Skip to main content

धर्म

आले गणराज आले हो...

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 11/09/2010 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
ढोल- ताशे वाजु लागले आणि फोटो काढत असताना देखील माझे पाय ताल धरु लागले... गाडीत विराजमान होउन आलेले बाप्पा...

हिंदुत्व आणि भारतीयत्व

लेखक शहराजाद यांनी गुरुवार, 09/09/2010 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
समरमध्ये इथे, म्हणजे अमेरिकेत, फार्मर्स मार्केट नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे जागोजागी आठवड्याचा बाजार भरतो. आम्ही सबर्बमध्ये राहतो, खरेदी सुपरमार्केटमध्ये करतो. त्याऐवजी एखाद्या शनिवारी किंवा रविवारी सकाळी शहरांमध्ये जागोजागी आसपासच्या शेतांतून येणारा ताजा भाजीपाला व फळं विकण्यासाठी शेतकरी व मळेवाले येतात. खरेदीसाठी भारतीय व चिनी लोक तसेच ऑर्गॅनिक व फ्रेश खाण्याची हौस असलेले अनेक अमेरिकन तिथे येतात. या बाजारातून नुसता फेरफटका मारणे हादेखील अतिशय उल्हसित करणारा अनुभव असतो. परवाच आमच्या इथल्या भाजीबाजारात एका अनोळखी अमेरिकन बाईशी माझे बोलणे झाले.

गैरब्राह्मणी ब्राह्मण

लेखक सारंग कुलकर्णी यांनी शुक्रवार, 03/09/2010 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
गेले कित्येक दिवस, मराठा आरक्षणाचा मुद्दा बराच गाजत आहे. कोणी त्याला विरोध करतो तर कोणी पूर्ण ताकतीनिशी पाठींबा व्यक्त करत आहे. समित्या नेमल्या जात आहेत, न्यायालयात खटले दाखल केले जात आहेत. आठवड्यातून एकदा तरी या संदर्भात बातमी वाचायला मिळतेच. मुळातच आरक्षण या विषयाचा फिरून एकदा विचार केला पाहिजे. लहानपणी मराठीच्या पुस्तकात “महापुरुषांचा पराभव” म्हणून धडा होता.

माझा दोस्त युजिनी

लेखक यशवंतकुलकर्णी यांनी गुरुवार, 02/09/2010 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
यूजिनी आणि माझी सर्वात पहिली भेट कुठं झाली हे मला आता आठवत नाही. ते तेवढं महत्वाचंही नाही. पण ह्या माणसात काहीतरी वेगळं, काहीतरी ठोस, काहीतरी चमकणारं आहे - ते आमच्या मित्रांच्या ग्रुपलाच काय पण त्याला एकदाच रस्त्यावरुन चालता-चालता ओझरतं पाहाणार्‍यालाही जाणवून जातं. ते काय आहे ते मात्र अजून कुणाला नक्की सांगता आलेलं नाहीय. म्हटला तर तो तसा हॅंडसम कॅटॅगिरीत मोडतो. पण त्याच्यापेक्षाही दिसायला गोरेगोमटे, जिम-फिम मारल्यानं चारचौघात उठून दिसणारे, महिन्यातून तीन-तीन,चार-चार नव्या पोरींना पाठीवर घेऊन गाड्या उडवणारे बहाद्दर आमच्या ग्रुपमध्ये आहेत.

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत: कर्म चक्र सिद्धांतानुसार पंच महा पतीव्रतांचे धर्म सूक्ष्म विवरण. डॉक्टर संजय होनकलसे : drsanjayhonkalse@gmail.com

लेखक dr sanjay honkalse यांनी सोमवार, 30/08/2010 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत: कर्म चक्र सिद्धांतानुसार पंच महा पतीव्रतांचे धर्म सूक्ष्म विवरण. डॉक्टर संजय होनकलसे : drsanjayhonkalse@gmail.com http://drsanjayhonkalse.tripod.com श्रीपाद चरित्र अनेक अर्थाने अद्भूत आहे, विलक्षण आहे. एकतर ते तेराव्या शतकात श्रीपादांच्या अनेक चमत्कारपूर्ण जीवन प्रवाहाबरोबरच लिहिले जात होते.

