मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

युपीतल्या ह्या पदार्थाचे नाव काय?

शानबा५१२ · · कलादालन
गेल्या महीन्यात युपीला गेलो होतो,गंगाकीनारी गाईडच्या आग्रहास्त्व एक मिठा पान व हा पदार्थ खाल्ला.पान खालल्याचा पश्चाताप झाला पण हा पदार्थ अप्रतिम होता. ह्यात बटाट्याची भाजी कचोरीसारख्या आकाराच्या गोळ्यात भरलेली होती,थोडे मसाल्याचे पाणी व त्यात शिजवलेले चणे होते.ह्या सर्वांवर थोडीशी लालसर पावडरसारखी चटणी.हे सर्व वेगवेगळ्या भांड्यात असत व देताना मिक्स केल जात. मी ताबा ठेउन तीन रुपयाची एकच थाळी(?) खाल्ली पण आता ह्याचे नाव माहीती करायचे आहे. माहीतीगारांनी कृपया मदत करावी.
लेखनविषय:

वाचने 4578 वाचनखूण प्रतिक्रिया 19

In reply to by pramanik

शानबा५१२ 24/10/2010 - 08:52
चन्ना बटुरा! :-) http://www.google.co.in/images?hl=en&expIds=17259,24813,26637,26992,27095,27178&xhr=t&q=chana+bhatura&cp=8&um=1&ie=UTF-8&source=og&sa=N&tab=wi&biw=1024&bih=609

फोलपट 28/10/2010 - 21:46
हे तर गोल्गप्पे किन्वा पानी के बताशे, बन्गाल मधला फुच्का आणि आपली पाणीपूरी. असे आपले माझे मत. तोन्डाला पाणी सुटले खास. फोटो साठी धन्यवाद!

सुनील 28/10/2010 - 21:53
खाल्ली तेव्हाचा का विचारले नाही तुमच्या गाईडला? बाकी, तुम्ही यूपीला जाऊन आलात हे सांगण्याचा प्रयत्न आवडला!

In reply to by सुनील

शानबा५१२ 29/10/2010 - 00:30
युपीला जाउन काय मोट्ट.............................जे सांगत फेरु?? ह्याला पाच महीने झाले,आता एका मित्राने विचारल म्हणुन तुम्हास विचारल.

In reply to by Nile

शानबा५१२ 29/10/2010 - 00:35
चांगला फोटो कशाला म्हणतात मला माहीती नाही. जे पहाणे अपेक्षीत आहे ते दाखवले,बाजुला उभा असलेल्यांचे फोटो बघुन काय करणार आहात?? सारखा फक्त अवांतर व खोडसर प्रतिसाद देणार!!!अभिव्यक्ती स्वातंत्र ह्यालाच म्हणतात का???

In reply to by शानबा५१२

वाराणसीत तीन दीवस्, वाराणसीत तीन दीवस्, मध्यप्रदेश,जबलपुर,शक्तीनगर वगैरे नावे होती.वगैरे नावे होती. शानबा, युपित वाराणसी ठिक. पण वाराणसीत तीन दीवस्, मध्यप्रदेश,जबलपुर,शक्तीनगर म्हणजे जरा ............................................

रेवती 28/10/2010 - 23:18
यला कचोरी चाट म्हणतात. अतिषय टेस्टी प्रकार असतो. आता माझ्याच्याने फार बोलवणार नाही.;) फोटू देवून तुम्ही मला इनो घ्यायला भाग पाडलत निषेध!

अविनाशकुलकर्णी 28/10/2010 - 23:31
१] हा पदार्थ.व्हेज कि नॉन व्हेज? २]पानात काय काय घातले होते? ३]पलंग तोड नावाचे पान यु पी ला मिळते ते तर आपण खाल्ले नाहि ना? ४]पलंग तोड नावाचे पान शक्य तो साथिदारीण बरोबर असेल तरच खावे असा नियम आहे.. नाहि तर काय होते ते आपण समजु शकालच..[म्हणजे साथिदारीण बरोबर नसेल तर]
मला फोन नं. व्यनी कर. दिवस ठरवु आणि जाउ. फक्त एक छोटासा फरक आहे. बटाटा कुठल्याही पारीत न भरता त्याची टिकी करून वरती वर्णन केलेले सगळे पदार्थ घालतात. खाउन बघायचे असल्यास सांग.