मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हास्यतुकडे - १

आगाऊ कार्टा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
स्वगत म्हणजे मनातल्या मनात विवाहाची निमंत्रण पत्रिका आल्यावर आपण हळुच "अहेर आणू नये" हे वाक्य बघतो बघतो व सर्वांनी फुकट जेवण हादडायला जायचं असं मनात ठरवतो, तश्यागत. ऐकणारा समोरच्याचे खोटेच कौतुक करत असतो. पण मनातल्या मनात काय म्हणतो ते पुढे पाहाच. बोलणारा (उघड): (आनंदाने) साहेब पेढे घ्या. ८ वर्षांनी पोर झालं. मुलगा झाला साहेब. ऐकणारा (मनात): (मग एवढी वर्षे काय करत होतास?) बोलणारा (उघड): साहेब ही माझी पत्नी सोनाली. ऐकणारा (मनात): (मग एवढे दिवस तुझ्याबरोबर फिरत होती ती कोण?) बोलणारा (उघड): साहेब मुलगा १०वी च्या बोर्डात पाचवा आला. ऐकणारा (मनात): (तो शेवटी का येईना मला काय करायचे आहे?) बोलणारा (उघड): विवाहाचे निमंत्रण द्यायला आलोय. सरोजशी लग्न ठरलंय. ऐकणारा (मनात): (च्यायला, एवढे दिवस तर ती दिन्या बरोबर फिरत होती.) बोलणारा (उघड): साहेब बढती मिळाली. उद्या पार्टी ठेवली आहे. ऐकणारा (मनात): (एवढी वर्षे चमचेगिरी केली त्याचा फायदा झाला म्हणायचा.) बोलणारा (उघड): ही माझी बायको, पल्लवी. ऐकणारा (मनात): (या माकडाला मस्त चिकणी बायको मिळाली, मज्जा आहे साल्याची.) बोलणारा (उघड): हे फोटोंचे अल्बम्स पाहत बसा. ऐकणारा (मनात): (आग लाव त्या अल्बम्सना, वैताग साला.)

वाचने 4176 वाचनखूण प्रतिक्रिया 6

पक्या 27/06/2008 - 03:29
वा. मस्त :) >>बोलणारा (उघड): हे फोटोंचे अल्बम्स पाहत बसा. ऐकणारा (मनात): (आग लाव त्या अल्बम्सना, वैताग साला.) हा विचार तर बहुतेकांच्या मनात येत असणार.

In reply to by पक्या

टारझन 27/06/2008 - 03:46
अगदी पुलंच्या . मी आणि माझे शत्रूपक्षची आठ्वण झाली. पुलप्रेमी) कुबड्या खवीस
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

सहज 27/06/2008 - 07:34
लिहणारा (उघड): - हे वाचा हास्यतुकडे - १ वाचणारा (मनात): - बापरे आता अजुन किती तुकडे कोंबणार हा!! ;-) कृ. ह. घ्या.

In reply to by सहज

II राजे II 27/06/2008 - 11:34
लिहणारा (उघड): - हे वाचा हास्यतुकडे - १ वाचणारा (मनात): - बापरे आता अजुन किती तुकडे कोंबणार हा!! :D राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

स्नेहश्री 27/06/2008 - 11:30
सॉलीड धमाल हास्यतुकडे आहेत हे. मजा आली. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी