Skip to main content

विरंगुळा

‘मिसळपाव’चं रहस्य: भाग १: खबर

लेखक आतिवास यांनी सोमवार, 15/08/2016 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: संदीप डांगे यांचा ‘प्रस्ताव: मिसळपाव बॅज’ हा धागा आणि कैक ‘कट्टा’ धागे ***** “साहेब, भावड्या आलाय. बसवलंय मी त्याला. कधी आणू तुमच्याकडं ते सांगा.” “पाटील, विचारपूस केलीत का तुम्ही?” “होय साहेब, काहीतरी गडबड आहे असा मला सौशय होताच गेले काही महिने. तुम्ही पर्वानगी दिलीत तर लागतोच मागं. भावड्या सांगतोय ते माझा सौशय वाढवणारं आहे साहेब.” “हं, बोलवा त्याला.” ***** “रामराम, सायेब.” “रामराम. बस भाऊ. काय नवीन?” “काय न्हाई सायेब, परवा आपल्या त्या ह्या मॉलला गेल्तो.” “मॉलला?

रूस्तम

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 13/08/2016 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या काही गोष्टींनी तत्कालीन समाजाला हादरवून टाकलं होतं, यात कावस मानेकशॉ नानावटी खटल्याचा समावेश होता, या खटल्याने समाजाच्या निष्टाना मुळापासून हादरवून सोडले होते आणि ज्युरी पद्धत या खटल्यानंतर बंद करण्यात आली त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या इतिहासात या खटल्याला फार महत्व आहे. या सत्यकथेवर आधारित असलेला 'रुस्तम' सुद्धा असाच देश भक्तीमध्ये गुंडाळलेला एक ड्रामा. युद्धात नाव कमावलेला नेव्हीचा अधिकारी रुस्तम पावरी आयएनएस म्हैसूर या जहाजावर कमांडर म्हणून तैनात असतो.

ठिपक्यांची मनोली (मुनिया)

लेखक सानझरी यांनी बुधवार, 10/08/2016 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या १० वर्षां पासुन आमच्या घरी मुनिया येतात. ऊन्हाळा संपुन पावसाळ्याची चाहुल लागली की लगेच हजर होतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू होते. शरिराच्या आकारापेक्षा ६ ७ पट मोठ्या आकाराचे गवताचे पाते आणुन घरटी करतात. त्यांच्यासाठी आम्ही बाल्कनीत बाजरी ठेवतो. एका वेळेस ७०-८० च्या थव्याने येतात. मुनिया ४ महिने तरी रोज येतात. मुनियांना आठवड्याला ४ ते ५ किलो बाजरी लागते. दिवसतुन तिनदा खायला घालावं लागतं. (बाजरी खाताना त्या सांडवतातही भरपुर आणि खाल्लेल्या बाजरीचे फोलपटं खाली पडतात. जरा कुठे खुट्ट झालं कि लगेच उडुन जातात तेव्हा, त्यांच्या पंखांनिही बाजरी खाली सांडते.

बेधुंद (भाग १६ )

लेखक अविनाश लोंढे. यांनी मंगळवार, 09/08/2016 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
सेमिस्टर ६ (२००५ ) सुट्टीवरून पुन्हा कॉलेजला परत आल्यानंतर 'सम' सेमिस्टरची मस्ती सुरु झाली . अक्षा सोडला तर ,काही कुणाचे जास्त मार्क्स बदलले नाहीत . नेहमीप्रमाणे चंद्या , तात्या ,अश्विनी टॉप लिस्ट मध्ये , अक्षाचे मार्क्स जरा चांगलेच सुधारले होते अन पहिल्यांदाच तो टॉप ७ मध्ये आला होता , एकंदर 'फाईव्ह स्टार्स' चे ३ तारे पहिल्या १० मध्ये होते . सुऱ्याचे दोन विषय उडाले होते , 'नेट'वर पाहिजी तितकी मस्ती केल्याने असेल कदाचित ! नित्या कसाबसा पास झाला होता ,परीक्षेच्या काळात १-२ महिने तो 'वरच्या' मेरीट लॉबीत येऊन राहत असे , चंद्या ,तात्या अन अक्षावर त्याला टॉपिक समजवून द्यायची जबाबदारी असे !

