Skip to main content

विरंगुळा

छापू का?

लेखक अभ्या.. यांनी गुरुवार, 06/04/2017 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सुमारे वर्षभरापूर्वी मी खास मिपाकरांसाठी काही टिशर्टचे डिझाईन्स बनवले होते. त्याला प्रतिसाद तर मिळाला होताच पण आता चित्रांपेक्षा काही स्पेशल पंचलाईन्सची वेळ आहे. आपले मिपा अशा पंचलाईन्सचे खाणच जणू.

डाव - २ [खो कथा]

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी बुधवार, 05/04/2017 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
डाव १ -------------------------------------------- डाव - २ मास्तर : “तुमची झेडपी पैका गियका पुरवत नाय का?” सरपंच जगन पाटलानं तक्याला रेलत विचारलं. जोरकस वजन पडल्यानं तो हवा भरलेल्या उशीवानी पिचकला. “सहा महीने झाले अहवाल पाठवलाय पण आजून मदत मिळाली न्हाय. सरकारी कामं कशी असतात तुम्हाला तर माहीतच आहे.” “चांगलंच माहिते.” “शाळेची दयनीय अवस्था झालीये. चार वर्गांमधले टीनं फुटले, उन पाऊस डायरेक्ट झिरपतो, बसायला पट्ट्य्या नाहीत, ऑफिसचा दरवाजा तुटलाय.

नवीन उपक्रम : कथुकल्या

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी सोमवार, 03/04/2017 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिभेचा महानायक श्री विनायकाला त्रिवार वंदन करून नवीन उपक्रमाला सुरुवात करत आहे. कथा म्हटलं की दोन प्रकार आपल्यासमोर येतात – लघुकथा आणि दीर्घकथा. साधारणतः हजार शब्दांच्या वरील कथेला लघुकथा असं म्हटलं जातं. त्यापेक्षा छोट्या कथा आजकाल अधूनमधून लिहल्या जाऊ लागल्या आहेत. ह्या कथा पटकन वाचून होतात, लिहायला कठीण असतात आणि वाचकांना विचार करायला भाग पाडतात. मिपावर सूक्ष्मकथा, शशक लिहल्या गेल्या आहेत, जात आहेत. यावर्षीच्या शशक स्पर्धेदरम्यान बऱ्याचजणांचं असं म्हणणं होतं की अशा छोट्या कथा नियमितपणे लिहल्या जायला हव्या. वाचकाच्या इच्छेला मान देऊन मी हे आव्हान स्विकारत आहे.

(#मिपालेझीनेस - मी आज केलेला आराम - एप्रिल २०१७)

लेखक प्रसाद गोडबोले यांनी सोमवार, 03/04/2017 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. "मी आज केलेला आराम " या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे , इतका प्रतिसाद मिळत आहे की लोकं आरामात डुंबुन गेल्याने गेले तीन महीने धागा काढायलाही विसरलीत !! आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन आराम सुरू केला आहे. आराम सुरू केलेल्या आणि आरामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. हां तर तसेही नवीन फायनान्शीयल ईयर सुरु झाल्यावर आम्हाला कामाचा लोड नसतो . ऑफीसात येऊन मस्टर क्लिक करणे अन जुने पुराणे काही उरले सुरले बग क्लीयर करणे इतकेच काय ते काम !

डाव - १ [ खो-कथा-दुसरी]

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 03/04/2017 07:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मंडळी, आम्ही दुसरी खो कथा आपल्यासमोर घेऊन येत आहोत. पहिल्या कथेला दिलेल्या ऊत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तसेच पहिल्या कथेला काही दिग्गजांनी दिलेले सल्ले अमलात आणण्याच्या यावेळी प्रयत्न करणार आहोत. यावेळी प्रत्येक लेखक आपापले वेगळे पात्र घेऊन कथा पुढे सरकवत राहील. पहिली कथा अद्भुतिका होती. यावेळी ती रहस्यकथा असेल. आम्ही आठजण मिळून कथा लिहीणार असलो तरी यावेळी नवीन लेखकांना पुढचे भाग लिहिण्यासाठी आमंत्रित करणार आहोत.