शितावरून भाताची परीक्षा होऊ शकते, एक-दोन माणसावरून भगव्याची लायकी निघते. हिंदू लोक काय भात आहेत काय ?

लेखक गांधीवादी यांनी शुक्रवार, 27/08/2010 07:40 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सगळ्यांचे लाडके लुंगी पुचाट केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी 'भगवा दहशतवाद' असे संबोधून जो हिंदूंचा अपमान केला आहे तो हिंदू कधीच विसरणार नाही, आम्ही एक शब्द देखील तोंडातून काढला तर आमच्यावर आगपाखड होते काही पांढरपेशा लोकांची ह्य संकेत स्थळावर, पण हे लुंगी पुचाट वाट्टेल ते बडबडतात ते मात्र सगळे मुग गिळून गप्पा बसतात, अरे पण काहून सुद्धा थुंकायची लायकी नाही असल्या लोकांची. हिंदूंची सहनशीलता हि आता हळूहळू भेकडपना बनू पाहत आहे , काही पेटी मतांसाठी हे लोक समग्र हिंदू लोकांना दुखवू पाहतात, पण ह्यांना कोण अक्कल शिकवणार ?

एक मत

लेखक शिल्पा ब यांनी बुधवार, 18/08/2010 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मिपावर बऱ्याच चर्चा चालू आहेत...सैपाक, मुलीनी दारू पिणे, सरकारने किती करोड खर्च करावे, मोठाल्या दुकानातून समान आणणे, मुसलमान धर्मातील अतिरेकी मते आणि काय काय... एक अस्सल मराठी माणूस म्हणून आम्हीही या सगळ्यात हिरीरीने भाग घेत आहोत, घेत राहू....बरेच धागे अप्रकाशित झाले, काही वाचनमात्र झाले. आम्हाला उगाचच एक प्रश्न पडला कि अशा चर्चांना काही धरबंध असावा कि नाही? म्हणजे काय प्रमाण असावे? महिन्यातून किती वेळा अशा चर्चा व्हाव्यात? आणि याविषयी आम्ही एखादा कौल काढावा काय? आपल्यासारख्या थोरामोठ्यांकडून या समस्यांवर काही प्रकाश पडेल अशी आशा आहे.

सोमवारची कहाणी

लेखक जागु यांनी सोमवार, 16/08/2010 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
कहाणी सोमवारची आटपाट नगर होते. तिथे एक ब्राम्हण राहात होता. त्याचा एक शिष्य होता. रोज तळ्यावर जाई, स्नान करी, रोज शंकराची पूजा करी, वाटेत वेळूचे बेट होते. तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ? मी येऊ? असा ध्वनी उठे. हा मागे पाही, तो तिथे कोणी नाही, त्या भितीने तो वाळू लागला. तेंव्हा गुरुजींनी विचारले, "खायला-प्यायला वाण नाही, बाबा असा रोड का ? "खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेष्टा नाही, स्नान करुन येते वेळेस मला कोणी तरी 'मी येऊ? मी येऊ? असं म्हणतं, मागे पाहतो तो कोणी नाही, याची मला भीती वाटते. गुरुजी म्हणाले, "भिऊ नको, माग काही पाहू नको ! खुशाल त्याला ये म्हण!

मातामाहात्म्य

लेखक आप्पा यांनी सोमवार, 09/08/2010 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
मातामाहात्म्य नमस्कार मंडळी, सध्या पद्मपुराण वाचत असता हा एक छान श्लोक वाचला, आपणास ही आवडेल. नास्ति मातॄसमो नाथो नास्ति मातॄसमा गति: | नास्ति मातॄसम: स्नेहो नास्ति मातॄसमं सुखम् || नास्ति मातॄसमो देव इहलोके परत्र च | एनं वै परमं धर्म प्रजापतिविर्मितम् || ये तिष्ठन्ति सदा पुत्रास्ते यान्ति परमां गतिम् || अर्थात मातेसारखा रक्षक, मातेसमान आश्रय, मातेसारखा स्नेह, मातेसारखे सुख, मातेसमान देवता या लोकात वा परलोकात तरी मिळेल का? ब्रम्हदेवाने या धर्माची स्थापना केलेली आहे. जो पुत्र याचे पालन करतो तो उत्तम गतीस पोचतो.