खेकड्यांची कलाकुसर

लेखनविषय:
लेखनप्रकार
कोणत्याही समुद्रकिनार्‍यावर गेलो की ओहोटी असेल तर किनार्‍याच्या ओलसर वाळून हमखाच खेकड्यांची बिळे दिसतात. मला ही बिळे पहायला नेहमीच आवडतात कारण त्या बिळांच्या बाजूला सुंदर नक्षीकाम तयार झालेले असते. हे खेकडे अगदे छोटे असतात. मधूनच ते तुरु तुरु किनार्‍यावर चालतानाही दिसतात.

प्राचीन भारतः शेलारवाडी लेणी(घोरावडेश्वर)

लेखनप्रकार
शेलारवाडीची लेणी-बौद्धधर्मातील हिनयान पंथीयांनी इ.स.पूर्व पहिल्या ते इ.स.नंतरच्या पहिल्या शतकात खोदल्या गेलेल्या ९/१० लेण्यांचा हा छोटासा समुच्चय. भाऊबीजेनंतर लगेचच दुसर्‍या दिवशी इथे सकाळी ७ वाजताच पोहोचलो ते भावंडांसह. शेलारवाडी तशी घरापासून-चिंचवडपासून अगदीच जवळ, जेमतेम १० किमी. इथे बरेचवेळा येणे झालेलेच होते. लेण्यांमध्ये असलेल्या शिवमंदिरामुळे तसेच येथून जवळच असलेल्या घोरावाडीमुळे या लेण्यांना घोरावडेश्वर असेच म्हणतात पण वास्तविक ही लेणी आहेत पायथ्याच्या शेलारवाडीला खेटून. समुद्रसपाटीपासून ४५० ते ५०० मी उंच असलेल्या या डोंगरात ही लेणी खोदलेली आहेत.

हेलिकॉप्टर

लेखनप्रकार
संध्याकाळी साडेपाचचा सुमार असेल. चहा घेता घेता संगणकावर काहीतरी उद्योग चालु होता. म्हणजे कॉफी बनवायचे वीजेवर चालणारे यंत्र कसे वापरावे याचा शोध तू नळीवर घेत होतो. संगणकावर चित्रपट सुरू होऊन स्वागत आणि स्वगत संपवुन तो बुवा यंत्राविषयी काही सांगणार एव्हढ्यात हेलिकॉप्टरचा घरघराट, मागोमाग पक्ष्यांचा कलकलाट. नेमके जे ऐकायला हवे ते निसटले. असा प्रकार तिनेक वेळा घडला. आता हेलिकॉप्टर म्हणजे काही नवलाई नाही हे खरे पण आवाजावरून ते बरेच जवळ वाटले. खिडकीतुन डोकावायचा प्रयत्न केला पण आकाशात काहीच नव्हते. कदाचित ते इमारतीच्य बरोबर वरून गेले असावे.

सफर-ए-चेरापुंजी :: लिव्हींग रुट्स ब्रीज..

राम-राम मंडळी.. लै दिवसांनी बोर्डावर येणं झालंय... तर सांगायचं म्हणाल तर असं, की सध्या मी मेघालयात आहे, आणि मेघालय सरकारनी मला आमपाटी नावाच्या एका पहील्या नजरेत "अहाहा ! निसर्गरम्य.." आणि लवकरच पकायला लावणार्‍या सब-डिव्हीजनला आणून बसवलाय.. तर ऑफीसात बसून-बसून फायलींच्या संगतीत पकल्यावर आणि थोडाफार फिल्डमध्ये लोकांच्या तक्रारी, शिव्याशाप आणि इतर बरंच काही ऐकून झाल्यावर, एका विकांताला आम्ही जरा शिलाँग-चेरापुंजीला भटकून यायचे ठरवले.. (तसाही शिलाँगला माझा "मुंह दिखाई" चा कार्यक्रम व्हायचा होता..) शिलाँगपासून चेरापुंजी ( लोकली "सोहरा") जवळपास दोन तासांच्या अंतरावर आहे.

दवबिंदु १ - पानांवरचे

लेखनविषय:
नमस्कार मंडळी! गेल्या आठवड्यात आमच्या विभागाच्या वार्षिक परिषदेनिमित्त कर्नाळा येथे जायचा योग आला. तेथे दोन दिवस दोन रात्री मुक्काम होता. दुसर्‍या दिवशी सकाळी समोरच्या हिरवळीवर नजर गेली आणि त्या लुसलुशीत हिरवळीवर अनवाणी चालायचा मोह अनावर झाला. पावलांचे मनसोक्त लाड होत असताना नजर गवतावर चमचमणार्‍या दवबिंदुंवर गेली. ताबडतोब खोलीवर येउन कॅमेरा उचलला आणि मग एक तास कसा गेला ते समजलेच नाही. गवताच्या पात्यावरचे टपोरे थेंब, पानावरचे नाजुक थेंब, मोठ्या पानांवरचे स्तब्ध थेंब, इवल्याश्या दुरंगी गवत पातीवर हीर्‍यासारखे लखलखणारे थेंब... किती चित्रे टिपली तरी कमीच होती. त्यात मला बरी वाटलेली ही चित्रे.

कासचे पठार आणि आमचं हे वरातीमागुन आलेलं घोडं

लेखनप्रकार
नमस्कार मंडळी!! आज बरेच दिवसानी की महिन्यानी इकडे फोटू टाकतोय. तसं पहायला गेलं तर कासला जाउन आलो त्यालाच २ महिने उलटुन गेले. पण फोटो शेअर करणं होतच नव्हतं म्हणून हे आमच वरातीमागुन आलेलं घोडं ... कासच पठार अफाट आहे.
Subscribe to छायाचित्रण