Skip to main content

हे ठिकाण

दिवाळी अंक २०१७ - आवाहन

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 07/09/2017 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो! सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या मिपाचा दिवाळी अंक आपण सादर करणार आहोत. आणि सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या भरघोस प्रतिसादाचं आवाहन आम्ही करत आहोत. गेल्या वर्षीपासून आपण मिपाच्या दिवाळी अंकात एका विशिष्ट विषयाला / साहित्यप्रकाराला वाहिलेला विभाग वेगळा करतो. गेल्या वर्षीच्या 'रहस्यकथा विभागा'ला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यंदाचा 'विशेष विभाग' असणार आहे 'व्यक्तिचित्रे' या विषयाला वाहिलेला! मराठी साहित्यातलं व्यक्तिचित्रांचं दालन इतर भाषांपेक्षा कदाचित जास्त समृद्ध आहे.

महालक्ष्मी

लेखक मंगेश पंचाक्षरी यांनी शुक्रवार, 01/09/2017 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
 मंगेश पंचाक्षरी, नासिक. ( गुरुवार, 31 ऑगस्ट 2017 रोजी महाराष्ट्र टाइम्सच्या पान क्र 4 वर प्रसिद्ध झालेला माझा लेख)      एकेवर्षी मी एका महालक्ष्मी आरास स्पर्धेचा परीक्षक होतो. या निमित्ताने मला अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला. महालक्ष्मी बसवणे हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय उत्सव आहे. त्यास जातीपातीचे बंधन नाही. तरीही ब्राह्मणांमध्ये देशस्थ लोक मूर्ती बसवतात तर चित्पावन खड्याच्या गौरी बसवतात. मूर्तींमध्ये उभ्या, बसलेल्या, हाताच्या, बीनहाताच्या, पायाच्या, बीनपायाच्या अशा अनेक मूर्ती असतात.

एक अ(भू)विस्मरणीय सामना

लेखक १००मित्र यांनी शुक्रवार, 25/08/2017 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
एक थरारक सामना श्री लंका- भारत दरम्यानची दुसरा वन डे सामना जर कुणी पहिला असेल, तर तो नक्की हेच म्हणेल. म्हणजे जवळ-जवळ हातातून गेलेला सामना पुन्हा हातात आणायचा, तोही एक हाती , फारफार तर एक-दोघांनी , असं ह्या सामन्यात २दा पाहायला मिळालं.

भाषण

लेखक मंगेश पंचाक्षरी यांनी सोमवार, 21/08/2017 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
- मंगेश पंचाक्षरी, नासिक. (मुक्तचिंतन) "मला भाषण करण्याची बिलकुल सवय नाहीये " असं बोलून जो माणूस भाषणास सुरुवात करतो त्याच्या इतका धोकादायक दुसरा कोणीच नाही. आधी तो गर्दी बघून जरा घाबरलेला असतो. पण एकदा त्याने भाषण सुरु केले की मग तो थांबायचे नावच घेत नाही. एक एक मुद्दा आठवून आठवून त्याचं रटाळ भाषण चाललेलं असते. हळूहळू लोक बोअर होण्यास सुरुवात होते. लहान मुले जांभया द्यायला लागतात. मोठी माणसं मोबाईलमध्ये डोकं खुपसून टाइमपास करत राहतात. बायका एकमेकींशी हळू आवाजात गप्पा मारायला सुरुवात करतात. अगदी मंचाच्या समोरच बसलेल्या लोकांचा नाईलाज असल्याने ते बराच वेळ तसेच बसून राहतात.

Cool देवी

लेखक मंगेश पंचाक्षरी यांनी रविवार, 20/08/2017 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
मंगेश पंचाक्षरी, नासिक. दै सकाळ मध्ये 6 ऑगस्ट ला प्रसिद्ध झालेला माझा लेख. गुगल, जी पी एस यासारखी साधने वापरून जगात कुठेही काहीही शोधून काढणाऱ्या पुरुषाना त्यांची बायको 'तिखटमीठाचा' डबा आणा हो आतून" असं जेव्हा सांगते तेव्हा मात्र तो नेहमीच कावरा बावरा होतो. तिखटमीठाचा डबा आणि पोळ्यांचा डबा सारखाच दिसत असल्याने तो हमखास चुकीचा डबा आणतो. एकदा अंगाला 'हळद' लागली की पुरुषांना तेल- मसाल्याचे भाव समजायला सुरुवात होते. पण स्वयंपाकघर ही मात्र खास बायकांची मक्तेदारी. तिथे त्यांचं राज्य असतं. अर्थात यास काही अपवाद ही असतीलच म्हणा. पण एकूणच डाळी, पीठ, साखर, पोहे ,रवा यांचे डबे तिला बरोबर सापडत असतात.

