Skip to main content

इतिहास

भगवी वस्त्रे आणि राजकारणी

लेखक नर्मदेतला गोटा यांनी रविवार, 26/02/2012 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
भगव्या वस्त्राला आपल्याकडे एक वेगळे स्थान आहे. समर्थ रामदास, स्वामी विवेकानंद हे भगवी वस्त्रे परिधान करीत. ज्याने सार्‍या भैतिक सुखांचा त्याग केला आहे अशांनीच भगवे कपडे घालावेत असा काही संकेत असावा. भारतीय राजकारणात वावरणार्‍या काही व्यक्तीदेखील भगवे कपडे वापरताना दिसतात. त्यामुळे जाणून घ्यावेसे वाटते भगवी वस्त्रे घालण्यासाठी काही नियम आहेत का ? कुणा अधिकारी गुरूने दिक्षा द्यावी लागते का ! भगवे कपडे घातल्यानंतर घरादाराचा त्याग करावा लागतो का ? भगवी वस्त्रे घालूनही घरातच राहिल्याने स्वतःवर काही वाइट परिणाम होतो का ?

INDIA UNBOUND

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 25/02/2012 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
इतिहास आपण सगळेच शिकतो. इतिहासाची शालेय पुस्तके असो वा कोणा अभ्यासकाने कागदपत्रे मिळवून लिहीलेला राजकीय इतिहास असो, क्वचितच त्यातून सामान्य माणसाच्या आयुष्यावरचा परिणाम दिसतो. त्यामुळे इतिहासावरून एक सामान्य माणूस म्हणून काय शिकायचे असाच प्रश्न पडतो. संपूर्ण शाळेत आणि इतर अवांतर वाचनात भारताचा इतिहास मी वाचला. एक निसर्गसंपन्न, संस्कृतीचे पाळणाघर असलेला आणि तत्त्वज्ञानाचा गाभारा असलेला देश म्हणून भारताच्या उज्ज्वल भूतकाळाचा उदोउदो वाचला, इंग्रजांची तथाकथित जुलमी राजवट आणि त्याविरुद्ध दिलेला तेजस्वी लढा, मोठमोठे तत्त्वनिष्ठ नेते आणि क्रांतिकारक यांचे बलिदान हे सगळं वाचलं.

((मी सदस्य होणारच!))

लेखक अन्या दातार यांनी गुरुवार, 23/02/2012 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा: http://www.misalpav.com/node/20789 आमच्या एका मित्राला तुम्ही कुणीच ओळखत नाही. दरवेळी अडचणीत सापडला किंवा एखाद्या नवीन ध्येय धोरणाने पछाडला गेला की आमचा हा मित्र, हा सखा, सुहृद आमच्याकडे धाव घेत असतो. त्याच्या दृष्टीने तो म्हणजे सुदामा आणी मी म्हणजे कृष्ण, तो म्हणजे हृतीक आणि मी म्हणजे राकेश, तो म्हणजे ओमार अब्दुल्ला आणि मी म्हणजे शेख अब्दुल्ला, तो म्हणजे दीप दासगुप्ता आणि मी म्हणजे गांगुली असे बरेच काय काय आहे.