Skip to main content

(पहा वेळ झाली!)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 20/08/2008 02:54 या दिवशी प्रकाशित केले.

डॉ.श्रीकृष्ण राऊत यांची 'कशी वेळ आली?' ही छोटी गजल वाचून आमच्यावर आलेली एक बिकट वेळ अंगावर काटा उभी करुन गेली! :SS :T

पहा 'वेळ' झाली!
'ठमा' क्रूर आली!

पळे भीत 'रिंकू';
लपेटून शाली.

करा बंद गाणी;
कुठे ती पळाली?

बिछान्यात माती
बुटांची मिळाली.

कशी ही विचारे;
सदर्‍यास लाली?

मिळे चोप 'रंग्या';
घरी कोतवाली!

चतुरंग

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1963
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

आता खरा चोप मिळतोय बहुतेक! मागच्या अठवड्यातले विडंबन ते तसे, आताचे हे असे!

रेवती


पहा 'वेळ' झाली!
'ठमा' क्रूर आली!

पळे भीत 'रिंकू';
लपेटून शाली.

रिंकु होणार तर तुमची ;)
'ठमा' क्रूर आली! लैच भारी .. देव वाचवो तुम्हाला !

(अवांतरः मिपाकट्ट्याला प्राजु, शितल वैगेरेंची तुमच्या खटल्याशी ओळख झालीच असेल. फोन करुन खुशाली घ्यायला लावावी म्हणतोय.)