Skip to main content

हे ठिकाण

गोष्ट एका लग्नाची ... भाग - ३

लेखक पियुशा यांनी शुक्रवार, 18/11/2016 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट एका लग्नाची ... भाग २ गोष्ट एका लग्नाची ... लहानपणी बा च्या पाठडावर बसून घोडा घोडा खेळणं येगळं , न प्रत्येक्षात जित्या जागत्या घोड्यावर बसणं येगळं. नाय नाय बॉ आपल्याला काय झेपणार नव्हतं काही झालं तरी मूक जनावर ते इतक्या गोंधळात बिथरल म्हंजी झाला का खेळ ?

गोष्ट एका लग्नाची ...भाग -२

लेखक पियुशा यांनी मंगळवार, 15/11/2016 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट एका लग्नाची ..... गोष्ट एका लग्नाची ... भाग - २ बस्ता न खस्ता... लगीन घर म्हनजी आठवडेबाजार पेक्षा कमी नसतंय ,कोण काय बोलतय काय सांगतय कैच ताळमेळ नसतोय काम करणारे ४-५ न उंटावरून शेळ्या हाकणारे बाकी समदे :) सकाळी सकाळी २ जीभडे दारासमूर येऊन उभे राहिले आज बस्ता मह्यावाला :) रातीपासून बाया- बापड्यांची कलकल ऐकून माझं डोकं ठणाणा वाजत होत."निस्ता पसारा करून ठेवलाय घरभर , बबन्या ,अरे गोधड्यांच्या वळकुट्या कर की पाहत काय बसलाय , न तुमी दोघी जरा कौशीला मदत करा का निस्त्या हिंडताल इथून तिथं न तिथून हिथं!

पाश्शेहजाराच्या गोष्टी: २. नोट

लेखक आतिवास यांनी मंगळवार, 15/11/2016 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्टी तशी थंडी अजून जोरदार पडत नसली तरी नोव्हेबरमध्ये सकाळी सहाची वेळ म्हणजे थंडीची वेळ. नाशिककडं जाणा-या एसटी बसमधले प्रवासी खिडक्या बंद करून बसले होते आणि बरेचसे झोपेत होते. सोमवार सकाळची बस म्हणजे दोन दिवस पुण्यात येऊन परत जाणारे कॉलेजचे विद्यार्थी, काही बँकवाले आणि कंपनीत काम करणारे काही नोकरदार लोक, काही सरकारी कर्मचारी. त्यांच्या बसायच्या जागाही ठरलेल्या. बसचे चालक-वाहक ठरलेले त्यामुळे तसे सगळे चेह-याने एकमेकांना ओळखतात, काही नावानिशीही ओळखतात हे “ते आले बघा पाटील साहेब, चल आता” असं वाहक चालकाला म्हणाला त्यावरून लक्षात आलं.

प्रवास ४

लेखक जॉनी यांनी शुक्रवार, 11/11/2016 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास ३ "ऍट टाइम्स यु मे नीड टू ऑपरेट फ्रॉम बिहाइंड दी एनिमी लाईन्स, अँड वी बिलिव्ह यु विल बी एबल टू डु धिस" काय घडतंय त्यावर आशुतोष चा विश्वास च बसत नव्हता. पत्र हातात पडल्यावर त्याने रात्री ते उघडलं आणि त्याला धक्काच बसला. रॉ मुख्यालयातून आलं होतं पत्र. सीओ सरांच्या स्पेशल रेकमेंडेशन वर त्याला रॉ मधून बोलावणं आलं होतं. आज तो आणि दोन इतर तरुण रॉ मुख्यालयात जॉईंट डायरेक्टर सिंघल समोर उभे होते. दोघांपैकी एक जण सिक्कीम केडर चा आयपीएस अधिकारी, तर दुसरा आयबी मधून आलेला. इतके दिवस आशुतोष फक्त रॉ बद्दल विचार करत असे.

पाश्शेहजाराच्या गोष्टी: १. बचत गट

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 11/11/2016 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
“आज रामा कशापायी आलाय तुझ्यासंगं गटाच्या मीटिंगला? आपलं ठरलंय न्हवं पुरूषमाणसांना नाय येऊ द्यायचं म्हणून?” बचत गटाची अध्यक्ष असलेल्या कांताने जरा जोरातच विचारलं. “राम राम अध्यक्षीणबाई. दादांनी सांगितलं हिकडं यायला म्हणून आलो बगा. आता तुमी नगं म्हणत असालसा तर जातो की लगेच माघारी. आपलं काय काम नाय बा, दादांचं हाये,” रामा बेरकीपणानं म्हणाला. दादा म्हणजे प्रस्थ. केवळ गावातलं नाही तर पंचक्रोशीतलं. गेली अनेक वर्ष खासदार असलेल्या आण्णांच्या रोजच्या बैठकीतले. दादांच्या सल्लामसलतीविना आण्णांचं पान हलत नाही म्हणे.

