मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही संवाद

ॐकार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आजानुकर्ण यांच्याशी गप्पा मारता मारता असे काही कल्पनारम्य संवाद सुचले. संवाद कल्पनेतले(च) आहेत. काही साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा, न आढळल्यास सुदैव! संवाद १ ( वेळ : एकाची सकाळ, एकाची संध्याकाळ माध्यम : जीटॉक-चॅट स्थळ : नसत्या चौकश्या करू नका. ) १: नमस्कार २: नमस्कार १: नविन काय लिहिले? २: काही नाही. वेळच नाही मिळत हल्ली. १: अच्छा. काल त्या पाककृतीवर तुमचा प्रतिसाद वाचला. २: अं? हो हो. १: पण त्यात तुम्ही कविता छान झाली आहे असं लिहिलयं! २: असं काय? बहुदा झोपेत दिला प्रतिसाद. कवितेलाच द्यायचा होता खरा. १: हेहेहे , प्रतिसाद झोपेतही देता पण लिहायला वेळ नाही! कमालच करता :प २: हेहेहे, बरे बारीक लक्ष ठेवून असता तुम्ही ;), क्वालिटी कंट्रोल मध्ये काम करता काय? १: छे छे. इथे सिलिकॉन व्हॅलीत आहे. म्यानेजर. २: अच्छाच्छा! बरं आहे. हापिसातून मस्त टाईमपास होत असेल तुमचा फावल्या वेळात. इथे कविता टाकायची म्हटलं तरी सायबर कॅफेत यायला लागतं. १: दिवसभरात काही ना काही वाचायला मिळतं , त्यामुळे असतो पडीक :ड २: वाचन! बरी आठवण करून दिलीत. शेजार्‍याकडून पेपर परत घ्यायचाय. ह्या नविन लेखाच्या नादात मी पेपर वाचलाच नाही. १: नवा लेख? कशावर? २: मनोगतावर - मला हे मराठी शब्द नको आहेत अश्या शीर्षकाचा. १: ?? नको आहेत? मग मनोगतावर टाकून काय करणार? २: हवे आहेत म्हणून तरी लोक काय करतात? :प १:खिखिखिखि २:ख्यॅख्यॅ संवाद २ ( वेळ : कोणालाच पत्ता नाही माध्यम : जीटॉक-व्हॉईस स्थळ : ठरते आहे... ) १: नमस्कार २: नमस्कार १: उद्या भेटायचं का? २: नाही. वेळच नाही मिळत हल्ली. १: अच्छा. काल त्या पाककृतीवर तुमचा प्रतिसाद वाचला. २: अं? हो हो. १: पण त्यात तुम्ही कविता छान झाली आहे असं लिहिलयं! २: असं काय? बहुदा प्यालो होतो. कवितेलाच द्यायचा होता खरा. १: हेहेहे , लिहायला/प्यायला वेळ आहे! पण भेटायला नाही? कमालच करता :प २: हेहेहे, बरे मोकळे असता तुम्ही भेटायला ;), इन्फी मध्ये काम करता काय? १: छे छे. टेक्सटाईल मध्ये आहे. २: अच्छाच्छा! मजा आहे. घरून मस्त टाईमपास होत असेल तुमचा फावल्या वेळात. इथे चर्चा टाकायची म्हटलं तर लोक कुत्रं चावल्यासारखे प्रतिसाद देत बसतात. १: मला कुत्रा म्हणालात ? २: छेछे! असंच म्हटलं. बरी आठवण करून दिलीत. मोत्याला इंजेक्शन देऊन आणायचे आहे. ह्या विडंबनाच्या नादात विसरलोच होतो. १: विडंबन? कशावर? २: मनोगत, मिपा. - माझे माहेर अंधेरी! १: ?? लोकांना काही ताळतंत्र? चांगल्या गाण्याची वाट का लावता? २: त्यांनाच विचारा की. तुम्ही नुसते इथे बोलता, एक प्रतिसाद प्रामाणिक द्याल तर शप्पथ! १:खिखिखिखि २:ख्यॅख्यॅ संवाद ३ ( वेळ : ठरते आहे माध्यम : फोन स्थळ : ठरते आहे... ) १: काय रे भा* २: बोल भ** १: उद्या बसायचं का? २: नाही. वेळच नाही रे मिळत हल्ली. १: अच्छा. काल त्या पाककृतीवर तुझा प्रतिसाद वाचला. २: अं? हो हो. १: पण त्यात तू कविता छान झाली आहे असं लिहिलयं! २: असं काय? चुकीचा आयडी वापरला वाटतं. दुसर्‍याच आयडीने एका कवितेला द्यायचा होता खरा. १: हेहेहे , किती आयडी तुझे? कमालच करतोस :प २: हेहेहे, सगळेच वापरतात, तुझे नाहीत काय? १: छे छे. एकच आहे. २: अच्छाच्छा! काही मजा नाही मग. टाईमपास कसा होतो तुझा फावल्या वेळात? इथे लेख लिहायला घेतला की मी पूर्ण करून त्यावर स्वतः दोन तीन आयडींनी प्रतिसाद देऊनच सोडतो. १: साईटवर नाही गेलो, नाही लिहिलं तर काही अडतं थोडच? २: बरी आठवण करून दिलीस. साईटवर जायचं आहे. मजूराने घोळ केला आहे. १: मजूर? नविन युजर? उपक्रमावर की मायबोलीवर? २: अरे कंस्ट्रक्शन साईट! १: ?? मला वाटले वेबसाईट! क्लीअर सांगत जा की राव! २: अजून काय क्लिअर? तुम्ही भलत्याच जगात वावरता बुवा! १:खिखिखिखि २:ख्यॅख्यॅ संवाद ४ ( वेळ : दुपार माध्यम : फोन स्थळ : कुठलातरी कट्टा ) १: नमस्कार २: नमस्कार १: उद्या जेवणाचं नक्की का? २: नाही. आजानुकर्णाने आजचं कळवलं नाही का? आजच आहे. १: आजानुकर्ण? २: अहो वेलणकरांच्या जागेत नव्हतं टाकलं. पण मिसळपावर सांगितलंच होत की. १: कोण वेलणकर? अहो श्रीखंडाचं ठरलं होतं, मिसळपाव नव्हे! २: असं काय? पेठकरांशीच बोला, त्यांचाच बेत आहे. १: हेहेहे , आता काय दहा लोकांना फोन देणार काय तुम्ही? २: हेहेहे, दहा लोकं? इथे ५-६ च आहेत. तात्यांना देऊ? १: कोणालाही द्या,आणि आधी पत्ता द्या. २: अच्छाच्छा! तुम्हाला पत्ता माहीत नाही तर. उपक्रमावरही आहे बातमी , तिथून घ्या. नाहीतर तात्यांशीच बोला, घ्या. १: उपक्रम? कुठला तात्या? काय घेतलीत बितलीत की काय? २: बरी आठवण करून दिलीत. अजून दारू प्यायची आहे. नव्या पोरांनी हट्ट धरला आहे. १: पोरं? हट्टं? अहो लग्नकार्य आहे ना? २: अहो कट्टा आहे हा! १: गोडबोले ना? मी मुलाचा बाप बोलतोय, उद्याच्या लग्नाची व्यवस्था लागली का? २: गोडबोले? छे छे. मी जोशी. काहीतरी गफलत आहे... १:खिखिखिखि, राँग नंबर आहे वाटतं. २:ख्यॅख्यॅ

वाचने 2744 वाचनखूण प्रतिक्रिया 3

केशवसुमार Sun, 04/13/2008 - 16:14
ॐकारशेठ, संवाद एकदम मस्त..ओळखीचे वाटले..;) बाकी 'माझे माहेर अंधेरी' लिड चांगला दिलाय.. बघू काही करता येतं का ते..खि..खि..खि,... केशवसुमार

विसोबा खेचर Sun, 04/13/2008 - 16:28
ॐकारा, तुझ्या कल्पकतेला दाद देतो रे! संवाद बाकी छानच आहेत! २: असं काय? चुकीचा आयडी वापरला वाटतं. दुसर्‍याच आयडीने एका कवितेला द्यायचा होता खरा. १: हेहेहे , किती आयडी तुझे? कमालच करतोस :प हे मस्तच! :) बाकी दुसर्‍या आयडीने कवितेला प्रतिसाद द्यायचं तर सोडाच, काही लोक दुसरा आयडी घेऊन एका संस्थळावरच्या कविता दुसर्‍या संस्थळावर प्रसिद्धदेखील करतात! ;) असो, ॐकारा, तुझे संवाद आवडले रे, मजेशीर आहेत! ;) पुढचेही काही संवाद येऊ देत रे, वाट पाहतो... आणि लवकरच पुण्यात येतो आहे तेव्हा बसूच! खीखीखी!! :) तात्या.

आनंदयात्री Sun, 04/13/2008 - 16:54
>>, न आढळल्यास सुदैव! एवढे कुठले सुदैव तुमचे :) छान लेख, शेवटच्या प्यार्‍याग्राफ नी हहपुवा.