Skip to main content

इतिहास

प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक आणि विस्तव वल्ल्यायण - एक परिचय

शुक्रवार, 20/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
कांदा संस्थान - भारताची अग्नि ५ ही चाचणी यशस्वी होणार याचे भाकित तीन महिन्यांपूर्वीच मी केले होते असे जाहीर करून प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक यांनी संस्थानात खळबळ माजवलेली आहे. प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा हा वृत्तांत. "माझ्याकडे इमेल्स आहेत. आमच्या मित्रांना पाठवलेल्या." पुरावा म्हणून हातातले प्रिंटाउट फडफडवत प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक म्हणाले. "त्यात मी स्पष्टपणे लिहिलंय" आपला चष्मा लावत ते वाचायला लागले. 'मग, विस्तव पेटणार का पाच?' "हे माझ्या मित्राने विचारलेलं आहे.

दोन दुर्मिळ पुस्तके परत.

गुरुवार, 19/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, ज्यांना या विषयात रस आहे त्यांनी ही पुस्तके जरूर घ्यावीत. (मी नाव नोंदवणार आहे.) इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी स्थापन केलेले भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे आपली १०१ वर्षांची वाटचाल पूर्ण केली. या कालावधीत मंडळाने अनेक् मान्यवरांची अनेक विषयांवरील पुस्तके, विविध शोधनिबंध त्रैमासिकांतून् इतिहास अभ्यासकांसाठी प्रकाशित केलेले आहेत. डॉ.ग.ह.खरे हे प्रदीर्घ् कालावधीसाठी मंडळात कार्यरत होते. त्यांचा बहुविध अभ्यास सर्वांच्याच परिचयाचा आहे. नाणी, ताम्रपट्, शिलालेख तसेच फर्माने व कागदपत्रे इ.चे वाचन डॉ.खरे कित्येक वर्षे करीत होते.

डुप्लिकेट आयडी : एक मार्गदर्शन

गुरुवार, 19/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
ढिस्क्लेमर :- १) हा धागा निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने काढला असून, कोणत्याही गैरकृत्याला उत्तेजन देण्याचा हेतू नाही. २) धाग्यातील युक्त्या वापरून देखील आपण तोंडावरती पडल्यास लेखक जबाबदार नाही. मित्र हो, काल आमचे मित्र श्री. मृत्युंजय ह्यांची एक प्रतिक्रिया वाचून आम्हाला फारच दु:ख झाले. येवढी वर्षे आंतरजालावरती काढून देखील अजून बर्‍याच सदस्यांना डुप्लिकेट आयडी बद्दलचा अभ्यास कमी पडतो आहे हे पाहून आता ह्यावरती मार्गदर्शन केलेच पाहिजे हे आम्ही जाणले.

चितगांव संग्रामाचा ८२ वा स्मृतिदिन

बुधवार, 18/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक १८ एप्रिल. ८२ वर्षांपूर्वी याच दिवशी मास्टरदा उर्फ हुतात्मा सूर्यसेन यांनी भारतीय प्रजासत्ताक सेनेच्या अवघ्या ६४ सैनिकांनासह रात्री ९.५० ला एल्गार केला आणि अगदी काही दिवसांसाठी असेल पण चितगांव स्वतंत्र केले आणि चितगांव वर तिरंगा फडकावला. या सेनेत सर्वात लहान योद्धा होता तो अवघ्या १४ वर्षांचा सुबोध रॉय! स्वातंत्र्यवेडाने पछाडलेले मूठभर शिपाई विरुद्ध इंग्रजांचे प्रचंड संख्येने आलेले प्रशिक्षित व शस्त्रसज्ज सैन्य या अतिविषम संग्रामात अनेक विरांच्या आहुती पडल्या आणि मास्टरदांना माघार घ्यावी लागली. मात्र सेना विखुरली ती पुन्हा एकदा एकवटण्यासाठीच.

