Skip to main content

विरंगुळा

शादी से पहले और शादी के बाद !

लेखक संदीप चित्रे यांनी बुधवार, 25/06/2008 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
शादी से पहले हाथों में हाथ लबों पर भी खूब मिठास घंटोंतक चलें फोन पे बात हर शाम उन्हें मिलने के बाद अंबर का हो रंग नीला या फिर हो घनघोर वर्षा इक छोटा, कप कॉफी का साथ देता दिवानों का… शादी होते सबकुछ बदला उनका न सिर्फ नाम बदला घर आते हैं साँझ ढले हम लिए हाथ सब्जी का थैला… बातें अब भी होती हैं घटोंतक वे चलती हैं घरखर्चा और बच्चोंकी फीस क्या जेब में अब कुछ बाकी है? ऐसा नहीं के प्यार हुआ कम फुरसद अब कहनेकी नहीं बात अगर हो नजरोंसे तो जरूरत अब लबोंकी नहीं..
Taxonomy upgrade extras

(सख्या रे, घामट मी तरुणी!)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 24/06/2008 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
जगदीश खेबुडकरांचं, दीदींच्या आवाजातलं 'सख्या रे घायाळ मी हरणी' हे सुंदर गीत ऐकलं. प्रियकराला भेटायला निघालेल्या पण उन्हाळ्यानं आणि प्रदूषणानं हैराण झालेल्या तरुणीची कैफियत आमच्या नजरेसमोर आली! (श्रेय - मूळ गाणे गुणगुणत असतानाच सौ. चतुरंग यांना काही ओळी स्फुरल्या आणि तो धागा पकडून लगोलग आम्ही विणकाम करायला घेतले!
Taxonomy upgrade extras

आणखी काही पी. जे.

लेखक सचीन जी यांनी मंगळवार, 24/06/2008 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजुताईनी सुरु केलेली पी. जे. ची साखळी बरीच लांबल्याने आणखी काही पी. जे. इथे देत आहे. १. कुलकर्णी, कुलकर्णी आणि कुलकर्णी असोसिएटस या कंपनीत फोन येतो - हॅलो, कुलकर्णी आहेत काय? -> ना।ही, मुंबईला गेले आहेत. हॅलो, कुलकर्णी आहेत काय? -> सॉरी, नाशिकला गेले आहेत. हॅलो, कुलकर्णी आहेत काय? -> बोलतोय ! २. एका मल्टीप्लेक्स थिएटरमधे स्क्रीन १ ला 'डर' हा चित्रपट असेल तर स्क्रीन २ ला कोणता चित्रपट असेल ? --> सोप्प आहे ! 'जीत' हा चित्रपट असेल कारण डर के आगे जीत है ! सचीन जी!!

गुलाबी थंडी

लेखक चाणक्य यांनी शनिवार, 21/06/2008 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली थंडी काही तितकीशी गुलाबी वाटत नाही पहाटेच्या थंडीत ऊठुन व्यायाम करावासा वाटतो अंथरुणाची ओढ आता पुर्वीसारखी वाटत नाही हल्ली थंडी काही तितकीशी गुलाबी वाटत नाही हल्ली मंडईतही पुर्वीसारखे नजरेला गजरे दिसत नाही कारण गजरे विकणारी बाई आता गजरे विकत नाही देवांच्या तसबिरी विकण्याचा नवा धंदा ती करते आणि या धंद्यात पैसा जास्त सुटतो असं काहीसं म्हणते म्हणलं जाऊदे, नाहीतरी आपल्याला गजर्‍याची तितकी काही गरज राहिलेली नाहीये आणि थंडीही आता पुर्वीसारखी गुलाबी राहिलेली नाहीये रात्रीच्या आकाशात आजकाल नुसते ढगच दिसतात सगळ्या चांदण्या कुठे गेल्या काहीच कळत नाही चंद्रही आता पहिल्यासारखा लोभस वगैरे वाटत नाह
Taxonomy upgrade extras

डोळे हे जुलमी गडे...