गोष्ट एका लग्नाची ...

लेखक पियुशा यांनी बुधवार, 09/11/2016 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट एका लग्नाची ... निंबाच्या सावलीत म्हातारबा म्हंजी माझं आजोबा , गावातल १-२ भावकीतील पांढरे टकुरे मी सोत्ता न माझा एक मित्र अशे आम्ही ४-५ जण यष्टीची वाट पाहत थांबलो होतो ,आता का बर? असा प्रश्न पडलंच तुम्हाला. तर म्याच सांगतो पैलेच, तर तर .. आम्ही चाल्लो होतो पोरगी पहायला !!!! माझ्याचसाठी :) त्यात आमच्या गावातल्या यष्टीचा कारभार बेभरवशी, आली तर आली नई तर नई. माझा तर डोळाच नई लागला रातभर जेव्हा आज्यानी सांगितलं , " पम्या उद्या आपल्याला पोरगी पाह्याला जायची बरं का तुह्यासाठी" ऐकून मला आधी भ्यावच वाटलं होत. आजवरचा मह्यावाला इतिहास बघता पोरींचं न माझं काय इशेष जमत नव्हतं.

प्रवास ३

लेखक जॉनी यांनी गुरुवार, 03/11/2016 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास 2 "थापा धीर बोल चू*, पेहली बार आया है क्या? पक्का लोग है?" "हा शाब, 4 तो किलीयर दिख रहे है" "कहासे?" "तेंदूए कि हि राह पर" सर्वजण कमालीचे अलर्ट झाले होते. श्वास रोखले होते सर्वांचे. अगदी बेस वर सीओ सर सुद्धा तणावाखाली होते. खरंतर इतका वेळ एकाच पोजिशन मध्ये बसून सगळ्यांची शरीरं आंबून गेली होती. पण काही इलाज नव्हता. आणि आता तर समोर शत्रू. जरा चुकीची हालचाल जीवघेणी ठरू शकते जे सगळ्यांना माहित होतं. सर्वजण जेव्हा आपला आपला रोल पार पाडतात तेव्हाच अशी मिशन्स यशस्वी होतात आणि हे लक्षात ठेवूनच टीम ची निवड केलेली असते.

प्रवास २

लेखक जॉनी यांनी शनिवार, 29/10/2016 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग: प्रवास १ "हो आई सगळं व्यवस्थित आहे इकडे, मस्त चाललंय" "हो हो जेवण पण चांगलं असतं गं" "तू काळजी नको करू, आय थिंक रजा मिळेल थोड्या दिवसात, मी कळवेन तसं" "बाय" आईने मुलगी बघितली असणार लग्नासाठी आणि म्हणून सुट्टी काढून ये लवकर म्हणून मागे लागली होती. आपल्या साध्या सरळ घराबद्दल आठवून त्याला मजा वाटत होती. आई तर काल परवा पर्यंत म्हणत होती कोणत्याही कंपनीत वगैरे चांगली नोकरी मिळेल, सोड आर्मीचा नाद म्हणून, पण तिने कधी त्याच्या जिद्दीला लगाम सुद्धा घातला नव्हता.

प्रवास

लेखक जॉनी यांनी शुक्रवार, 28/10/2016 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
शरीराने तो बसला होता खडकावर... पण मन कुठेतरी भूतकाळात रमलं होतं... "भें**, कुछ नही होता यार एन सी सी एंट्री से. आना है फौज में तो युपीएससी क्लिअर करो और फिर आओ" टाय ची गाठ सोडत आशुतोष बोलला. हि चौथी वेळ होती अलाहाबाद एस एस बी सेंटर मधून त्याला नाकारलं गेल्याची. "तो भाई कर ना क्लिअर युपीएससी, रोका किसने है?" समदुखी सुमित कुमार वैतागून बोलला. "नहीं हो रही यार...वही तो लफडा है ना" "कोई नै यार..देअर इस ओलवेज ए नेक्स्ट टाईम. चल फिर, मिलते है किस्मत में होगा तो" सर्वसाधारण कुटुंबातून लहानाचा मोठा झालेल्या आशुतोष ने मोठंच स्वप्न पाहिलं होतं तसं. वडील कारकून आणि आई गृहिणी.

चांदण्याला चांदणे समजू नये

लेखक drsunilahirrao यांनी गुरुवार, 27/10/2016 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
एकमेकांना उणे समजू नये (नी स्वतःला शाहणे समजू नये) चांदणे परसामधे पडते म्हणुन आपली तारांगणे समजू नये माणसेही राहती रानीवनी नेहमी बुजगावणे समजू नये हे असे परक्यापरी येऊ नये नी स्वत: ला पाहुणे समजू नये ही कशाची भूल या रातीवरी चांदण्याला चांदणे समजू नये पाहते ती नेहमी माझ्याकडे पण असे की, पाहणे समजू नये डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस