Skip to main content

जाळण्या पूर्वी किंतींदा तुम्हीचं तर जाळलं होतं

लेखक सनिल पांगे यांनी रविवार, 13/01/2008 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
कशाला घरं तू नीटनीटकं सजवलं होतं कुंपणा बाहेरचं जग चिखलानं बरबटलं होतं का पाहतेस स्वप्न सुखी संसाराचे कालचं माझं एकीशी नातं जुळलं होतं का निरुत्तर पत्र धाडतो मी त्या पत्यावर तीने तर केव्हांच घर बदललं होतं का स्वातंत्र्याला मी स्वातंत्र म्हणू इथे इवल्याश्या फुलांना कालचं कुणी खुडलं होतं जरा हळू बोल असं साऱ्याने बजावलं मला बजावताना ते किती मोठ्याने किंचाळलं होतं का जिवापार संभाळ केलास माझ्या हृदयाचा कालचं मी माझं शरीर भंगारात काढलं होतं का माझ्यासाठी जमलात तुम्ही स्मशानात वेड्यांनो जाळण्या पूर्वी किंतींदा तुम्हीचं तर जाळलं होतं @सनिल पांगे
लेखनविषय:

वाचने 2708
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

का माझ्यासाठी जमलात तुम्ही स्मशानात वेड्यांनो जाळण्या पूर्वी किंतींदा तुम्हीचं तर जाळलं होतं वा वा! या ओळी आवडल्या... तात्या.

छान कविता. तुमची "आई" वर एक कविता लिहीली होती ती खूप मस्त आहे. ती इथे क्रुपया द्याल का? कुठे वाचली ती लक्षात नाही.