Skip to main content

विरंगुळा

कोथरूड (पुणे) इथे कुणी मिपाकर आहेत का? मी उद्या ३ जुलै २०१७ ला कोथरूडला आहे.

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 02/07/2017 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, काही कारणानिमित्त (पुण्याला कारणाशिवाय जाणे, शक्यतो टाळतो) मी उद्या संध्याकाळी, सोमवार दिनांक ३-०७-२०१७ कोथरूड (पुणे) इथे येत आहे. मंगळवारी संध्याकाळी डोंबिवलीला परत येणार. एखादा मिनी कट्टा पण करता येईल आणि त्या निमित्ताने पुण्यातील मिपाकर मित्रांना पण भेटता येईल, हा हेतू आहेच. आपलाच (कट्टाप्पा) मुवि

सोलमेट २

लेखक नीलमोहर यांनी शुक्रवार, 30/06/2017 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या डेस्कवर बसून आकांक्षा विचार करत होती, आयुष्यातील घटना एखाद्या टाइमलॅप्स व्हिडीओप्रमाणे तिच्या डोळ्यांसमोरून सरकत जात होत्या. घरातल्यांपासून आलेला दुरावा, नात्यांतील अपेक्षाभंग, असफलता, करिअर मधील स्टॅग्नेशन, कधीमधी छळणारे एकटेपण, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम होऊन आधी ती जवळ्पास डिप्रेशन मध्ये गेली होती. "मॅडम चला, सुटलं ऑफिस..

(why is there nothing rather than something ???????)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/06/2017 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

हिंदी सिनेमा वाल्यांचे आवडते वाद्य कोणते?

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 24/06/2017 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : १. खालील लेखातील मते ही माझ्या हिंदी सिमातील तुटपुंज्या ज्ञावर आधारीत आहेत.हा वैचारीक लेख नसल्याने (तसे आमचे कुठलेही लेख जास्त विचार करण्यासारखे नसतात, हा भाग वेगळा) खूप विचार करणार्‍या व्यक्तींनी ह्या लेखाकडे कानाडोळा केलात तरी चालेल. २. दुसरी गोष्ट म्हणजे मला वाद्यांमधले अजिबात काही समजत नाही. पिपाण्या : म्हनजे फुंकायची वाद्ये ह्यात बासरी पासून सनई पर्यंत सगळी वाद्ये. खाजवायची वाद्ये : सतार, तंबोरा. व्हायोलिन. बडवायची वाद्ये : तबला-डग्गा, ढोल, नगारा इत्यादी.

कथुकल्या १३

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शनिवार, 24/06/2017 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
१. गोष्ट “पप्पा सांगा न लवकर गोष्ट.” “ कुठली सांगू बरं… न्यूट्रोफायटा आणि लेडी अॅस्ट्रोनटची ?” “नको ती बोअर आहे.” “मग गुरुवरच्या चेटकीणीची ?” “ती सांगितलीये तुम्ही चारपाच वेळा.” “बोलकी निळी झाडं, जादुई रोबो, टेट्रोग्लॅमसचं सोनेरी अंडं ?” “सगळ्या सांगितल्यात ओ पप्पा. एखादी नवीन सांगा न.” नेफीसने थोडावेळ डोकं खाजवलं. “ठिकेय एक नवीन गोष्ट सांगतो. पृथ्वीवरच्या माणसांची.” “चालेल.” शेनॉय गोष्ट ऐकायला सावरून बसला. “खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ðζ सूर्यमालेत पृथ्वी नावाचा एक ग्रह होता.

बकरी ने पैसे का खाल्ले ?

लेखक खट्याळ पाटिल यांनी शुक्रवार, 16/06/2017 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
नोंद : लेखा चा हेतू फक्त मनोरंजन आणि हसवणूक आहे. लेख हा खऱ्या बातमीवर आधारित असला तरी, पूर्णतः काल्पनिक आहे. याचा कोणत्याही व्यक्ती किंवा घटनेशी काही संबंध नाही. . कृपा करून हि कथा स्वतःच्या नावाने दुसरी कडे छापू नये. copy-right संदर्भ : नुकतीच एक बातमी सर्वे पेपर मध्ये गाजत आहे कि एका बकरी ने शेतकऱ्याच्या ६२ हजारांच्या नोटा खाल्ल्या.

एका वेड्याची रोजनिशी.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 15/06/2017 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire एका वेड्याची रोजनिशी. ऑक्टोबर ३ आज एक विचित्र गोष्ट घडली. आज जरा उशीराच उठलो. सावित्रीबाई माझी न्याहरी घेऊन आल्या तेव्हा मी त्यांना किती उशीर झालाय हे विचारले. १० वाजून गेलेत हे ऐकल्यावर मी घाईघाईने आवरले. खरं सांगायचं तर आज ऑफिसला जायची इच्छाच नव्हती कारण तिथे जाऊन साहेबाचा कडू औषध घेतल्यासारखा चेहरा पहावा लागला असता.

पारिजात

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 13/06/2017 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
सुन्न मनाने तिने फोन ठेवला. समोरच्या टेबलवर ठेवलेला चहा केव्हाच थंड झाला होता, त्याखालचा सकाळचा पेपर फडफडत होता पण तिला काही सुचत नव्हतं. हुंदकाही येत नव्हता. आतून थिजल्या सारखी ती गोठून गेली होती. अण्णा जाणार हे निश्चितच होतं. त्यांचं वयही झालं होतं. होणार हे माहीत असलं तरी प्रत्यक्षात झाल्यावर गोष्ट मनाला चटका लावून जाते. गायत्रीचही तसंच झालं. अण्णांच्या मागोमाग तिच्या मनात विचार आला माईचा. माई कशी असेल? सावरली असेल का? तिने चटकन माईला फोन लावला. पण कोणी फोन उचललाच नाही.      माईशी बोलल्यालासुद्धा आता बरेच महिने होऊन गेले होते.

कथुकल्या ११

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शनिवार, 10/06/2017 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
१. तुझ्याविना… निखिलने डोळे उघडले अन टेबलावरच्या घड्याळात पाहिलं. आज उठायला तब्बल एक तास उशीर झाला होता. त्याने पटापट आवरलं अन ड्रेस बदलून तयार झाला. कॉलरवरच्या हिरवट डागाकडे पाहून तो जरा नाराज झाला पण एका आर्ट टीचरसाठी हे नेहमीचच होतं. जाताजाता त्याने प्रियाकडे वळून पाहिलं. ती त्याच्याकडे तोंड करून झोपली होती. लांबसडक सोनेरी केसांनी मुखचंद्रमा अर्धवट झाकला होता. डोळे मिटलेला तिचा सुंदर चेहरा शांत, प्रसन्न दिसत होता. “सॉरी डियर.

(एक भुताचा अनुभव)

लेखक अभ्या.. यांनी शुक्रवार, 09/06/2017 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा : बृहन्माहाराष्ट्राची संत्रा आणि नुकताच वाचलेला अनुभव नोंद : लेखा चा उद्देश अंधश्रद्धा आणि नशेबाजीला खतपाणी घालणे नाहि. तेव्हा मी ट्रान्सपोर्ट मध्ये काम करत होतो तेव्हाची हि माझी गोष्ट आहे.