बेधुंद (भाग १५ )

लेखक अविनाश लोंढे. यांनी सोमवार, 08/08/2016 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
पियाचा मेल वाचत , सुऱ्या 'डेस्कटॉपच्या' 'स्क्रीनकडे' धडधडनाऱ्या छातीने ,अन धावनाऱ्या विचाराने बघत गालातल्या गालात हसला ! का काय माहित ? पण एक वेगळाच आनंद त्याला झाला होता . पटकन त्याने 'याहू'वर 'लॉगिन' केलं , अन पिया त्याला ऑनलाईन दिसली . भावना पण किती विचित्र असतात नाही ? दोघेही अर्धा-एक तास एकमेकांना ऑनलाईन बघत होते पण कुणीच काही बोलत नव्हत . चुंबकाच्या सारख्या बाजू जश्या एकमेकांना दूर ढकलतात तशीच दोघांची खोटी मन एकमेकांना दूर ढकलत होती सुऱ्याने तिचे फोटो 'ओपन' केले . अगोदर तिने पाठवलेल्या 'फेक 'फोटो इतपत सुंदर नव्हती , हे त्याला जाणवले - तरी पण 'हजारात एक' तरी नक्कीच होती .

जिगसॉ पझल्स

लेखक avyakta यांनी शनिवार, 06/08/2016 05:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिपावर लेखनाचा हा माझा पहिलाच प्रयत्न!! जरा वेगळा विषय असावा असं वाटलं म्हणून हा जिगसॉ पझल्सचा विषय निवडला आहे, तो कसा वाटला ते नक्की सांगा. मी माझ्या मुलीला ती ७-८ वर्षांची असल्यापासून जिगसॉ पझल्स पूर्ण करायची सवय लावली आहे. आता ती १४ वर्षांची आहे, आत्तापर्यंत आम्ही ५०० पिसेस ची ४, ७५० पिसेस ची २ व १००० पिसेसचे एक पझल पूर्ण केली आहेत. जिगसॉ पझल्सपासून काय शिकता येईल हे दर्शविणारे स्फुट..अर्थात मूळ इंग्रजीतून..

बेधुंद (भाग - १४ )

लेखक अविनाश लोंढे. यांनी शनिवार, 06/08/2016 03:19 या दिवशी प्रकाशित केले.
(बऱ्याच दिवसानंतर ... ! मलाच माहित नाही की हा भाग टाकायला एवढा उशीर का लागला ? ) धन्यवाद - एखादे पुस्तक वाचतोय/ वाचतेय असे वाटतेय अशा संदेशाबद्दल ! तरीही ' मिपा ' वर असल्याने ह्या भागाच्या आधुनिक शॉर्ट 'हिंग्लिश' ने होणाऱ्या शेवटामुळे ( अती ) शहाण्यांच्या प्रतिकियासाठी शुभेच्छा ! ) ............. नित्याशी बोलणं झाल्यावर आंधळ्या मनानं , अक्षा सरळ बसमध्ये बसला अन घरी आला ! घरी आल्याने आई खुश होती अन सहजकीचं त्याच्या आवडीचे जेवण बनवले होते .

गो गोवा... भाग १

लेखक एनिग्मा यांनी गुरुवार, 04/08/2016 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
हिवाळ्याचे दिवस होते. पुण्यात अजून म्हणावी तशी थंडी सुरु नव्हती झाली. अचानक एके दिवशी संध्याकाळी ऑफिसमध्ये असताना माझा फोन झर झरला (vibrating mode). माझा जिवलग मित्र विन्या कॉल करत होता. कॉल घेतला की तिकडून आवाज आला, " Party कैसा हे तू ..." , विन्या. "मोजेमे..." मी. "Party, सब लोगा गोआ जानेका पिलाना कऱरे". अचानक मिळालेल्या सुखद धक्यातून सावरत मी त्याला म्हणालो की, " कधी जायचं ? आणि सोबत कोण कोण आहे?" त्यावर विन्या म्हणाला, "अरे बरेच दिवस झाले असं अचानक भयानक काही केल नव्हत म्हणून जेव्हा आज सगळे भेटलो तेव्हाच ठरवलं की गोव्याला जायच सगळ्यांनी" "अरे पण सगळे म्हणजे कोण?", मी.

ती - ७

लेखक खटपट्या यांनी मंगळवार, 02/08/2016 04:48 या दिवशी प्रकाशित केले.
"ती" "ती" - २ "ती" - ३ "ती - ४" ती - ५ ती - ६ ती - ७ बोरीवलीहून निघालो ते थेट घरी आलो पण येताना डोक्यात असंख्य विचार चालू होते. आपल्या हातून हे झालंच कसं.