मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(सख्या रे, घामट मी तरुणी!)

चतुरंग · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
जगदीश खेबुडकरांचं, दीदींच्या आवाजातलं 'सख्या रे घायाळ मी हरणी' हे सुंदर गीत ऐकलं. प्रियकराला भेटायला निघालेल्या पण उन्हाळ्यानं आणि प्रदूषणानं हैराण झालेल्या तरुणीची कैफियत आमच्या नजरेसमोर आली! (श्रेय - मूळ गाणे गुणगुणत असतानाच सौ. चतुरंग यांना काही ओळी स्फुरल्या आणि तो धागा पकडून लगोलग आम्ही विणकाम करायला घेतले! ;) ) हा लोट कसला, धूर असे हो दाट अंधार दिवसा, कुठं दिसंना वाटं कुण्या द्वाडानं हाणता गाडी केली मनधरणी सख्या रे, घामट मी तरुणी धूळमाखला जर्द कोट अन्‌ घाम घाम अंगात ओघळणार्‍या थेंबांनांही कुबटवास दे साथ कुठं पुसू मी, कशी पुसू मी, गेले भांबावुनी थेंब उमलले चेहर्‍यावरती, प्राण दाटले डोळ्यात केस गुंतले असती माझे, डबडबल्या त्या भेटीत कुठं लपू मी, कशी लपू मी, गेले मी हरवुनी चतुरंग

वाचने 5923 वाचनखूण प्रतिक्रिया 14

स्वप्निल मन Tue, 06/24/2008 - 22:01
चा॑गले विड॑बन आहे. स्वप्निल मन पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्युला आम॑त्रण दिल॑स, जीवनाची हीच ग॑मत आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि म्हणतो जगतोय.

विसोबा खेचर Wed, 06/25/2008 - 11:00
अरे रंगा, एका चांगल्या गाण्याची अशी वाट का लावली आहेस रे? :)

In reply to by चतुरंग

विकास Wed, 06/25/2008 - 23:59
सर्व प्रकट आणि अप्रकट आस्वादकांचे, वरील वाक्य वाचताना मी चुकून "सर्व घामट आणि बिनघामट आस्वादकांचे," असे वाचले ;)

प्रमोद देव गुरुवार, 06/26/2008 - 09:38
घाम गाळून लिहिलेलं ;) हे काव्य आवडलं! वा! चतुरंगराव! मस्त केलंय विडंबन! श्रेय - मूळ गाणे गुणगुणत असतानाच सौ. चतुरंग यांना काही ओळी स्फुरल्या आणि तो धागा पकडून लगोलग आम्ही विणकाम करायला घेतले! अच्छा! म्हणजे ह्यांची 'कविता,स्फुर्तिदेवता,प्रतिभा' वगैरे वगैरे कोण ते आज कळले. :) मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

भडकमकर मास्तर गुरुवार, 06/26/2008 - 14:21
अहाहा, काल घरात हे गाणं आळवून आळवून म्हणालो... लै शिव्या पडल्या.... :)) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/