दिवाळी अंक २०१७ - आवाहन
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकरहो!
सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या मिपाचा दिवाळी अंक आपण सादर करणार आहोत. आणि सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या भरघोस प्रतिसादाचं आवाहन आम्ही करत आहोत.
गेल्या वर्षीपासून आपण मिपाच्या दिवाळी अंकात एका विशिष्ट विषयाला / साहित्यप्रकाराला वाहिलेला विभाग वेगळा करतो. गेल्या वर्षीच्या 'रहस्यकथा विभागा'ला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
यंदाचा 'विशेष विभाग' असणार आहे 'व्यक्तिचित्रे' या विषयाला वाहिलेला!
मराठी साहित्यातलं व्यक्तिचित्रांचं दालन इतर भाषांपेक्षा कदाचित जास्त समृद्ध आहे. 'व्यक्ती आणि वल्ली', 'माणदेशी माणसं', 'सारे प्रवासी घडीचे' अशी अनेक व्यक्तिचित्रं आपल्या सर्वांना माहीत आहेतच. तुम्हालाही अशा अनेक सुरस आणि चमत्कारिक व्यक्ती भेटलेल्या असू शकतील. कदाचित तुम्हाला एखाद्या काल्पनिक व्यक्तीचंही शब्दचित्र रेखाटावंसं वाटू शकेल. यंदा मिपाच्या दिवाळी अंकाच्या माध्यमातून तुम्हाला भेटलेल्या (किंवा तुमच्या कल्पनेतल्या) व्यक्तींच्या शब्दचित्रांना प्रसिद्धी आपण देणार आहोत.
अर्थात सगळा अंकच व्यक्तिचित्रांना वाहिलेला नाही. अंक सर्वसमावेशक आहे. अन्य कथा, लेख, पाकृ, कविता, मुलाखती, चित्रं वगैरेंचंही स्वागतच आहे.
...आणि काही नियम/सूचना:
१) तुम्ही पाठवलेलं लेखन तुमची स्वतःची निर्मिती असावी. कशावर आधारित असल्यास तसा स्पष्ट उल्लेख करावा. कोणत्याही प्रकारच्या वाङ्मयचौर्याचा ढका आपल्या मिपाच्या दिवाळी अंकाला लागू नये ही आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे.
२) मिपाचा दिवाळी अंक दर्जेदार साहित्याने भरलेला असावा अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे, आणि त्यासाठी आम्ही दिवाळी अंक टीम आटोकाट प्रयत्नही करणार आहोत. आलेल्या साहित्याला नीट निवडून, टिपून, पारखून मगच दिवाळी अंकात स्थान दिलं जाईल. याचाच अर्थ काही साहित्य नाकारावं लागेल. समजा, तुमचं लेखन नाकारलं गेलं तर कृपया नाराज होऊ नका. आपणांला वाटल्यास ते स्वतंत्रपणे मिपावर नक्की प्रकाशित करा.
३) दिवाळी मंगलमय, आनंदाचा सण आहे हे आपण सगळेच जाणतो. तो सण साजरा करायच्या साहित्यिक मेजवानीत बीभत्सपणाचा आंबटरस असू नये. हा नियम व्यक्तिचित्रांसाठीही आहे. काही मदत/सल्ला/मार्गदर्शन हवं असल्यास साहित्य संपादकांशी संपर्क साधावा.
--x--
दिवाळी १६ ऑक्टोबर २०१७ ला सुरू होते आहे. तुमचं लेखन आल्यावर ते वाचून, मुद्रितशोधन करून, सजवून चकाचक करायला लागणारा वेळही जमेस धरावा लागेल. म्हणून, आपलं लेखन उशिरात उशिरा ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत साहित्य संपादक या आयडीला व्यनीने पाठवा. जर तुमचा मिपावर आयडी नसेल, तर तुम्ही तुमचं लेखन sahityasampadak.mipa@gmail.com या ईमेल पत्त्यावरही पाठवू शकाल.
त्याआधी किंवा त्यानंतर काही मदत लागल्यास आम्ही आहोतच!
- टीम दिवाळी अंक
वाचने
14672
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
आला का धागा? :)
एक आवाहन.
In reply to एक आवाहन. by एस
म्हंजे वो काय ?
दोन प्रश्न आहेत?
In reply to दोन प्रश्न आहेत? by बाजीप्रभू
दोन्हीसाठी: पळेल!
शुभेच्छा!
विषय तर मस्तच आहे.
हे बेस झाले.
जर तुमचा मिपावर आयडी नसेल, तर
In reply to जर तुमचा मिपावर आयडी नसेल, तर by पिलीयन रायडर
Already आहे
In reply to Already आहे by पैसा
हो? कधी लक्षात आले नव्हते
एका व्यक्तीला एकच लेखन देता
In reply to एका व्यक्तीला एकच लेखन देता by ज्योति अळवणी
असं काहीही बंधन नाही.
नमस्कार! लेखन यायला सुरुवात
हे चालेल का
In reply to हे चालेल का by दिनेश५७
नाही, कुठेही - फेसबुकवरही -
दिवाळी अंकासाठी
१ अक्टोबरपर्यंत नक्की कळवु.
काही शब्द मर्यादा आहे का ?
In reply to काही शब्द मर्यादा आहे का ? by वकील साहेब
काही शब्दमर्यादा नाही. दीर्घ
धन्यवाद
मंडळी, दिवाळी अंकाला आलेल्या
कधी येतोय अंक?
कधी?
उद्यापासून.
परत तेच
In reply to परत तेच by विनटूविन
गेले दोन दिवस अंक प्रकाशित