मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

( काळा असे कुणाचा)

स्वामी संकेतानंद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
गेले दोन दिवस दोन कडव्यात अडकलो होतो, आता झटक्यात बाकीचे डोक्यात आले. =)) इथं पण सुचनांचं स्वागतच आहे. काळा असे कुणाचा आक्रंदतात कोणी मज पांढरा रुतावा हा दैवयोग आहे सांगू कसे कुणाला कळ आपल्या रुप्याची? चिल्लर कमावयाचा मज श्राप हाच आहे थांबू घरी पहातो, होती 'अनर्थ' नोटा रांगेत राहणेही विपरीत होत आहे ही बँक, पोस्ट ते की, काहीच आकळेना बंदीत सापडोनी मी 'रिक्तहस्त' आहे! - स्वामी संकेतानंद

वाचने 5800 वाचनखूण प्रतिक्रिया 22

अत्रुप्त आत्मा 17/11/2016 - 08:22
=)) जबराट्ट! =)) अता एक~ "काळ्या पैशातील कविता" , असा विडंबन काव्य संग्रह प्र सिद्ध करा हो स्वामिज्जीईईईई! =)) कारण मार्च पर्यंत अजून 10/१५ तरी होतील तुम्हाला! (कविता हं! ;) )

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाखु 17/11/2016 - 09:27
काही कविता हे शीर्षक जास्त उपयुक्त होईल असे वाटते. अर्थात शीघ्रकवी आणि खंदे समीक्षक यांच्या समोर मज वाचकाने बोलणे म्हण्जे ल.तो.मो.घा. आस्वादक नाखु पांढरापेषा

In reply to by सूड

स्वामी संकेतानंद 17/11/2016 - 15:12
शप्पथ!!! तुम्ही सगळ्यांनी कमेंट करेपर्यंत माझ्या डोक्यात दुसरा काही अर्थ आलाच नव्हता. आता मी स्वतःच लोळतोय! अशक्य आहात तुम्ही लोक! =))

पैसा 18/11/2016 - 11:14
स्वाम्याच्या प्रतिभेला अचानक बहर आलाय! =))