Skip to main content

धर्म

हर देशीही तू, हर वेशीही तू

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 31/07/2012 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
हर देशीही तू, हर वेशीही तू रूपात हरेक, असशी परी तू तुझी रंगभूमी, ही सृष्टी जरी खेळांतही तू, मेळांतही तू सागरी उठशी, मेघांतूनी तू पर्जन्य होशी, जल होऊन तू मग निर्झर, ओढा, नदी होशी प्रकार अनेक, जलाशय तू घडला मातीतुनी, अणुरेणू रूप जीवसृष्टीचे, शाश्वत तू पर्वत कधी, विशाल तरूही तू कौतूक तुझे, सत्‌ एकची तू दाविशी दिव्य, जरी हे तू गुरूदेव दयाघन, प्रसन्न तू तुकड्या सांगे, परका न कुणी एकच सगळे जण, मी आणि तू
काव्यरस

भक्तीची शक्ती?

लेखक चिगो यांनी मंगळवार, 24/07/2012 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
परवाचा दिवसच साला सुरु झाला तोच बेक्कारपणे.. ऑफीसला जायला निघणार तेवढ्यात फोन आला, " सर, इथून जवळच एक अपघात झालाय. एक बस पलटलीय.." म्हटलं, बोंबला ! आधी किती जखमी, मृत असतील ह्याची भिती. त्यातून मृत असतील तर बॉडीज हलवायला लागतात पटकन, नाहीतर जनक्षोभ, लॉ & ऑर्डर प्रॉब्लम नी काय काय.. मनात हे टेंशन असतांनाच हॉस्पिटलला फोन लावला, उपचारादींची तयारी करुन ठेवा म्हणून. ह्या धाकधूकीत स्पॉटवर पोचलो. बस घसरुन उलटली होती तो गड्डा जेमेतेम ६-७ फुटांचा असल्याने, सुदैवाने जिवीतहानी झालेली नव्हती. तोपर्यंत लोकांनीही जखमींना इस्पितळात हलवलेले होते.

काल

लेखक संजय क्षीरसागर यांनी सोमवार, 16/07/2012 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
सजगता किंवा अवेअरनेस म्हणजे वास्तव आणि कल्पना यात तारतम्य करण्याची आपली क्षमता (The ability to differentiate between a fact & fiction). आपला अवेअरनेस जितका जास्त तितका जीवनात तणाव कमी, तितकं जगणं सोपं. अस्तित्वात `काल' असं काही नाही, ज्याला आपण वेळ म्हणतो तो निव्वळ `भास' आहे. आपण जर (कल्पनेनं) पृथ्वीच्या सरळ वर आकाशात गेलो आणि पृथ्वी आपल्याला खाली दिसायला लागली तर सूर्य सतत प्रकाशमान आहे आणि पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्यामुळे दिवस आणि रात्र होते हे लक्षात येइल. आपल्या सर्वांना हे माहिती देखील आहे पण तो बोध आपण आचरणात आणत नाही.

राणी ताराबाई

लेखक sneharani यांनी शनिवार, 09/06/2012 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचा गौरवशाली "शिवइतिहास" घडला तो सह्याद्रीच्या साक्षीने!सह्याद्रीचे कणखर कडे, गड, किल्ले, बुरुज आज ही इतक्या दीर्घ कालाने शिवइतिहासाची साक्ष देतात. स्वातंत्र्य हा मानवाचा मुलभूत हक्क आहे याची जाणीव झाल्यावर त्या थोर पुरुषाने स्वराज्य स्थापनेचा विडा उचलला अन् मावळ्यांच्या सहाय्याने स्वराज्य स्थापनेचा इतिहास ही घडविला. हा इतिहास नुसताच घडत नाही गेला तर तो इतक्या विविध पैलूंनी समृध्द होत गेला की आजमितीस एखादी घटना अभ्यासताना मानवी मन थक्क झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित!

तुकोबा जितोबा तुकाराम... ढिंच्याक ढिच्यांग!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 08/06/2012 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
येणार येणार म्हणुन ज्याची वाट पहात होतो,तो अमच्या जित्याचा,,, होय जित्या म्हणजे जितेंद्र जोशी यानी साकारलेला त्याच्या इतकाच सहज सुंदर चित्रपट ''तुकाराम''... काय वर्णू ज्याच्या लीला अगाध,अंतरीची कळा तोच असे। सहजभावी सामर्थ्य,हेची मूळ रूप,तया अंतरी अन्य,काही नसे॥ या दोन ओळी आमच्या जित्याला मनापासून समर्पीत करुन हा एक जिवंत/मनस्वी/स्फूर्तीदायक चित्रानुभव लिहायला घेतो...

तुम इक गोरख धंदा हो

लेखक यकु यांनी गुरुवार, 07/06/2012 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
नवरत्न नाथांनी दीक्षा दिलेल्या क्षणापासून त्यांचा देह सोडून झाल्यानंतर, दरम्यानच्या काळात केलेल्या जगावेगळ्या सर्जरीचं सार नुस़रत फतेह अली खान यांनी गायलेल्या या कव्वालीतून पोहोचलं, पोहोचवलं गेलं. नवरत्न नाथ या साध्याभोळ्या, छक्केपंजे समजू न शकणार्‍या, नव्हे तसल्या गोष्‍टींची गरजच नसलेल्या माणसाने, नव्हे नवरत्न नाथ नावाच्या गुपचूप नजरेआड झालेल्या जादुगाराने ही जादू करुन दाखवलीय. जटील संकल्पना, लंब्याचौड्या बाता वगैरे गोष्‍टी हा नाथांचा स्वभाव नव्हता. साधं, पण थेट बोलायचे.

देह

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 07/06/2012 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
मृत्यू या लेखावर बरीच चर्चा झाल्यानं हा लेख इथे देतोय.

धर्म आणि लोकसंख्या

लेखक मराठे यांनी मंगळवार, 22/05/2012 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला जर कोणी विचारलं की धर्माचा आणि लोकसंख्या वाढीचा संबंध आहे का? आणि कसा? तर मला वाटतं बरीच लोक एका क्षणाचाही विलंब न लावता तावातावाने कसे क्ष धर्माचे लोक लोकसंख्या वाढीस कारणीभूत आहेत यावर तावातावाने बोलायला लागतील. काही जरा जास्त समजूतदार लोक लोकसंख्या धर्मावर नव्हे तर आर्थिक स्थानावर अवलंबून आहे असं म्हणतील. पण जर एकून जागतीक लोकसंख्या, धर्म, लोकांचं सरासरी उत्पन्न या सगळ्या गोष्टी विचारात घेउन एक तक्ता आखला तर एक वेगळंच चित्र डोळ्यापुढे येतं. हँस रॉसलिंग हा अशा प्रकारच्या स्टॅटिस्टिक्स मधे रमणारा एक अवलिया.