Skip to main content

धर्म

वटपोर्णिमेच्या शुभेच्छा

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 25/06/2010 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
(चित्र जालावरुन साभार.) वटपोर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. मला अतिशय आवडणारा समयोचित श्लोक "सौन्दर्य लहरी" मधून - विरिंचि: पंचत्वं व्रजति हरिरप्नोति विरतिं विनाशं कीनाशो भजति धनदो याति निधनम| वितन्द्री माहेन्द्रीविततिरपि अंमीलीत्-दृशा महासंहारेSस्मिन विहरति सति त्वत्पति-रसौ||२६|| महा संहाराच्या समयी विरंची (ब्रम्हा) हा पंचतत्वामधे विलीन होतो. किनासा(यम, प्रत्यक्ष मृत्यूचा देव) मृत्यू पावतो.कुबेर, धनाच्या देवतेचा अंत होतो.

पाद्रीबुवांची मराठी शिकवणी

लेखक अरुंधती यांनी रविवार, 06/06/2010 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही कधी कोणाला आपली मातृभाषा गोर्‍या साहेबाच्या भाषेतून शिकवायची कसरत केली आहे? आणि त्यातून तुमचा आधीचा अनुभव अगदीच माफक असताना व तुमचा विद्यार्थी कोणी ऐरागैरा नाही तर तो एक ख्रिश्चन मिशनरी पाद्री आहे हे माहीत असताना? मला हा अनोखा अनुभव घेण्याची मजेशीर संधी काही वर्षांपूर्वी मिळाली आणि त्या छानशा अनुभवातून एक सुंदर स्मृतिचित्र तयार होताना मलादेखील काही शिकायला मिळालं. कॉलेजच्या सोनेरी दिवसांमधील गोष्ट. भटकंती, सहली, सिनेमा, हॉटेलिंग, वाढदिवस इत्यादींसाठी कायमच घरून हातखर्चाला दिलेले पैसे कमी पडायचे. अवाजवी पैशांची मागणी केली की घरून सांगितले जायचे, "आपापले पैसे कमावा आणि खर्च करा"!

दिले नादान तुझे हुआ क्या है.......

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 29/05/2010 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
दिले नादान तुझे हुआ क्या है.... ही ग़ालीबची गज़ल माहीत नसणारा माणूस भारतात मिळणे कठीण. याचा अर्थ खरच समजवून घ्यायचा असेल तर आपल्याला सुफी संप्रदायाबद्दल थोडीशी माहीती करुन घ्यायला लागेल. आपण ही माहीती या सारख्या गज़लेच्या आणि गालीब सारख्या कवींच्या बाबतीतच फक्त करुन घेऊ. सुफी संप्रदायावर मी लवकरच www.jayantpune.wordpress.com वर लिहीणार आहे त्यात आपल्याला अधिक माहीती मिळेळ. सुफी संप्रदायाच्या मते आपल्या अध्यात्माच्या प्रवासात आपल्याला सात टप्पे ओलांडावे लागतात. या प्रवासाला ते “मार्ग” म्हणतात आणि जो हे करायचा प्रयत्न करतो त्याला सालिक म्हणतात.

माझ्या मनातले राऊळ

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 20/05/2010 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
(विचारतरंग जसे उमटलेत तसे मांडलेत. कदाचित विस्कळित वाटतील. पण त्यांच्यातील सच्चाई समजून घ्यावी! ) देऊळ म्हटलं की आपल्या किती ठराविक संकल्पना असतात, नाही? जे जे उदात्त, उत्तम असते त्याचेच मूर्त स्वरूप म्हणजे मंदिर - देऊळ. पंचमहाभूतांना मानवी संकल्पनेत बंदिस्त करून त्या द्वारे संपन्न अनुभव व आत्मिक समाधान प्राप्त करण्याचे स्थान मानले जाते देऊळ. पण कितीतरी वेळा आपण अशा अनुभवाला काही छोट्यामोठ्या कारणांनी पारखे होतो. कधी ते कारण गर्दी असते, तर कधी त्या ठिकाणची अस्वच्छता. कधी भक्तीचा बाजार आपल्याला उबग आणतो तर कधी लोकांच्या अंधश्रद्धा! आणि मग ज्या कारणासाठी देवळात गेलो ते कारणच बाजूला पडते.

