मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळ कशी बनवतात?

आनंद जोशी · · जनातलं, मनातलं
मिसळ कशी बनवायची? पाककृती कुठे मिळेल? -- आनंद जोशी

वाचने 9368 वाचनखूण प्रतिक्रिया 8

मीनल Sun, 02/24/2008 - 04:14
पोटात कावळे काव काव, नकोस आणू उगीच आव. मिळेल शहरी अन गावोगाव, मस्त चव आणि स्वस्त भाव. पावमिसळ कुणा नाही ठाव ? मिसळ पाव, मिसळ पाव. ||१|| पावाला थोडं बटर लाव. उसळ,दाणे,टमाटर दाव, लिंबाला मधेच घाल घाव, जरासा रस मग त्यात श्राव. शेवेखालचा कांदा खाव, कोथिंबीरीला वर असेल वाव.||२|| तोंडाला पाणी वासाने याव, पहाणा-याला फार सुटेल हाव, खाणा-याची ती पोटात जाव, मोठ्ठे घास ,जरा हळ्ळूच चाव, चवीने खा पण मार ताव, असशील चोर अथवा साव.||३|| नसेल थारा ऐकताच नाव, असो नसो भूक ,घेतील धाव, गरीब रंक अन राजा राव, गरम मिसळ जशी उन्हात छाव, मिसळपावाची असे अशीच माव, मिसळ पाव, मिसळ पाव.||४||