आमचे प्रेरणास्थान : फुलले रे क्षण माझे ......
खणले रे पथ माझे खणले रे
ड्रेनेजच्या , हो s s टेलिफोनच्या
आणि गॅ s sसच्या लोकांनी
तुटले रे पथ माझे तुटले रे
धुळीच्या लोटात गर्दीच्या पोटात भयभीत जीव फिरे
डांबरीकरण, कांक्रीटीकरण लोकांचे मरण रे
या वेडाच्या, आधीन शासन झाले मिंधे रे
पैशांच्या थैलीने
खणले रे .............
रीत ही दरवर्षीची थांबेना
रहदारीची दुर्दशा साहवेना
कुणा सांगु मी काय सांगु मी
निबर मनास काही उमगेना
पोटाच्या खळगीने
खणले रे पथ माझे खणले रे
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2691
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
सही !!!
झुळूक वार्याची
हे ही झक्कास.
In reply to झुळूक वार्याची by आपला अभिजित
अप्रतीम..
झक्कास विडंबन!
झकास विडंबन