हणून फोन ठेवला. नंतर नेहमीप्रमाणे खरडाखरडीतच नक्की काय विषय होता असे विचारले असता स्पाने ऐतिहासिक शैलीत 'समर्थांनी बोलावलंय, शिवथरघळीत जायचंय' म्हणून खरडवलं. शोधाशोध करतो म्हणून सांगून कामाला लागलो. ११, १२ फेब्रुवारी शनिवार, रविवार ठरलं. स्पा, सूड नी किसन हे त्रिदेव नेहमीप्रमाणे पाठीवर बॅग्ज घेऊन डोळ्यासमोर होतेच.

छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य : नरहर कुरुंदकर

लेखक सागर यांनी शुक्रवार, 10/02/2012 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
Kurundkar आजच नरहर कुरुंदकरांचे 'छत्रपती शिवाजी महाराज जीवन - रहस्य' हे अवघे साठ पानांचे पुस्तक वाचून पूर्ण केले. नरहर कुरुंदकरांच्या तिसाव्या स्मृतीदिनानिमित्त या पुस्तकाचे वाचन माझ्याकडून घडावे हा एक योगच म्हणावा लागेल. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे या छोट्याशा पुस्तकाचे वर्णन करता येईल.

फरियाबाग ....

लेखक पियुशा यांनी शुक्रवार, 10/02/2012 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
"फरियाबाग " मागील भागात आपण भुइकोट किल्ल्याची माहीती घेतली आजच्या भागात जाणुन घेउया " फरियाबाग" या वास्तु/इमारती/महालाबद्द्ल :) या ईमारतीचा इतिहास थोड्क्यात :- हे आहे हेन्री कझेन्स या युरोपियन इसमाने, साधारण इ. स. १८८० च्या दशकात, काढलेलं फारिया बागेचं छायाचित्र. इतिहास : अहमदनगर हे शहर आताच्या आधुनिक भारतात, महाराष्ट्र राज्यात येतं. हे शहर निझामशाहीतलं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं शहर होतं.

कोडॅक मोमेंट्स

लेखक रामदास यांनी सोमवार, 06/02/2012 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी बँकेच्या रांगेत उभा होतो . काम संपतच आलं होतं आणि त्यानी मला बघीतलं . हा माझा मित्र कमोडीटी ब्रोकर आहे . सोनं चांदी तांबं -जस्तं सारख्या कमोडीटीत व्यवहार करतो. हात धरून जवळजवळ ओढतच त्यानी मला बाहेर काढलं . "बघीतलंस ?" माझा चेहेरा प्रश्नार्थक . "पुन्हा एकदा माझा अंदाज बरोब्बर निघाला. चांदीचा भाव पडला." "जवळजवळ सत्तर हजाराच्या आसपास होती ना रे चांदी ?" मी काहीतरी बोलायचं म्हणून बोललो "तो इतिहास झाला रे. ओसामा मेला त्याच्या दुसर्‍या दिवशी त्रेप्पन्न हजारावर आला होता भाव.