मिस कॉल

लेखक मंगेश पंचाक्षरी यांनी रविवार, 20/08/2017 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
©®™ मंगेश पंचाक्षरी, नासिक. ( रविवारी दि 13 ऑगस्ट 2017 रोजी दै सकाळ मध्ये छापून आलेला लेख) आमच्या सौ ला कोणी 'मोबाईल'वर फोन केला तर मुळात आपला फोन वाजतो आहे हेच त्यांना लवकर समजत नाही. कारण त्या रोज मोबाईलची 'रिंग' बदलत रहातात. मोबाईल ही वस्तू रोज 'वॉलपेपर , रिंगर आणि डीपी' बदलणे एवढ्या साठीच असते अशी सौ ची ठाम समजूत आहे. सौ च्या प्रत्येक पर्सला खूप सारे 'कप्पे' असतात. त्यातल्या कोणत्या तरी 'कप्प्यात' सौ मोबाईल ठेवतात. मोबाईल ठेवण्याचा 'कप्पा' कधीही फिक्स नसतो. त्यामुळं मोबाईल ची 'रिंग' वाजायला लागली की सौ पर्स मधून मोबाईल सोडून इतर सर्व सामान बाहेर काढून मोबाईलचा शोध घेऊ लागतात.

रनवे

लेखक मंगेश पंचाक्षरी यांनी शनिवार, 19/08/2017 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
-मंगेश पंचाक्षरी, नासिक. (मुक्तचिंतन) अलीकडेच नाशिक मध्ये खा. शरद पवार यांची एक मनमोकळी मुलाखत विश्वास लॉन्स येथे झाली. दुसऱ्या दिवशी साहेब जळगावला जाणार होते. आम्ही त्यांना निरोप देण्यासाठी ओझर विमानतळावर गेलो होतो. साहेब विमानात बसले आणि थोढ्याच वेळात विमानाने पश्चिम दिशेला टेक-ऑफ घेतला. कोणीतरी पटकन बोलले की अरे साहेबाना तर जळगावला जायचे होते आणि विमान तर मुबईकडे गेले. पायलट विसरले की काय? सर्वांच्याच मनात हा प्रश्न आला होता की विमान मुंबईच्या दिशेने का उडाले असेल? आम्ही याबाबत माहिती घेतली असता असे लक्षात आले की विमान नेहमी हवेच्या विरुद्ध दिशेला उडते.

शेकहँड

लेखक मंगेश पंचाक्षरी यांनी शनिवार, 19/08/2017 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
©मंगेश पंचाक्षरी, नासिक. (कृपया पूर्वपरवानगी शिवाय हा लेख मुद्रित किंवा प्रकाशित करू नये) शेक हँड करणे ही आता एक प्रचलित पद्धत झाली आहे... कोणी ओळखीची व्यक्ती भेटली किंवा कोणाशी औपचारिक ओळख करून दिली की पूर्वी हात जोडून 'नमस्कार', किंवा 'राम राम' असं अभिवादन केले जायचे... पूर्वेकडील देशात खरं तर हात जोडण्याचीच पद्धत आहे... आपण थायलंड मध्ये गेलो तर सुहास्य मुद्रेने ते लोक हात जोडून 'सवाडीका' असे म्हणतात... जपान मध्ये वाकून अभिवादन करतात.. भारत हा उष्ण कटिबंधातील देश आहे... लोकांच्या हाताला स्वाभाविकपणे घाम आलेला असतो... त्यावर धूळ आणि जंतूही असू शकतात..

बायको

लेखक मंगेश पंचाक्षरी यांनी शुक्रवार, 18/08/2017 05:40 या दिवशी प्रकाशित केले.
©मंगेश पंचाक्षरी, नासिक. (पूर्वपरवानगी शिवाय हा लेख मुद्रित किंवा प्रकाशित करू नये) आमचा प्रेमविवाह झाला. आजही आम्ही आमच्या बायकोच्या खूपच 'प्रेमात' आहोत. ती 'पुण्याची' आणि आम्ही 'नाशिकचे'. 'पुण्यापेक्षा मोठं आणि भारी शहर जगाच्या पाठीवर दुसरं कोणतंही नाही ' याबद्दल पुणेकरांना ठाम विश्वास असतो. त्यामुळं आमच्या सौ ना देखील 'पुण्याबद्दल' जबरदस्त प्रेम आहे. मी लग्नापूर्वी तिला भेटायला वारंवार पुण्यात जात असे.