डाव - ६ [खो कथा]
रुपाली :
गप्पा चांगल्या रंगात आल्या हुत्या अन तितक्यात वस्ताद्या कडमडला. कोण बेणं मेलंय सांगायलेबी तयार नवता हरामी. फौजदार लागोलाग लटांबर घीऊन निघून गेला.
काय त्या चारचार गाड्या, रायफली अन हवालदार.
इतक्यात कोणी आपल्याला पहायला यील वाटलंच नव्हतं. आबा म्हणत होते शिक्षण हुदे मग लग्नाचं पाहू. अन काल एकदम बॉम्बच टाकला. सकाळचे जेवणं झाल्यावर त्यांनी डिक्लेयर करून टाकलं की उद्या रुपीला पहायला एक पोरगा येणार हाये. तालुक्यात इन्स्पेक्टर हाये…पक्की सरकारी नोकरी, पाण्याखालची पन्नास एक्कर जमीन, मोक्याच्या जागी दोनचार प्लॉट अन बंगला. तालेवार पार्टी.
मिसळपाव
दिग्या अन जग्या मुडदे चोरायचे… स्मशानात पुरलेले. संशयाला जागाच सुटणार नाही असं परफेक्ट त्यांचं काम.
(याच त्या कामिनी बाई, ज्यांना मदत हवी आहे)
डिअर ऑल,
हल्लीची अध्यात्माची चालती बघून आपणही काहीतरी केले पाहिजे, या विचाराने आम्ही "सायुज्यमुक्तीचे सहा सोपान" या नावाने पुस्तक काढणार होतो (त्यात जागोजागी झेन, सुफियाना वगैरे शब्द पेरणार होतो), तेवढ्यात इथे
दिशाचे आईवडील पार्टीला गेले अन तिने लगेचच पुजाला घरी बोलावलं. पुजा सगळी तयारी करून आली होती. आल्याआल्या तिने दरवाजा खिडक्या बंद केल्या, खिडक्यांवरचे पडदे ओढून घेतले. नंतर टेबलावर बॅग ठेवून त्यातलं सामान बाहेर काढायला सुरुवात केली. सगळ्यात आधी काचेचा चकचकीत गोळा बाहेर आला. खोलीतल्या अंधारातही तो मंदगूढ उजेड फेकत होता.
“काय आहे हे?”
“याच्या मदतीने आपण भूतांना बोलावू शकतो.”
“काहीपण काय फेकतेस गं.”
“अगं खरंच. बाबांच्या जॉबमुळे आम्ही आफ्रिकेत होतो न तिथे मी तंत्रमंत्र शिकले होते.