मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(टाळतो)

चतुरंग · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
केदार पाटणकर ह्यांचे 'टाळणे' बघून आम्हाला आमची वारंवार चालणारी टाळाटाळी आठवली! ;) रोजचा छळवाद आता टाळतो मी जरा व्यायाम आता टाळतो पाहिजे आहे तनाला शांतता कोणतीही चाल आता टाळतो गोड 'केका'ची खुमारी आगळी वरण-भाता हळुच आता टाळतो सोडले पळणे, तरण केव्हाच मी 'जीम'चीही वाट आता टाळतो घेर ढेरीचा कितीही वाढला घोरण्याचे मी न आता टाळतो! चतुरंग

वाचने 2958 वाचनखूण प्रतिक्रिया 8

प्राजु Wed, 09/17/2008 - 00:19
अहो चतुरंग, तुमचे संपादकीय लिहून महिनाही नाही झाला हो... !!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by स्वाती दिनेश

चतुरंग Wed, 09/17/2008 - 00:33
(खुद के साथ बातां : रंग्या, असलं संपादकीय देताना निदान डिसक्लेमर तरी द्यायचा नाही का? की "लेखात व्यक्त केलेले विचार हे फक्त विचारच असून ह्यांच्या अंमलबजावणीचा संपादकांचा मानस असेलच असे नाही!" आता साईडने फोटो न काढताही चेहरा (की पोट?) लपवायची पाळी आली तुझ्यावर.) चतुरंग

In reply to by प्राजु

राघव Fri, 09/19/2008 - 15:04
हा हा हा... प्राजुताईंनी एकदम जबरा प्वाईंट मांडलाय!! :D बाकी मूळ गझल अन् तुम्ही केलेले विडंबन, दोन्ही छान. मुमुक्षु

In reply to by प्राजु

भडकमकर मास्तर Fri, 09/19/2008 - 16:26
कविता मस्त... एकूणच आहार व्यायाम पोटाचा घेर हे विषय सतावण्याचं वय कोणतं बुवा? :? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर Sat, 09/20/2008 - 09:12
घेर ढेरीचा कितीही वाढला घोरण्याचे मी न आता टाळतो! हे बाकी मस्त रे रंगा...! :) आपला, (ढेरपोट्या) तात्या.