आई, पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला
जग पाहीलं नव्हतं तरी
नऊ महीने श्वास स्वर्गात घेतला
आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या
अस्तित्वाचं इथे नांदणं आहे
संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी
हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे
आई, तुझ्या रागवण्यातही
अनूभवलाय वेगळाच गोडवा
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
फिका पडतो दसरा नि पाडवा
आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां
तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस
सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी
तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची
एकदा जरासं कुठे खरचटलो
आई, किती तू कळवळली होतीस
एक धपाटा घालून पाठीत
जख्मेवर फुंकर घातली होतीस
जख्मं ती पुर्ण बुजली आता
हरवून गेली त्यावरची खपली
तो धपाटा, ती फुंकर, ती माया
ती हरेक आठवण मनात जपली
आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी
आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही
आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील
@सनिल पांगे
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख!
सनिल,
तुझी कविता भिडली!
सायबा, रडवलंस रे!
(हळवा) तात्या.
+१
In reply to सुरेख! by विसोबा खेचर
+१
सहमत.
इथे पोस्ट
इथे ही कविता पोस्ट केली.
आभारी आहे.
आई, तुझ्या रागवण्यातही
अनूभवलाय वेगळाच गोडवा
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
फिका पडतो दसरा नि पाडवा
छान ओळी आहेत.
छान
छान कविता...
......
मैं कभी दिखलाता नहीं, तेरी पर्वाह करता हूं मैं मां,
तुझे सब है पता, है नं मां.....
.....प्रसून जोशी (तारें जमी पर)
आई
अप्रतिम.......