लेखक प्राजु यांनी शनिवार, 21/06/2008 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, शिर्षकावरून असं वाटेल की, मी डोळे या विषयावर काही लिहिणार आहे. तसं पाहिलं तर ते थोडं फार खरंही आहे. तिच्या / त्याच्या प्रेमळ डोळ्यांवर आजपर्यंत अनेक कवींनी कवनं रचली, गझला लिहिल्या, शेर लिहिले. निसर्गानं प्रत्येक माणसाला डोळे देताना रंगनिर्मिती कोठून केली असेल हा प्रश्न मला नेहमीच पडतो. काळे भोर डोळे, भुरे डोळे, पिंगट डोळे, निळसर डोळे, हिरवट डोळे, राखडी छटा असलेले डोळे.. असे कितीतरी प्रकारचे डोळे आपण पाहतो. डोळ्यावरून मनातील भावना लगेच कळतात असं म्हणतात. काही डोळे शांत वाटतात, काही पाणिदार, काही प्रेमळ , काही उथळ, काही खट्याळ, काही भोचक.. काही गंभिर....

संवाद-२ [कुठलाही वाचा, ही मालिका नाही]

लेखक चाणक्य यांनी शुक्रवार, 20/06/2008 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
>>>नमस्कार मंडळी, हि काही कथा नाही किंवा कुठल्या कथेचा भागही नाही.हा आहे संवाद... दोघांमधला...दोन मित्रांमधला, प्रियकर- प्रेयसी मधला... दोन माणसांमधला....! हे संवाद मी जसे सुचले तसे लिहिले आहेत. यातुन काही सांगायचे वगैरे नाही. त्या त्या क्षणी जे विचार मनात याय्चे ते कागदावर उतरवायचो. ते बरोबर असतीलही किंवा नसतीलही. या संवादातल्या पात्रांना नाव नाहीत, किंबहुना त्याची गरज भासत नाही इतके लहान संवाद आहेत हे. हे संवाद कुठलीही पार्श्वभुमी न देता अचानक सुरु होतात. एखादं गाणं जसं अंत-यापासुन सुरु व्हावं तसं.

(शेठहो, थांबा जरा...!)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 18/06/2008 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रदीप कुलकर्णी ह्यांची 'शब्दहो, थांबा जरा...!' ही गझल वाचून नवीन 'अर्थव्यवस्थेतील' काही दृश्ये आमच्या डोळ्यांसमोर तरळून गेली! ;) ......................................... शेठहो, थांबा जरा...! ......................................... शेठहो, थांबा जरा! ते गुंफणे 'अर्था'त गाणे! आजच्यापुरते तरी घ्या, घ्या तुम्ही थोडे दमाने!! 'व्यक्त' असता नेहमी... 'अव्यक्त'ही थोडे असू द्या ! का अशी खालून थैली? 'येथे' नको 'तेथे' असू द्या ! लक्ष ठेवी का शिपाई?
Taxonomy upgrade extras

लूज कंट्रोल...दीर्घांक ... एक परीक्षण / अनुभव

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 18/06/2008 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
लूज कंट्रोल... २००५ च्या सुदर्शन रंगमंचावर महाराष्ट्र कल्चरल सेंटर आयोजित दीर्घांक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारं नाटक.. लेखक : हेमंत ढोमे दिग्दर्शक : निपुण धर्माधिकारी कलाकार : अमेय वाघ,हेमंत ढोमे,निपुण धर्माधिकारी, सुषमा देशपांडे निर्मिती : समन्वय पुणे. या नाटकाचा दीर्घांक मी जुलै २००६ मध्ये पाहिला. त्याचे नंतर दोन अंकी नाटक आले, पण ते जास्त काळ टिकले नाही. ते नाटक मी पाहिले नाही.मी आत्ता बोलणार आहे ते दीर्घांकाविषयी.. नाटकाचे कथासूत्र... तीन कॉलेज मधले मित्र. वय वर्षे १९ - २०...