कथुकल्या ६ (गूढ, रहस्य विशेष)
१. शेरलॉक अन फाशीचा दोर
टॉक... टॉक… टॉक… टॉक
काळ क्षणाक्षणाला पुढे सरकत होता, मृत्यू क्षणाक्षणाला जवळ येत होता. सेकंदकाटा आपल्या काळजावर आघात करतोय असं शेरलॉकला वाटत होतं. अर्थात याची त्याला सवय होती. स्कॉटलंड यार्ड त्याला बऱ्याचदा उशीराच बोलवायची. कित्येक केसेस त्याने शेवटच्या काही क्षणांत सोडवल्या होत्या. आजही तसं होऊ शकलं असतं.
त्याने डोळे उघडून समोर पाहिलं. पंचवीस वर्षांचा तरुण मुलगा त्याच्याकडे आशेने बघत होता. त्याच्या डोक्यावर फाशीचा दोर लटकत होता. कसायाने त्याचे दोन्ही हात समोर घेऊन चामड्याच्या पट्ट्याने बांधायला सुरुवात केली.
मिसळपाव
नाकातून परत रक्त यायला लागलं. मी खिशातल्या रूमालाने नाक पुसलं. कमाल आहे, यावेळचं रक्त लालऐवजी काळपट दिसत होतं. कदाचित रस्त्यावरच्या उघडझाप होणाऱ्या दिव्यांमुळे तसं दिसत असावं.
“मुव्ही आवडला का रे?” प्लियानीने आपला रेशमी हात माझ्या गळ्यात टाकत विचारलं. ती माझ्या इतकी जवळ असूनसुद्धा तिचा सहवास मला जाणवत नव्हता. पण परफ्युमचा मंद मोहक चंदनी सुगंध मात्र मनाला मोहवून टाकत होता. हा सुगंध मला पृथ्वीची आठवण करून देतो.
“तुला मुव्ही आवडला का ?” तिने परत विचारलं.
“हो.
फक्त पैशांसाठी मी या प्रयोगात सहभागी झालो होतो.
माझ्या बधिर कवटीला छिद्र पाडतांना डॉक्टरांनी मला जागंच ठेवलं. त्यांनी डोक्याच्या वेगवेगळ्या भागांना केबल्स जोडले. मेंदूच्या शुभ्र करड्या रंगात केसांएवढ्या बारीक केबल्सचा लाल रंग मिसळून गेला. त्या असंख्य केबल्सचं दुसरं टोक जोडलं गेलं सुपरकॉम्प्युटर्सना.
“ऑपरेशन सक्सेसफुल” त्यांनी जाहीर केलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा महापूर उसळला होता. आता फक्त फायनल टेस्टिंग बाकी होतं.
इशारा झाला अन सगळे संगणक जिवंत झाले.