Skip to main content

इतिहास

"अखेरचे निवेदन" (हुतात्मा भगतसिंग यांचा पंजाब राज्यपालांस 'मृत्यु अर्ज')

शुक्रवार, 23/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक २३ मार्च. हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांचा ८१ वा हौतात्म्यदिन. या महान क्रांतिकारकांना त्यांच्या हौतात्म्यदिनी सादर वंदन. 'तुम्ही केलेल्या हिंसेबद्दल पश्चात्ताप व्यक्त करा, आम्ही तुमच्यासाठी रदबदलीचा प्रयत्न करू' अशा प्रस्थापित नेत्यांच्या देकाराला उत्तर म्हणुन हुतात्मा भगतसिंग यांनी पंजाबच्या राज्यपालांना दिलेल्या 'मृत्यु अर्जाचे' हे मराठी भाषांतर. प्रति, मा.

शाईचा पेन व पेनचे निब

गुरुवार, 22/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
श्री सुधांशू यांचा शाईचा पेन हा लेख वाचला व काही आठवणी जाग्या झाल्या त्या शब्दांकित करीत आहे. ९२-९३ सालातील गोष्ट आहे .नुकतेच मुक्त धोरण सुरू झाले होते.नव नवीन प्रोजेक्ट्स भारतात येत होते आम्ही त्या सुमारास रेव्हेलोन पेन कंपनीचे काम करत असू.दादर ला भवानी शंकर रोड वर तो कारखाना होता/आहे. ति कंपनी बॉल पेन्स तयार करीत असे. बॉल पेन्स चे रिफिल्स च्या ज्या टिप्स असतात.

काहीतरी विधायक करावं !! भाग १

बुधवार, 21/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, प्रस्तावना : १. ही कोणतीही जाहीरात नाही. २. ह्यात कोणताही स्वार्थ नाही. ३. कोणतेही साहित्यमुल्य/सेटल द स्कोर नाही. ४. गैरसमज नकोत. ;) धन्यवाद. खरं तर मराठी आंजावरून तात्पुरता सन्यास घ्यायचं ठरवलं होतं, पण पुन्हा एकदा उफाळून आलंच. वांझोटे धागे, चर्चा, जुलाब लावणार्‍या कविता, मराठी माणूस आहोत हे सिद्ध करणारे चरणखेचक धागे आणि रिकामचोट शतकी प्रतिसाद.. ( अर्थात यात माझाही सहभाग असेलही) पण यातून खरच काय साध्य करतोय असा विचार मनात आला. असो, मूळ मुद्द्यावर येऊया, मी मिपावर आलो ते "राघव - पुर्वीचा मुमुक्षु" या व्यक्तीमुळे.

अशोक-अजातशत्रू कथा आणि काही अवांतर

लेखक चित्रा
मंगळवार, 20/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
वल्ली यांच्या http://www.misalpav.com/node/20767 या भाजे येथील लेण्यांवरील धाग्यात काही प्रतिसादांमध्ये मी अजातशत्रू आणि प्रसेनजितावरून उल्लेख केला होता. तेव्हा असे जाणवले की या गोष्टी बौद्ध लेखनाशी संबंध आला आहे असे काही थोडे लोक वगळता इतरांमध्ये विशेष प्रसृत नसाव्यात. आणि या कथा इतक्या सुरस आहेत की त्या माहिती नसणे बरे नाही असे वाटते! पण त्याहीपेक्षा त्या अभ्यसनीय आहेत ते त्यातून काही तत्कालिन समाजांची माहिती हाती येऊ शकते म्हणून. म्हणून त्या इथे देत आहे.

चवदार तळे सत्याग्रह - ८५ वर्ष पूर्ण..

लेखक कॉमन मॅन
मंगळवार, 20/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
भारतरत्न, घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे केलेल्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला आज ८५ वर्ष पूर्ण होत आहोत. बाबासाहेबांनी त्यावेळेला या तळ्यातले पाणी पिऊन सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, हे दाखवून दिले होते. आज या निमित्ताने आम्ही डॉ बाबासाहेबांच्या चरणी वंदन करत आहोत.. -- कॉमॅ.

सुरस दिल्ली आणि चमत्कारिक आग्रा.

लेखक बॅटमॅन
रविवार, 11/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
तर या डिसेम्बरात दिल्ली-आग्रा भागात गेलो होतो.उत्तर भारतात जाण्याची ही अस्मादिकांची पहिलीच वेळ. काम होते एका दिवसाचे परंतु जरा जिवाची दिल्ली करावी म्हणून ठरवले जरा रजा टाकू आणि इकडे तिकडे चोहीकडे फिरू. मग फिरलो. भोज्ज्याला शिवून परत येण्याइतका वेळ असलेले पर्यटक दिल्ली-आग्र्यात जिथे जिथे म्हणून जातात तिथे तिथे गेलो-बरीच ठिकाणे पहायची राहून सुद्धा गेली पण त्याला नाइलाज होता.म्हणजे वेळेपुढे, थंडीपुढे आणि अस्मादिकांच्या सनातन आळसापुढे. एखादा गेंडा मारून त्याच्या कातड्याचे केलेले असावे असे वाटायला लावणारे एक जाडजूड जॅकेट इथे भीमथडीवरच खरीदून गेलो म्हणून निभाव लागला.

वाट चुकलेली बस - एशियाड

लेखक रामदास
शुक्रवार, 02/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईचा १९७० पासून आजपर्यंतचा प्रवास म्हणजे सामाजीक स्थित्यंतराच्या व्यवस्थापनाच्या फसलेल्या प्रयोगाचे एक नेमके उदाहरण आहे. सार्वजनीक व्यवस्थेवर पडणारा ताणामुळे सत्तरीच्या दशकात या शहराची शिवण उसवायला सुरुवात झाली होती. नव्या बदलाला जनता वेगवेगळ्या मार्गानी सामोरी जात होती. गिरगावातून इतर उपनगराकडे स्थलांतराला वेग आला होता . बॅकबेचा भराव संपत आला होता. नरीमन पॉइंटच्या बहुमजली इमारती उभ्या रहायला सुरुवात झाली होती. एका बाजूस अशी परीस्थिती तर दुसर्‍या बाजूस आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी धारावी भरभराटीला आली होती . १९७१ पर्यंत अनधिकृत झोपड्यांना विजेचा पुरवठा होत नव्हता.