मलंग आणि माणुसकी

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 15/05/2010 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
काही वेळा आयुष्यात फार गमतीशीर प्रसंग घडतात. पण त्या त्या वेळेस तुम्ही त्या प्रसंगातील अनोखेपण अनुभवू शकालच ह्याची काहीच हमी नसते. आपले आधीचे पूर्वग्रह किंवा समज बदलून टाकायला एखादी घटनाच पुरेशी असते. असाच एक प्रसंग बऱ्याच वर्षांपूर्वी आमच्या कुटुंबाने अनुभवला. त्याचीच ही कहाणी. माझे आई-वडील फार ''देव-देव'' करणाऱ्यातले नाहीत. जगात ईश्वर आहे, तो सगळीकडे आहे आणि त्याला आपण मानतो अशी त्यांची विचारसरणी. त्यात कोणत्याही प्रथा परंपरांचे अवडंबर नाही. स्वधर्माचा अभिमान आहे पण इतर धर्मांविषयीही यथायोग्य आत्मीयता.

एक प्रसंग - पुण्य लादण्याचा

लेखक दत्ता काळे यांनी बुधवार, 12/05/2010 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो .. उठा .. लवकर उठा" - बायको मला झोपेतून उठवण्यासाठी गदगदा हालवून जागं करत होती. तिच्या आवाजाचा सूर आग लागली आहे किंवा भूकंप झाला आहे अश्या सूचनेसारखा वाटत होता. मी दचकून उठत विचारलं " काय गं ? " "अहो, बाहेर तर या ..गॅलरीत". मी डोळे चोळंत, चष्मा घालून गॅलरीत आलो. " ते पहा अंगणात" ती म्हणाली. अंगणात विशेष असं काहीही दिसलं नाही . फक्त एक कावळा एका बारक्या सरड्याला चोचीत धरून जमीनीवर आपटंत होता. तो सरडा जरा चोचीतून सुटला कि कुंपणाच्या दिशेने धावायचा प्रयत्न करायचा आणि हा त्याला परत धरून उचलून आपटायचा. इथे कुठे काय आहे ? कावळाच तर दिसतोय .. मी " कावळा ? ... अहो चष्मा घातलाय नां ?

"संधी दृष्टीकोन बदलण्याची....!!"

लेखक डावखुरा यांनी शनिवार, 08/05/2010 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
"लोकांची सत्ता येईल तेव्हाच लोकशाही मजबुत होईल. लोकांच्या हितासाठी कायदे येतील तेव्हाच लोकसत्ता येईल." कायदा कितीही उपयुक्त बनला तरीही तो अंमलात आणण्याची राजकीय ईच्छा शक्तीही तितकीच महत्त्वपुर्ण आहे. पण या नोकरशाही-भ्रष्टाचारयुक्त समजात योजनांचा लाभ गरजुंपर्यत पोहोचवणे ही स्वप्नवत भासणारी गोष्ट केवळ अशक्यप्राय आहे.

बंडखोर स्त्रीमुक्तीवादी संत कवयित्री - अक्कामहादेवी

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 10/04/2010 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
अक्कामहादेवी! एक बंडखोर स्त्रीमुक्तीवादी संत कवयित्री! बाराव्या शतकातील एक अत्युच्च भक्तीच्या मार्गाचा प्रसार करणारी, आगळी वेगळी स्त्री! कन्नड संत साहित्यात तिने आपल्या भक्ती वचनांची जी अनमोल भर घातली आहे त्यासाठी ती कायम स्मरणात राहील. शिवाय ज्या अनोख्या पद्धतीचे आयुष्य ती त्या काळात जगली ते पाहता तिच्या धैर्याची, निश्चयाची, भक्तीची व अलौकिकतेची दादच द्यावी लागेल! तिला बसवण्णा,चेन्न बसवण्णा, किन्नरी बोम्मय्या, अल्लमा प्रभू, सिद्धराम ह्यांसारख्या इतर लिंगायत/ वीरशैव संतांनी ''अक्का'' म्हणजे मोठी बहीण ही उपाधी देऊ केली ते तिच्या सन्मानाचेच प्रतीक आहे.

चित्रगुप्ताची कैफ़ियत : दस्तुरखुद्दांचि अजब, अनोखी, दिलकश दास्तान

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 25/03/2010 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेख संपादित करून जितके शक्य होईल तितके शुद्धलेखन सुधारले आहे. -शुद्धलेखनाचा आग्रह असणारा मिपा संपादक. चित्रगुप्ताची कैफ़ियत दस्तुरखुद्दांचि अजब, अनोखी, दिलकश दास्तान : भाग १. नमस्कार मंडळी, मी चित्रगुप्त......

मला मेघदुताचा पुढील दुवा हवा आहे.....विदग्ध वरील .

लेखक डावखुरा यांनी शनिवार, 20/03/2010 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
http://vidagdha.wordpress.com/meghadoot_purna/ प्रस्तुत दुव्यावर मेघदुत आहे मराठी रसग्रहणासहित पण क्रमशः आहे .... तरि यापुढिल दुवा अथवा सम्पुर्ण मेघदुतचे मराठी रसग्रहण कोणाकडे उपलब्ध असल्यास देण्याचे करावे ....... धन्यवाद!!