Skip to main content

घोस्ट इफेक्ट ! (Ghost Effect)

लेखक मदनबाण यांनी मंगळवार, 24/07/2012 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मला माझा कॅमेरा घेउन वेगवेगळे प्रयोग करायचा छंद लागला आहे... जालावर फोटोग्राफी संबंधी विविध लेख वाचायचे आणि त्याचे जमतील तसे प्रयोग करुन पाहावयाचे... सध्या जालावर एचडीआर (High dynamic range) फोटोंची धूम चालु आहे... मी सुद्धा यात सामिल व्हायचे ठरवले,मग काय प्रयोग सुरु. यातला पहिला प्रयोग म्हणजे घोस्ट इफेक्ट ! एचडीआर फोटोग्राफी मधे नको असलेला एक अडथळा... मी याच अडथळ्याचा वापर करायचे ठरवले.माझा एचडीआर फोटोग्राफी एक प्रयोग थोडासा सफल झाला आहे,पण अजुन हवी तशी लोकेशन किंवा सबजेक्ट सापडला नाही...पुढच्या भागात बहुधा मी एचडीआर फोटो टाकण्याचा प्रयत्न करीन.... तो पर्यंत तुम्ही घोस्ट इफेक्ट पहा. :) कॅमेरा- निकॉन डी-५१०० (हौशी फोटुग्राफर) मदनबाण.....

वाचने 10171
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

बाणकाका मी घेतलेल्यात HDR सोय आहे. काका ? अहो मी अजुन ६ठी गाठली नाहीये हो ! बहुधा तुमच्या पेक्षा देखील लहान असेन ! ;) मला हे फोटु काढायला इशेष कष्ट झाले नाहीत्,थॅक्स टु निकॉन एचडी ऑप्शन ! :) तुमच्या कॅमेरा कंचा हाय बरं ? खरं तर एचडीआर फोटोग्राफी हे EV स्टॉप्स घेउन केली जाते... म्हणजे -२ /० /+२ असे तीन फोटो एकत्र केले की एक एचडीआर फोटो तयार होतो.परंतु तीन EV स्टॉप्स पेक्षा जास्त घेउन अधुन फोटो घेतले तर जास्त डायनॅमिक रेंज अचिव्ह करता येईल असे मला वाटते. या वरच्या प्रयोगात दोन फोटोंचा एक फोटो करण्यात आला आहे,तो सुद्धा कॅमेराच करतो... आपण फक्त एचडी ऑपश सिलेक्ट करायचा,फोटोत अधिक स्पष्टता येण्यासाठी योग्य एक्सोजर सेटींग आणि शटर स्पीड मात्र आपण निवडायचा...की घोष्ट इफेक्ट रेडी ! :) तुमच्या कॅमेरात एचडी ऑप्शन असेल तर तो ऑन करुन फोटो काढुन पहा.शक्यतो आयएसओ रेंज कमी ठेवा. एचडीआर फोटोग्राफीसाठी ट्रायपॉड हवाच असे मला वाटते...आणि माझ्याकडे असलेला ट्रायपॉड एकदम मरतुकडा आहे...त्यामुळे मला एचडीआर फोटोग्राफी कितपत करायला जमेल अशी शंका आहे.बघुया ! एचडीआर फोटोग्राफी म्हणजे नक्की काय ? तर हे वाचा:--- http://www.stuckincustoms.com/hdr-photography/

मानाचा गनपती हाय आपन ! म्हून शान कधी मदी " काका " ते प्नॉसॉनिक टी झेड २५ हाय आमच्यावालं ( गरीब मानुस हाय ! ) पन करून पघतो ! .

In reply to by स्पंदना

धन्स अपर्णा तै... :) मदनबाण एक फोतो खिडकीचाही टाका . इथे टिचकी मारा... खिडकीतुन पाहताना...

In reply to by मदनबाण

ते पाहिलय हो! आम्हाला खिडकी बघायची आहे. तेंव्हा खाली रस्त्यावर जाउन त्या खिडकीचा फोटो काढा. माझ्यातरी मते त्या खिडकीतच काय तरी गोम आहे.