Skip to main content

धर्म

वास्तुशांती व गणेशपूजन : सर्वांना आग्रहाचे आमंत्रण

लेखक नरेश_ यांनी सोमवार, 15/03/2010 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
// श्रीगणेशाय नम: // सप्रेम नमस्कार वि. वि. आमचे येथे श्रीकृपेकरुन, पनवेल येथील नुतन वास्तुचा गृहप्रवेश व गणेशपूजन विधी, बुधवार दि. २४/३/१० रोजी (रामनवमी )सकाळी ११ वाजल्यापासून पुढे आयोजित केला आहे, तरी आपण सहकुटूंब, सहपरिवार मित्रवर्यांसह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, व स्नेहभोजनाला उपस्थित राहून आम्हांस उपकृत करावे ही आग्रहाची विनंती. स्नेहभोजनाची वेळ : दु.१ ते ३ ठिकाण : ए-१६, साई-पार्क बिल्डिंग्,४था मजला ,छत्रपती संभाजी मैदानामागे, पनवेल नगरपालिका कार्यालयाजवळ, पनवेल जि.

लोहगडची सफर

लेखक झकासराव यांनी मंगळवार, 10/11/2009 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
लोहगडला जाउ जाउ अस करत करत बरेच रविवार नुसतेच येत आणि जात होते. प्रत्येक वेळी प्रत्येकाची वेगळी कारण. होय नाही करत शेवटी मी आणि राजा दोघच जायच फिक्स केल. तर आता नमनालाच जास्त तेल न घालता घ्या फोटू. हा जाताना पायवाटेवरुन काढलेला फोटु. हा जाताना दिसणारा विसापुर. अवाढव्य आहे हा किल्ला. हा दिसतोय लोहगड. हा त्याचा डावीकडचा भाग. बुलंद किल्ला आहे एकदम.

गार्गी अजून जिवंत आहे...

लेखक ऋषिकेश यांनी रविवार, 25/10/2009 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक मंगला आठलेकर यांचं "गार्गी अजून जिवंत आहे" हे पुस्तक हातात पडलं. जन्मतारीख वगैरे नसणार्‍या काळात साधारण १९१४-१५ च्या सुमारास उत्तरप्रदेशात इलाहाबादला जन्मलेल्या गुलाबबाईची ही कहाणी. सातव्या वर्षी लग्न होऊन दहाव्या वर्षी मुलाला जन्म दिलेल्या ह्या गुलाबबाईने इतक्या जुन्या काळात इलाहाबाद-प्रयागसारख्या कट्टर धार्मिक परंपरा असलेल्या शहरात अंत्यसंस्काराच्या कामाला वयाच्या अकराव्या वर्षी सुरवात करून तिने "स्त्रियांनी स्मशानपौरोहित्य का करू नये?" असा प्रश्न तत्कालीन धर्ममार्तंडांना केला होता. ह्या स्त्रीबाबत लेखिका एक दोन पानी लेख वाचते आणि त्या स्त्रीला भेटायचंच या विचाराने तिचा शोध घेते.

... देवाचं घर !

लेखक दशानन यांनी शनिवार, 24/10/2009 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
माझा व देवाचा संबध तसा लहानपणापासून. माझी आई सांगते की मी लहान असताना देवघरातील गणपतीची छोटीशी सोन्याची मूर्तीच मला खेळायला हवी असे. उठता बसता माझ्याजवळ तीच मूर्ती. कोल्हापुरातील नागराज गल्लीमधला पीरबाबा असो की गावच्या दर्ग्याचा उरुस असो. मी तेथे हजर असे. कोल्हापुरातलं महालक्ष्मीचं मंदिर म्हणजे तर कोल्हापुरचं हृदय. माझं जवळजवळ सर्व लहानपण मंदिराच्या आजुबाजूलाच गेलं...बालवाडीपण मंदिराजवळच, पहिली ते सहावीपर्यंतची शाळापण जवळच. मंडळाचा गणपती असो किंवा पंचगंगेचा दीपोत्सव त्यांचा त्यांचा आनंद वेगळा होता. पण सगळंच त्या मंदिरापाशी एकवटलेलं होतं.

शंकराचार्यांच्या कंपूतील लोकांचा पर्दाफाश आणि त्याला तात्याचे समर्थन! सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा! :)

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 18/10/2009 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
आजकी ताजा खबर, आजकी ताजा खबर! शंकराचार्यांच्या कंपूतील लोकांचा पर्दाफाश! :) आणि त्याला हे आमचं समर्थन -
"ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" ही विचारसरणी प्रमुख असली तरी सर्वमान्य किंवा बहुतांशी तत्त्वज्ञानी लोकांना मान्य होती अशी वस्तुस्थिती नाही.
अगदी खरं आहे.. आपल्याला तर साला पयल्यापासनंच या शंकराचार्यांचं म्हणणं पटत नाय! हां, आता आपण सर्वमान्य नाय परंतु एक सागतो.

दीपावली शुभेच्छा

लेखक संजीव नाईक यांनी गुरुवार, 15/10/2009 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वरिल सर्व सभासदाना हितचिंतकांना, मित्रमंडळींना, वाचकांना ही दीपावली आत्यंतिक सुखसमाधानाची ठरो आणि त्यांच्या जीवनात सुख, समाधान, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य ही दीपावली निर्माण करो, अशी श्री स्वामीचरणी प्रार्थना... संजीव नाईक http://vastuclass.blogspot.com

राम-कृष्ण तौलनिक मुक्तचिंतन आणि रामाचं अवतारकार्य

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी बुधवार, 07/10/2009 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीविष्णूंच्या दशावतारांपैकी राम आणि कृष्ण हे दोन अवतार सर्वाधिक लोकप्रिय आहेत. महाभारतात अर्जुनाला गीतेचा उपदेश करताना "यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति" असं श्रीकृष्णाने म्हटलं आहे. अर्थात धर्मसंस्थापना आणि दुष्कृतींचा नाश ही या अवतारांमागील दोन मुख्य उद्दिष्टे आहेत. रामाआधी विष्णूचा "परशुराम" हा अवतार होता. परशुराम चिरंजीव आहे असं मानलंय. मग विष्णूला रामाचा अवतार घेण्याची गरज का पडली असावी? असा प्रश्न स्वाभाविकपणे पडतो. या अवतारांमागील ढोबळ उद्दिष्ट जरी एक असलं, तरी त्यात परिस्थितीजन्य फरक होते.

बदल

लेखक प्रभो यांनी रविवार, 27/09/2009 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
कालच घरी आलो दसर्‍यासाठी.