एका तलवारबाजाची कहाणी

बुधवार, 11/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
पांडवांच्या वनवासातले १२ वे वर्ष संपत आले तसे दुर्योधनाच्या चेहर्‍यावरचे चिंतेचे जाळे वाढतच चालले. पांडवांच्या मागावर सोडलेले गुप्तहेर जसे एकामागुन एक बेपत्ता होउ लागले तसे तसे तर त्याचे डोके काळजीने पोखरले जाउ लागले. कर्ण, द्रोण भीष्मादि दिग्गजांच्या बळावर त्याने पांडवांशी वैर तर घेतले होते परंतु एक कर्ण वगळता कोण किती एकनिष्ठ आहे याबद्दल त्याला शंकाच होती. भीष्म द्रोण तर ऐनवेळेस पाठिशी उभे राहतिल की नाही याची त्याला काळजी होतीच. पण सत्तेच्या लालसेने दु:शासन देखील विरोधात उभा ठाकणार नाही कशावरुन? पण ही शंका तो झटकन पुसुन टाकत असे. द्रौपदीच्या वस्त्राला हात घालणारा दु:शासन तर होता.

आणि एक वर्तुळ पुर्ण झाले.

सोमवार, 09/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
रूपे जराया भयम। अर्थात रुपाला वार्धक्याचे भय असते आणि देवाने तारुण्यात दिलेले रुप आणि सौष्ठव नाहिसे होते म्हणुन मनुष्यालादेखील वार्धक्याचे भय असते. अँटी एजिंग क्रीम्स च्या जमान्यात आज आपल्याला ते असते तर पुराणकालातील ययातीला ते असल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यात वर तो गेलेला विषयसुखाच्या आहारी. स्त्रीसुखात रममाण झालेला, स्त्रियांच्या बाहुपाशात राजधर्म विसरलेला, देवयानीसारखी करारी स्त्री पत्नी असुनही राजधर्माची उपेक्षा करणारा.

असीर

शुक्रवार, 06/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
असीर करके हमें क्यों रिहा किया सैयाद, वो हमसफीर भी छूटे, वो बाग भी न मिला। -'जलाल' लखनवी एकटेपणाचे दु:ख अफाट असते आणि ते ओझे खांद्यावर घेउन आयुष्यभर वणवण भटकण्याची शिक्षा मृत्युपेक्षाही भयानक. लखनवी च्या शायरीमधला पक्षी म्हणुनच पारध्याला (सैयाद) म्हणतो आहे " बाबा रे कधी काळी मला कैद (असीर) केले होतेस ते होतेस पण आता असे एकट्याला सोडुन का देतो आहेस? जिथुन कैद केले होतेस ती बाग तर आता कोसो दूर आहे आणि ज्यांच्यासाठी जगायचे ते कोणी आसपास उरलेले नाही.

शेतीवाडी आणि फॉरीन लँग्वेज

लेखक आशु जोग
गुरुवार, 05/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या संधी मिळेल तेव्हा संधी मिळेल तिथे भटकंती सुरू असते. कधी या गडावर कधी त्या टेकाडावर कधी कुणाच्या शेतात, आपल्याला काय सब भूमि गोपालकी मागील आठवड्यात एका मित्राचा प्रस्ताव आला त्याच्या खेड्यात जाण्याचा. आम्ही एका पायावर तयार. त्याचे खेडे म्हणजे अतिशय लहान गाव. बहुतेक सगळी शेती. क्वचित कुठे एखादी झोपडी दिसावी. त्याच्या घरी गेलो, राहीलो. नंतर परिसर पहायला बाहेर पडलो. बघावी तिकडे सुंदर शेती. गहू झालाय. हरभरा सुरू आहे. बाकी पुढे पहा

गुढीपाडव्याचे संवत्सर चक्र कसे चालते?

लेखक सागर
शुक्रवार, 23/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार वाचकांनो, आज गुढीपाडवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा, शके १९३४, नंदननाम संवत्सराचा प्रारंभ होतो आहे. गुढीपाडव्याच्या , मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. यानिमित्ताने वाचकांना प्रत्येक शके वर्षाचे नाव कसे ठरवले जाते हे सांगायचा हा अल्पसा प्रयत्न शके १९३४ या वर्षाचे नाव आहे नंदन. तर दरवर्षी शक संवत्सराचे नेमके नाव कसे ठरवले जाते? हे पाहण्यापूर्वी हिंदू पंचांगपद्धतीत कालगणना नेमकी कशी मोजली जाते ते उलट्या क्रमाने पाहूयात, म्हणजे हा ६० नावांचा गुंता सुटायला सोपा पडेल. १ महामाया निमिष म्हणजे १००० शिवनिमिषे मानली जातात.