एक विनोदी अनुभव

लेखक उपेक्षित यांनी रविवार, 02/04/2017 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
खरे तर गेले बरेच दिवस डोक्यात विचार येत होता कि देवाचे अस्तित्व खरच आहे ? खरच या जगात देव हि संकल्पना आहे? म्हणायला गेलो तर मी थोडा डाव्या विचारांकडे झुकलेलो आहे पण अजूनही मला मी निट समजलो नाहीये. घाबरू नका मंडळी गेल्या काही दिवसात बर्याच गल्लाभरू चित्रपटात हा विषय अगदी सोयीस्कर रीतीने हाताळून त्याची पद्धतशीरपणे वाट लावण्यात आली आहे. सो मी तुमचे बौद्धिक घेऊन तुम्हाला अजून पकवणार नाहीये. खरे तर मी माझ्याच वागण्याचे आकलन करायचा प्रयत्न करतोय बघा. तर झाले असे कि माझी आई काही धार्मिक संस्थांशी जोडली गेली आहे साहजिकच आहे तिला यात रसही आहे आणि आपल्याच वयाच्या मैत्रिणींशी थोडी हितगुज हि होते.

एक कोडे

लेखक शरद यांनी रविवार, 02/04/2017 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
एक कोडे आकडेमोडीची कोडी मिसळपाव सारख्या साहित्याला वाहिलेल्या संस्थेच्या फलकावर द्यावीत का ? उत्तर अवघड आहे. पण मी आज जे कोडे देत आहे ते निराळ्या कारणामुळे. दिलेल्या कोड्याची दहा-पंधरा उत्तरे असतील तर ती सगळी (किंवा निदान बरीचशी) तर्काच्या सहा सात पायर्‍यात (steps) मिळवता येतील का ? वयोमानाने , आळशीपणाने व कित्येकवेळी तसा प्रयत्नच न केल्याने बुद्धीला गंज चढतो. ही गोष्ट तशी न परवडणारी. तेव्हा म्हटले देऊ तर खरे. प्रतिसाद बघून कळेलच की मला वाटते त्यात काही तथ्य आहे का. एका गवळ्याकडे २५ गायी आहेत.१, २, ३, ...२४, २५.अशा क्रमांकाच्या. प्रत्येक गाय आपला क्रमांक आहे तेवधे लिटर दूध देते.

मराठी स्टँडअप ऑन बॉलीवूड

लेखक रावसाहेब म्हणत्यात यांनी रविवार, 02/04/2017 06:42 या दिवशी प्रकाशित केले.
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, म्हणजे अर्थातच आपली फिल्मी दुनिया. बॉलीवूड विषयी मला विलक्षण आदर आहे. म्हणजे जी industry गेली शंभर हून अधिक वर्षे कोट्यावधी लोकांना बनवून ठेऊ शकते. काय बनवून ठेऊ शकते ह्याकरता मुंबईत एक खास शब्द आहे जो मी इथे उच्चारू शकत नाही. तर बनवून ठेऊ शकते त्या industry करता माझे कोटी कोटी प्रणाम. आता प्रणाम केलाय तर आता काशी करायला सुरुवात करूया. कारण तुम्ही काय इथे माझा प्रणाम बघायला नाही आला. मला सांगा इथे शाहरुख खानचे किती fans आहेत?

आम्ही जियो घेतलंय

लेखक रावसाहेब म्हणत्यात यांनी शनिवार, 01/04/2017 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
(हे स्क्रिप्ट standup करण्याच्या उद्देशाने लिहिलेलं आहे त्यामुळे वाचताना बरेचशे जोक पट्कन लक्षात येणार नाहीत कदाचित. तरीही). भारतात मुकेश अंबानीच्या जियोने अक्षरशः वेड लावलंय. बघावं तो “आम्ही जियो घेतलंय आम्ही जियो घेतलंय” करून मिरवत असतो. गम्मत अशी कि जियो घेतलेल्या ९९% लोकांना स्वतःचे जियो नंबर माहित नाहीयत. खरी पंचाईत dual सीम वाल्यांची झालीय. Already दोन सीम सांभाळताना तारांबळ उडायची आता त्यात हे जियो कार्ड घालायचं कुठे. लोकं कानाच्या मागे सीम कार्ड लावायला लागलेत असं ऐकण्यात आलंय. हा काढायचा तो घालायचा, तो काढायचा हा घालायचा.